Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

Published Categorized as Health

मोड आलेले कडधान्य किंवा अंकुरित केलेले कडधान्य म्हणजे Sprouts खातात. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. मोड आलेले कडधान्य चविला चांगले असतात.  तसेच ते पचायलाही हलकी असतात.  त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कडधान्याचा वापर केला पाहिजे.

नॅचरोपॅथी मध्ये मोड आलेले कडधान्य एखाद्या औषधासाठी वापरले जातात. सकाळच्या नाश्त्याची आहारात मोड आलेले कडधान्य घेतल्याने शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळतात. 

असे काही तज्ञांचे मत आहेत. आज आपण अशाच मोड आलेल्या कडधान्यांचा शरीराला कसा फायदा होतो आणि ते काय आहे ते जाणून घेऊयात. 

Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे

मोड आलेले कडधान्य ( Sprouts) म्हणजे नेमकं काय?

मोड आण्यासाठी सात ते आठ तास धान्य पाण्या मध्ये भिजत ठेवले जाते. नंतर त्याला त्या कपड्यां मध्ये घट्ट बांधून उबदार जागे मध्ये बंद करून ठेवतात.

या प्रक्रियेला आठ ते दहा तासानंतर कडधान्याला मोड येतात या धान्य अंकुरित धान्य किंवा मोड आलेले धान्य म्हणतात. 

कडधान्य रात्रभर भिजत घातल्याने त्यातील टॅनिन आणि फायटीक ऍसिड चे प्रमाण कमी होते. स्टार्च चे प्रमाण साधारणपणे ग्लुकोज, फ्रक्टोज, मालटोज शर्ककरेत रूपांतरित होते. 

त्यामुळे ते खायला चविष्ट लागते. आणि पचायलाही हलके असते. त्यामुळे आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करावा.

Sprouts
Sprouts

मोड आलेले कडधान्य मध्ये ही पोषकतत्वे असतात

मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रकारचे पोषकतत्वे असतात.

त्यामध्ये विटामीन ए,बी, सी. डी आणि क. ही मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस. पोटॅशियम आणि लोह हे ही पोषक तत्वे असतात. आणि फायबर, Omega-3 fatty acids हे ही मुबलक प्रमाणात असतात.

त्यामुळे कडधान्य खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतात. म्हणून आहारामध्ये कडधान्यांचा वापर नियमित करावा.

मोड आलेले कडधान्य खाल्ल्याचे शरीराला खालील फायदे होतात 

मोड आलेले धान्यखाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तर मोड आलेले किंवा अंकुरित कडधान्य खाऊन खालील आजारापासून वाचू शकतात. 

वजन कमी करण्यासाठी मोड आलेले कडधान्य वापर

मोड आलेले कडधान्य आहारात वापरून तुम्ही तुमचे वजन आटोक्यात आणू शकता. कारण मोड आलेल्या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. 

त्यामुळे ते सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही. आपण अन्ना पासून काही काळ दूर होऊ शकतो.  त्यामुळे आपल्या पोटात कॅलरीज जात नाही.  त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

स्टॅमिना वाढतो

स्टॅमिना वाढणे म्हणजे शरीराला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभणे. स्टॅमिना वाढल्या मुळे तुम्ही दिवसभर शारीरिक कष्ट करू शकता. कडधान्य हे शरीराला पुरेशी ऊर्जा देत असतात.

तुम्ही त्यामध्ये कडधान्याचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.  तुमचा स्टॅमिना टिकून राहील. दिवसभर तुम्हीफ्रेश आणि उत्साही रहाल. 

डोळ्याचे आरोग्य सुधारते 

मोड आलेले कडधान्य खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. डोळ्याची दृष्टी सुधारते. त्यामुळे डोळ्या चे विकार होत नाहीत.

पचनक्रिया सुधारते 

आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केल्याने पचन क्रिया सुधारते आणि ॲसिडिटी कमी होते. कारण धान्य आलं मोड आणण्याचा प्रक्रियेमध्ये धान्यातील  कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन चे प्रमाण आणखी वाढते.

त्यामधील पाचक गोष्टी प्रमाण वाढते. त्यामुळे ते पचायला अगदी हलके असतात. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

नियमित आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शरीरातील विष द्रव्य बाहेर टाकली जातात.

आजार कमी होतात. आणि आपण शरीरामध्ये रोगाशि लढण्याची शक्ती वाढते आणि आपण निरोगी राहतो.

मधुमेहासाठी मोड आलेले कडधान्य उपयोगी

जर तुम्ही  मधुमेहा सारखे आजार असतील तर तुम्ही आपल्या आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर जरूर करावा.

काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार मोड आलेले कडधान्य शरीरातील शर्करेचे प्रमाण समतोल ठेवण्यास मदत करते.

मेथीचा आहार वापर केल्यास फायदा होतो. 

केस आणि त्वचेचा आरोग्यासाठी कडधान्य उपयुक्त.  कड धान्याचे रोजच्या आहारात समावेश केल्यास त्यात असणाऱ्या विटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे शरीरातील रक्त शुद्ध होत.

याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. त्वचा नितळ होते आणि चमकदार दिसते. केसही मजबूत होण्यास मदत होते.

हृदयरोगाच्या आजारापासून सुटका

कडधान्याच्या सेवनाने हृदयरोग यांसारख्या आजारांपासून आपला बचाव होतो.  यासाठी रोज एखाद्या तरी मोड आलेले कडधान्य यांचा आहारात समावेश करावा.

कडधान्य तील पोषक तत्वे कोलेस्टरॉल प्रमानीत ठेवण्यासाठी मदत करतात.  तुम्हाला हृदयरोग यांसारख्या आजारांपासून सुटका करतात. 

मोड आलेल्या कडधान्यांचा Sprouts रोज आहारात वापर करा आणि हेल्दी आरोग्य जगा. 

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.