आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असेही म्हणतात.
वारकरी म्हणजे जो नित्य नियमाने आपल्या उपास्य देवता ची वारी किंवा यात्रा न चुकता करत असतो.
वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करत असल्याने यांना वारकरी संप्रदाय म्हणतात.
या संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या उपासनेला आणि त्याच्याकडे जाण्याच्या भक्तांच्या वोडीला किंवा नियमित वारीला खूप महत्त्व दिलेले आहे.
या संप्रदायातील भक्तांनी वर्षातून दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला अशा दोन वाऱ्या केल्या पाहिजे.
याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर शुद्ध माधी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशी ही तुम्हाला पंढरपूर क्षेत्री वैष्णवांची एकच गर्दी झालेली दिसेल
परंतु यामध्ये आषाढी वारीला आणि कार्तिक वारीला खूप मुख्य मानले जाते. परंतु वर्षातून एकदा तरी वारी करणे ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय.
वारकरी संप्रदायाला माळकरी असेही म्हटले जाते. कारण प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची १०८ मनी असलेली माळ असते. या माळीला ते खूप महत्त्व देतात इतर धर्म पंथातही माळेला महत्व आहेत
परंतु वारकरी संप्रदाय ही तुळशीची माळ घातल्याशिवाय कुणालाही वारकरी बनता येत नाही.
माळ घालणे म्हणजे एक नवा अध्यात्मिक जन्म घेणे होय असे त्यांचे मत आहे.
वारकरी संप्रदाय हा भागवत धर्मातच मोडला जातो. या संप्रदायाला भागवत धर्म असेही म्हणतात. भागवत धर्म हा वैष्णव धर्मामध्ये मोडला जातो.
विष्णू आणि श्रीकृष्ण भगवान वासुदेव हेच उपास्य दैवत आहे. वारकऱ्यांचे उपास्य दैवत विठ्ठल आहे विठ्ठल हे विष्णूचे रूप असणाऱ्या श्रीकृष्णाचा अवतार आहे. यासाठीच पंढरपुरास दक्षिण द्वारका असेही म्हणतात.
याचबरोबर विठ्ठलाला इसवीसन अकराव्या-बाराव्या शतका पासून या असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा झालेली आहे.
विष्णू पासूनच विठ्ठल हे नाव बनलेत असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.
पंढरपूर चा विठ्ठल
पंढरपुरचा विठ्ठल हे वारकऱ्यांचे उपास्य दैवत असल्यामुळे पंढरपूर हे त्यांचे मुख्य क्षेत्र आणि चंद्रभागा हे त्यांचे तीर्थ क्षेत्र आहे. विठोबा हा कृष्णाचे रूप आहे अशी सर्व संतांची मान्यता आहे.
त्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्ण उपासक आहे.
वारकरी संप्रदाय द्वारका, काशी ही क्षेत्रे पवित्र मानतात.
तसेच त्यांनी चंद्रभागे प्रमाणेच इंद्रायणी, गंगा, गोदावरी, कृष्णा, तापी या नदियानाही पवित्र मानले जाते.
महाराष्ट्रातील संत
महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात. महाराष्ट्राला संतांची पुराणापासून परंपरा लाभलेली आहे.
भारतीय संस्कृतीत संतांना खूप महत्त्व आहे संत आपल्याला खऱ्या भक्ती ची शिकवण देऊन चांगला मार्ग दाखवतात.
संत आपले गुण दोष स्वीकारून आपल्याला परमार्थ शिकवतात संत हे चालते बोलते देवच असतात. आपल्याकडे संतांना गुरु मान्याची परंपरा आहे,
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव आणि संत समर्थ रामदास हे महाराष्ट्र धर्माचे संत होते.
संत ज्ञानेश्वर
हे महाराष्ट्राला लाभलेल्या संता पैकी सर्वश्रेष्ठ संत आहेत. ज्ञानेश्वरांची समाधी श्री क्षेत्र आळंदी येथे आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी आपले गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
या ज्ञानेश्वरी ला भावार्थ दीपिका असेही म्हणतात. तसेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले.
ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला
माझा मराठीचा बोलु कौतुके |
परी अमृतातेही पैजासी मिळविण ऐसी जिंके|ऐसी अक्षरे रसिके |
मीळ वीन |
असे सांगून त्यांनी मराठीचे महत्व व्यक्त केले आहे. मराठी भाषे विषयी अभिमानही आणि त्याची महिती त्यांनी समाजाला सांगितले. जो जे वांछिल तोते लाहो असे म्हणून अखिल विश्वाची काळजी घेणाऱ्या महाराजांनी वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात.तसेच त्यांनी वारकरी संप्रदायचा पाया रचण्याचे काम केले.
अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधि घेतली.
अशा या थोर संताचे मंदिर आळंदी येथे आहे आळंदी हे गाव पुण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे।
संत नामदेव
“ नाचु कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी”
असे नामदेव महाराजांचे ध्येय होते. संत नामदेवांनीही थोर ज्ञानेश्वर महाराजा प्रमानेच मराठी साहित्य लिहिले. त्यांना संत शिरोमणी असे म्हणत. संत नामदेव हे वारकरी संतातील एक संत कवी होते.संत नामदेवांनी वज्र भाषेत ग्रंथ काव्य रचली.
गुरु ग्रंथसहीबा अशा ग्रंथात त्यांनी चित्रकाराच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत ग्रंथ पंजाब पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. संत नामदेव हे लाहानपणा पासूनच विठ्ठलमय होते.
त्यांची विठ्ठलावर अपार भक्ती होती त्यामुळेच तर विठ्ठलाला त्यांच्या हट्टापाई दुधाचा नैवेद्य खरोखरच प्यावा लागला.
त्यांचे असे म्हणणे होते की प्रत्येक कणाकणात देवाचा वास असतो.
त्यांना प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये देव दिसायचे त्यांची एक आख्यायिका का पण आहे.
एकदा संत नामदेवाना खूप भूक लागली होती त्यामुळे ते चपात्या बनवते होते. तेव्हा तिथे एक मागून कुत्र आलं आणि त्यानी चपात्या तोंडात घेतल्या.आणि तो पळू लागला त्याच्या मागे संत नामदेव ही तुपाचीलोटी घेऊन पळू लागले शेवटी त्यांनी कुत्र्याला पकडले. आणि त्याच्या चपातीला तूप लावून नंतर त्याला चपाती खाऊ घातली. यावरूनच असे लक्षात येते की त्यांना प्रत्येक जिवात देव दिसत होता.
अशा त्यांच्या निस्सीम भक्तीमुळे आजही पंढरपुरात आधी त्यांच्या पायरीचे दर्शन घेऊन नंतरच विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते.
संत एकनाथ
एकनाथ महाराज हेदेखील एक वारकरी सांप्रदायातील एक संत होते, त्यांचा जन्म पैठण या गावी झाला. त्यांची आई रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव सूर्यनारायण असे होते.
एकनाथांच्या आई-वडिलांचा मृत्यू दुर्दैवाने त्यांच्या बालपणीच झाला, त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे अजोबा चक्रपाणि यांनी केले. एकनाथांचे पंजोबाभानुदास हे आधीपासूनच विठ्ठल भक्त होते,
त्यामुळे एकनाथ महाराजांमध्ये क्तीचे बीज रुजवले गेले होते.
वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज केली आणि त्यांना शिक्षणासाठी एका विद्वान पंडितांकडे पाठवले.
महाराजांनी लहानपणी रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा अभ्यास केला.
त्यांनी दौलताबादच्या जनार्दन स्वामी ना आपले गुरु मानले होते व गुरूंकडून त्यांनी योग, शास्त्र, भक्तियोग याचे धडे घेतले आणि बराच काळ त्यांनी ध्यान धारनेत आणि अध्ययनात घालवला.
महाराजांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची आणि हरिकीर्तनाची आवड होती.
जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरू दत्तोपासक होते. गुरुभक्तीने आणि गुरू सेवेने त्यांना दत्तात्रयाचे दर्शन झाले होते असेही म्हणतात.
ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला तर संत एकनाथ हे त्याचे स्तंभ बनले म्हणून तर कवी म्हणतात‘जनाईनी एकनाथ स्तंभ दिला भागवत” संत एकनाथांचे नाव सगळ्या संतांमध्ये आगळेवेगळे आहे. कारण त्यांनी आपल्या कृतीतून लोकांना दाखवून दिले की परमार्थ आणि प्रपंच या दोन वेगळ्या गोष्टी नाही प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो आणि त्यांनी असेच केले .
संत तुकाराम
तुकाराम महाराज एक वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते, त्यांच्या कार्यामुळे त्याना वारकरी संप्रदायातील लोक जगद्गुरु अशा नावाने ओळखतात. महाराजांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला देहू येथे झाला.
पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते, तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा निर्माण केली. महाराज हे एक लोककवी होते
जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देवतेथे ची मानावा!
आशा प्रकारचे अभंग महाराजाणी लोकांना सांगून भक्ती करण्याचा सोपा मार्ग त्यांनी पटवून दिला.त्याचबरोबर सतराव्या शतकात समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची मुहूर्तमेढ संत तुकारामांनी रोवली.
तसेच त्यांनी अचूक मार्गदर्शन देण्याचे काम आपल्या अभंगातून आणि आपल्या कीर्तनातून लोकांना दिले .
ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला तर तुकाराम महाराज त्याचे कळस बनले.महाराष्ट्रचा हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत.
त्यांचे अभंग लोकप्रिय होते त्याचबरोबर तुकाराम महाराजांची अभंग गाथा लोकांच्या मुखामध्ये कायम आहे.
गाथा बुडवल्यानंतर जनसामान्यांच्या तोंडून ऐकून गाथा जिवंत असल्याचा अनुभव झाला.
इंद्रायणीच्या काठी असंख्य जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले तेव्हा तुकारामांना आपली गाथा जिवंत आहे ती बुडाली नाही असा अनुभव आला.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामाचा सदेह वैकुंठाला गेला असे म्हणतात यालाच तुकारामबीज असे म्हणतात.
तुकाराम महाराज संसारी असून सुद्धा त्यांनी आपल आयुष परपार्थ करण्यात घातला.
तुकाराम महाराज हे सावकार होते परंतु सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबान विषयीत्यांना कळवळा होता.
त्यांचे अंतकारण आभाळा सारखे विशाल होते जे आपण भोगले ते लोकानी भोगू नये असे त्यांना वाटे.
त्यामुळे त्यांचा कडे जे काही होते ते सगळ लोकाना वाटायचे.
कर्जदारांचे कर्ज माफ केले करणारा जगातील पहिला माणूस असेल. त्यांना समाजामध्ये समता असावी असे वाटे. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते.
जगाचा संसार सुरळीत चालावा यासाठी त्यांनी आपल्या अभंगातून समाजाला मौलिक मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन जगाच्या कल्याणासाठी उपयोगी आले.
समर्थ रामदास स्वामी
रामदास स्वामी यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमिस रामनवमीचा मुहूर्तावर औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या गावी झाला. रामदास स्वामी लहान असताना खुपच खोडकर होते.
गावातील लोक रोज काही ना काही तक्रारी घेऊन त्यांच्याआई कडे यायचे.
मग त्रासलेल्या त्यांच्या आईने त्यांना ओरडून म्हटले की,
तू दिवसभर दुसऱ्यांच्या खोड्या काढत असतो त्यापेक्षा काहीतरी काम करत जा बघ तुझा मोठा भाऊ कसे कुटुंबाकडे लक्ष देतो.
आणि कामे करतो हे शब्द नारायणाला (हे त्यांचे बालपणीचे नाव) म्हणायला लागले.
आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नारायण एका खोलीमध्ये दडून बसले पूर्ण दिवसभर नारायण दिसला नाही, म्हणून आईने मोठ्या भावाकडे विचारले.
पण त्यानेही नारायणाला पाहिले नव्हते मग खूप काळ गेल्यानंतर आईचे लक्ष घरामध्ये एका फडताळात गेले, तिथे नारायण शांत बसले होते
आईने विचारले इथे काय करतोस तेव्हा नारायणाचे उत्तर होते की मी इथं बसून सगळ्या विश्वाची चिंता करतो. (दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची करतो)
समर्थ रामदासांचा जीवनात ही घटना त्यांचा आयुष्याला कलाटणी देऊन गेली. त्या दिवसा पासून त्यांनी त्यांची दिनचर्या बदलवून, समाजातील तरुण युवकाना आरोग्य आणि सुदृढ शरीरयष्टीने राष्ट्राची उन्नती शक्य होते हे समजावले.
व्यायाम करून शरीर सुदृढ करण्याचा सल्ला दिला.
बुद्धीचे आणि शक्तीचे उपासक बजरंग बली यांची उपासना करून त्यांचे मंदिर उभा केले. तसेच समर्थ रामदास यांनी भारतभर पदयात्र केली.
आणि त्यांनी समाजाच्या चेतने साठी जागोजागी मंदिर आणि मठांची स्थापना केल.
पायी चालत असताना त्यांना पंचवटी येथे रामाचा साक्षात्कार झाला असे म्हणतात,
ते स्वतःला रामदास असे म्हणवत. नाशिक मध्ये त्यांनी टाकळी या ठिकाणी बारा वर्ष तप साधनेत घालवले.
ते सकाळी पहाटे ते सूर्याला १२०० सूर्यनमस्कार घालत असत,
आणि बाकी वेळ नदीमध्ये उभारून गायत्री मंत्राचा जप करत आणि नंतरत्यांनी
श्री राम राम जय जय राम या मंत्राचा जप करत.
त्यांनी यादरम्यान तेरा कोटी रामाचा जप केला होता. त्या त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा उदय होत होता.
शिवाजी महाराज समर्थ रामदास यांच्या कार्य कार्याने खूप प्रभावित झाले होते.
अधून मधून त्यांच्याशी सल्ला मसलत करत आणि त्यांचे मतही विचारत रामदासांनी बरेच ग्रंथ लिहिले.
मनाचे श्लोक, दासबोध. दासबोध हा त्यांचा प्रमुख ग्रंथ होता.
तसेच मनाचे श्लोक लिहून त्यांनी मनालाही संस्कारित करण्याचा मार्ग दाखवला.
सातारा जिल्ह्यातील परळी या ठिकाणी त्यांनी आपला अंतिम काळ व्यतीत केला हाच गड पुढे सज्जनगड म्हणून ओळखला गेला.
तसेच त्याची त्या ठिकाणी समाधीही आहे. दरवर्षी दास नवमीला या ठिकाणी हजारो भाविक गर्दी करतात.