Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

by Geeta P
1,604 views
Torajan people

Torajan people Indonesia इंडोनेशियात दर तीन वर्षांनी या सणाला काढला जातो कबरीतुण मृतदेह बाहेर

न जायते म्रियते वा कदाची नांय भुत्वा भविता वा न भूय :| अजो नित्य :शाश्वतोSयं पुराणो न हन्यते ह्न्यमाने शरीरे ||

शरीर नष्ट झाले तरी आत्मा निरंतन अमर असतो. तो कधीच मरत नाही असा उपदेश आपल्याला भगवत गीतेत दिला आहे.

आत्म्याचा निरतंन प्रवास करत असताना आलेला मृत्यु हा पहिला टप्पा असतो. . 

पण आज आपन इंडोनेशिया तील ही जमात वरील श्लोका ला अनुसरून मृत्यु हा एक टप्पा आहे

असे माणूनच मृत व्यक्तीला जीवंत असल्या सारख समजतात. आपन या जमाती बद्दल जाणून घेणार आहोत. 

Torajan people

इंडोनेशिया तील “तोरजा“ Torajan people नावाची एक जमात आहे आणि ही जमात प्रत्येक वर्षी

“मानेन “ Manene Death Ritual Indonesia नावाचा एक उत्सव साजरा करत असते.

हा उत्सव साजरा करताना ते मृत व्यक्तीचे शव शोधून बाहेर काढतात. आणि त्यांना साफ करून ते त्यांचे कपडे बदलून त्यांना दुसरे नवीन कापडे घालतात. 

अजून एक आश्चर्य म्हणजे ते त्यांचा सोबत फोटो देखील काढतात.

आयुष्य जगताना आयुष्याचा उत्सव साजरा करताना आपन पाहिलय ते उपभोगलय पण असे मृत व्यक्ती सोबत असा  

उत्सव साजरा करतात ही एकूण नक्कीच डोक्यात गरगरायला लागेल आणि आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. पण हे खरे आहे.

आपण जीवन जगत असताना शेवट पर्यंत नात्यांमध्ये एकमेकांची साथ देत असतो. आणि मृत्यू हा या नात्याचा शेवट असतो.

इंडोनेशिया तील सुलावेसी बेट

इंडोनेशिया तील सुलावेसी बेटावर राहणारे लोक Torajan people नात्याचा धागा मृत्यु नंतर ही जपतात.

या लोकाना मृत्यु ची अजिबात भीती वाटत नाही. मृत देहाची पण भीती वाटत नाही.

या जमातीतील लोक घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतरही त्यावर अंत्यसंस्कार न करता तो व्यक्ती आजारी आहे आणि झोपला आहे असे समजतात.

आणि म्हणून ते  त्याचा मृत देह घरातच ठेवतात.

त्याला रोजच्या प्रमाणे दोन वेळा जेवण दिले जाते.  तसेच दररोज आंघोळ घातली जाते.

इतकेच नाही तर त्या व्यक्ती जवळ बसून प्रार्थना सुद्धा केली जाते. येथील लोकांच्या मते व्यक्तीवर अंत्य संस्कार करणे

म्हणजे आत्म्याने ही पृथ्वी सोडून दुसऱ्या जन्मात प्रवेश करण्याची प्रक्रिया होय.

मृत व्यक्तीवर पण तसं अंत्य संस्कार न करता येथील लोक म्हशींचा बळी देतात.

मृत व्यक्तीच्या घरातील लोक शक्य तेवढ्या जास्त म्हशींचा बळी देतात. त्यावेळेला त्यांचे अनेक नातेवाईक जमतात.

म्हशीच्या रूपात व्यक्तीच्या जीवना पासून मृत्यू पर्यंतचा प्रवास अशा प्रकारे साजरा केला जातो. असे त्यांचे म्हणणे आहे. 

म्हशीला ते मृत्यु नंतरचे एकमेव वाहन समजतात. जर मृत व्यक्ती कडे म्हेेस नसेल तर त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळवण्या साठी तितकाच जास्त वेळ लागतो असे समजले जाते.

म्हणूनच जास्तीत जास्त म्हशींचा बळी दिल जातो कारण त्या व्यक्तीला लवकरात लवकर पुढचा जन्म मिळवा आणि त्याचा पुढचा प्रवास सुखकर आणि सुलभ व्हावा अशी त्यामागची धारणा असते.

Interesting Facts about Japan जपान विषयी २० रोचक तथ्य

Torajan people मृतदेहाची देखभाल

आधी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी विशीष्ठ वनस्पतीच्या पानांचा उपयोग केला जात असे.  पण आता त्या एवेजी फार्मलीन नावाचे रसायन वापरल्या जाते.  मृतदेह साफ आणि ताजा ठेवतात.

Manene Death Ritual Indonesia

मृतदेह घरात किती देवस ठेवायचा ही त्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर आवलंबून असते.

मृतदेहावर अंत्य संस्कार झाल्यानंतर ते तीन वर्षे वर्षांनी तो मृतदेह मधून बाहेर काढतात. त्या मृत देहाला साफ करून त्यांना नवीन कपडे घातले जाते.

इतकेच नाही तर त्या व्यक्तीला जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर त्या व्यक्ती ला सिगारेट पिण्यास दिली जाते. 

त्यांची मिरवणूक काढली जाते.  त्या व्यक्तींचे म्हणणे असे आहे की असे केल्याने त्यांना त्यांच्या पूर्वजांना वरील प्रेम व्यक्त करता येते. 

आपल्या नवीन पिढीतील व्यक्तींना आपल्या पूर्वजांना पाहता येते. 

Manene Death Ritual Indonesia

त्यांच्या वरील प्रेम व्यक्त करता येतेहा सण म्हणजे पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.

या जमातीतील लोक खूप कष्ट करून पैसे कमावतात पण तो पैसा जिवंत व्यक्तीवर न खर्च करता मृत व्यक्तीं साठी जपून ठेवतात.

Related Posts

Leave a Comment