Jara Jivantika Puja । Jivantika Vrat, जिवतीची पूजा

by Geeta P
1,600 views
Jara Jivantika Puja

Jara Jivantika Puja in Marathi जिवतीची पूजा का केली जाते? Jivantika Vrat याचा अर्थ आणि जिवती तिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्याला दीप पूजन केले जाते. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार हे दीप आहे. दीप हे ज्ञानाचे आणि वृद्धिंगतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

तुम्ही एक दिवा उजळवा त्यापासून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळे दिव्याला वंशवृद्धी चे प्रतीक मानले जाते. या प्रतीकाच पूजन म्हणजेच दीपपूजन होय. 

Jara Jivantika Puja जिवतीची पूजा

संपूर्ण श्रावण महिना प्रत्येकाच्या घरात जिवतीची पूजा प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. या देवतेचे पूजन मातृशक्ती कडून केले जाते.

आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. त्याच बरोबर हि प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे कारण या प्रतिमे मध्ये चार वेगवेळ्या देवतांच्या अशा कि ज्यांचा परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भर याच प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यातील एकहि प्रतिमा बदलेली दिसत नाही. 

Jara Jivantika Puja in Marathi

काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमांकाचे ?

जिवतीची प्रतिमेत प्रथम क्रमांकावर नरसिंह दुसऱ्या बाजूला कालिया मर्दन करणारा कृष्ण तसेच मध्यभागी मुलांना खेळणाऱ्या जरा- जिवतीका आणि सगळ्यात खाली बुध-ब्रहस्पती (गुरु ) यांचा समावेश असतो.आणि याच क्रमांक मध्ये त्यांना पुजले जाते या मागील कारण मीमांसा… 

प्रथम क्रमांकावर भगवान नरसिंहच का ?

भगवान विष्णूनी चवथा अवतार नरसिंहाचा घेतला होता. त्या वेळी ते आपल्या छोट्या भक्तासाठी खांबातून प्रगट होऊन दर्शन दिले होते आणि त्याची वेळोवेळी हिरण्यकशेपू दैत्या पासून रक्षण केले होते हे सर्वांचं परिचित आहे.

बालकाचे रक्षण आणि बालकासाठीच हा अवतार त्यांनी धारण केला होता. म्हणून या प्रतिमेत भगवान नरसिंहाला पुजले जाते. 

याचाच अर्थ भगवान नरसिंह घरात ओढवणाऱ्या संकंटान पासून बाळाचा बचाव करतात.

जसे उंचावरून पडणे, अन्नातून विष बाधा होणे, किंवा आगीपासून होणाऱ्या हानी पासून त्यांचे रक्षण करणे.  

या नंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण श्रावण महिन्यात नाग आणि कृष्ण याना याना विशेष मानतात आणि त्यांची पूजा करतात.

तरी पण नाग वेगळा आणि श्रीकृष्ण वेगळा असे न दाखवता कालिया मर्दन करणारा कृष्ण का? 

आपण जर कालिया मर्दन घटनेचा विचार केला असतात असे लक्षात येईल कि, कृष्ण आणि त्यांचे सवंगडी घेळत असताना त्यांचा चेंडू यमुना नदीत जातो आणि कृष्ण तो परत आणतो.

स्वतः त्या कालियामर्दन शी संघर्ष करतो. खेळणाऱ्या मुलावर आलेला वाईट प्रसंग कृष्ण दूर करतो. आणि त्या कालियामर्दनला न मारता त्याला अभय देऊन जायला सांगतो.

या प्रसंगात सरपटणाऱ्या प्राण्यापासून बचाव करणारा, खेळणाऱ्या बालकांचे संकट काळात रक्षण करतो म्हणून कालियामर्दन सहित कृष्णाचे येथे पूजन केले जाते. 

म्हणजेच बाहेर खेळणाऱ्या बालकांचे हे दोन्ही देव संकटा पासून रक्षण करतात म्हणून याना जिवती च्या पूजन मध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे. 

जरा जिवतीका

मगधनरेश बृह्दरथ नावाच्या राजाला दोन राण्या असतात. राजाचे दोन्ही राण्यावर सारखेच प्रेम असतं परंतु राजाला एकही संतान नसल्यामुळे तो नेहमी चिंतेत असतो.

याच दरम्यान नगरजवळील उपवनात ऋषी चंद कौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांच्या दर्शनाला जातो आणि आपली चिंता त्यांच्यासमोर प्रकट करतो.

यावर चंद्र ऋषी त्यांना एक अंबा देतात आणि हे राण्यांना खायला द्या असे सांगतात. दोन्ही राणेंवर सारखेच प्रेम असल्यामुळे तो आंबा राण्यांना समान प्रमाणात देतो.

यानंतर दोन्ही राण्यांना पुत्र होतात परंतु ते दोन्ही पुत्र अर्धवट अर्भक असतात.

राजा या दोन्ही अर्धवट पुत्रांना जंगलात सोडून येतो. त्याच वेळेस तिथून जरा नावाची एक यक्षणी जात असते.

जरा त्या दोन्ही अर्धवट अर्भकांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधंनाच्या कलेने दोन्ही शकलं सांधते,

मग जरा ते सांधलेले अर्भक संध्याकाळी घेऊन बृह्दरथ राजाला आणून देते.

जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो.

राजा नगरमध्ये जरा यक्षणीच्या उपकार प्रित्यर्थ मंदिर बांधून देतो आणि तिला इष्ट देवतेचा मान देतो.

दरवर्षाला जरा देवतेचा वार्षिक उत्सव सुरू करतो. अशी हि जरा देवी. जरा देवीचा अपभ्रंश जिवतीका असा होतो.    

जिवतीका चा अर्थ दीर्घआयुष्य प्रधान करणारी असा होतो. बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करणारी देवता म्हणून या देवीची पूजा केली जाते. 

Jivantika Vrat
Jivantika Vrat

प्रतिमेत सर्वात शेवटी येते बुध व ब्रहस्पती 

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून त्याच्या हातामध्ये अंकुश धारण केलेला आहे तर ब्रहस्पती वाघावर बसलेले असून त्याच्या हातात चाबूक धरलेला आहेअसे प्रतिमेत दाखवतात.

बुध ग्रहाच्या प्रभावाने जातकास उत्तम व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिमत्ता त्याच बरोबर वाक्यपटुत्व असे अनेक गुण प्राप्त होतात.

तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते. 

बुधाचे वाहन हत्ती असून हत्ती उनमत्तेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावी हेच या प्रतिमा मागचा उद्देश असतो. 

ब्रहस्पती चे वाघ वाहन आहे, ते अहंकाराचे प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो.

अहंकार मानवाच्या प्रगतीत व आध्यत्मिक प्रगतीत बाधा आणते.

आपण ज्ञानाच्या आणि गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा. हेच या बृहस्पती प्रतिमेतू आपल्याला शिकवण मिळते. 

या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

म्हणूनच बुध बृहस्पति यांनाही जीवीकेच्या प्रतिमेत स्थान मिळाले आहे. 

अशा या क्रमाने रक्षण करणाऱ्या देवतांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवतीची पूजा जगातील सर्व रक्षणासाठीची प्रार्थना. 

Jara Jivantika Puja जिवतीची पूजा प्रार्थना

जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

अशा या जीवितेचे पूजन या कारणासाठी केले जाते. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

3 comments

Ashwini Chodankar 26/08/2021 - 7:09 pm

Finally I found proper information and story about this vrat, thanks a lot

Reply
Dipali Nadurkar 03/09/2021 - 6:51 pm

chan story ahe t ay madun adunik kalatlya story pahala midte

Reply
डोम कावळा 04/09/2021 - 10:43 am

धन्यवाद मॅडम

Reply

Leave a Comment