बायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर

15,083 views

काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आत्मनिर्भर हा शब्द खूप मोठ्या संख्येने इंटरनेटवर ट्रेंड मध्ये आला, कारण पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये स्वदेशी वापरण्याचे आवाहन भारतीय जनतेला दिले, त्याच काळात इंटरनेटवर एक युद्ध रंगले होते, टिकटॉक विरुद्ध युट्युब, भारतामधील लोकप्रिय युट्युब वर चॅनल म्हणजे कॅरीमिनाती, तो आपल्या व्हिडिओ मध्ये सतत कोणाला ना कोणाला रोस्ट करत असतो, त्याच काळात त्याने टिक टॉक विरूद्धचा एक व्हिडीओ प्रसारित केला, तो खूप मोठ्या प्रमाणावर बघितला गेला, नंतर युट्युब नेतो व्हिडिओ काढून टाकला, मग भारतामध्ये इंटरनेटवर एकच युद्ध पेटले, सगळेजण टिक टोक ची रेटिंग कमी करण्या पाठिमागे लागले होते, आणि त्याची रेटिंग 1.4 पर्यंत गेली सुद्धा होती. नंतर बायकॉट चायना हॅशटॅग ट्रेंड झाला 

तसेच तिकडे लडाखमधील फुन्सुक वांगडू उर्फ सोनम वांगचुकनी स्वदेशी वापरण्याबद्दल त्यांच्या यूट्यूब चॅनल च्या मार्फत जनतेला आव्हान केले, आणि त्याचे पडसाद म्हणून खायला चालू झाले, पुण्यामध्ये चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या चळवळी सुरू झाल्या, काही दुकानात  स्वदेशी आणि विदेशी असे स्टिकर माला खाली लावण्यात आले. 

पण काही काळाने असे समजले की आत्मनिर्भर भारत सरकारचे अकाउंट हे टिक टोक वर आहे. त्याला 6.5 मिलियन लाईट्स पण आहेत या बातमीने, नेट करयांनी भारत सरकारला चांगलेच फैलावर घेतले. सध्या या विरोधात समाज माध्यमांवर खूप मोठी टीका होत असताना दिसत आहे. 

Related Posts

Leave a Comment