Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.

Published Categorized as Religion

हिंदू धर्मामध्ये चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. आणि Shravan Somwar हे अधिक महत्वाचे मानले जातात

या महिन्यात सर्व सण असतात यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते.

आणि श्रावणातील सोमवार तर अगदी निष्ठेने धरतात. 

Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.

पण तुम्हाला या श्रावण सोमवार विषयी माहिती आहे का?

श्रावण महिन्यातील सोमवार Shravan Somwar हे शिवाच्या पाच चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहे. आज आपण याविषयी मनोरंजक माहिती जाणून घेणार आहोत.

महादेवाचे पंचमुख हे पंचमहाभूतांचे प्रतीक मांनले जाते. त्यांचे दहा हात हे दहा दिशांचे सुचक मानले जातात.

आणि त्या हातात असणारे अस्त्र-शस्त्र हे जगाच्या संरक्षणा साठी हातात आहेत असे मानतात. 

श्रावण महिन्यातील सोमवार ला जसे महत्त्व आहे तसेच महादेवाच्या पंचमुखालाही खूप महत्व देतात. अनेक विद्वानांचे असे म्हणणे आहे की

सृष्टी, स्थिति, लय,,कृपा आणि ज्ञान,,या पाच शक्तींची निर्मिती करणारे या शक्तींचे संकेत म्हणजे महादेवाचे हे पाच मुख.

हे पंच मुख आपल्याला दिशांचे ही ज्ञान करून देतात कारण

पूर्वे कडील चेहरा  दृष्टी, दक्षिणे कडील चेहरा स्थिती, पश्चिमे कडील चेहरा प्रलय, उत्तरे कडील चेहरा कृपा, ऊर्धवमुख हे ज्ञान चे प्रतीक आहे.

श्रावण शब्द हा श्रवण पासून बनलेला आहे. याचा अर्थ श्रवण करून धर्माला समजून घेणे होय. हा महिना संतसंगासाठी आणि भक्ती भागा साठी असतो.

श्रावणाचे सोमवार आणि श्रावण महिन्या बद्दल पुराणात बरंच काही आढळ जातं. याच्या बद्दल आपण काही पौराणिक कथा ऐकणार आहोत.

Shravan Somwar
Shravan Somwar

पुराणातील भगवान परशुराम यांची कथा

भगवान परशुराम यांचे आराध्य दैवत शंकर महादेव होते. असे म्हणतात की याच महिन्यात भगवान परशुराम यांनी आपले आराध्य दैवत भगवान महादेवाची नित्यनियमाने पूजापाठ करून,

त्यांना आपल्या कावडीतून पाणी आणून जलाभिषेक केला होता. 

म्हणून कावडीची प्रथा चलविणारे भगवान परशुराम यांची ही पूजा याच श्रावण महिन्यात केली जाते.

भगवान परशुराम हे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी Shravan Somwar कावडीतून पाणी आणून आणि जलाभिषेक करून शंकराची मनोभावे पूजा करायचे.

भगवान शंकरांना श्रावणी सोमवार हा अधिक प्रिय आहे. असे म्हणतात की भगवान परशुराम मुळेच श्रावण महिन्यातील पूजेचे आणि उपवासाचे महत्त्व चालू झाले. 

पुराणातील दुसरी कथा

पुराणामध्ये अशी कथा आहे की. जेव्हा कुमारांनी महादेवांना प्रश्न केला की तुम्हाला श्रावण सोमवार Shravan Somwar आवडीचा का?

तेव्हा महादेवांनी सनत्कुमार यांना सांगितले की,

देवी सतीने जेव्हा हा आपला पिता दक्ष त्यांच्या घरात योगशक्ती ने शरीराचा त्याग केला होता. देवी सतीणे यापूर्वी महादेवाची पूजन करून आणि त्यांना प्रसन्न करून प्रत्येक जन्मामध्ये तिचा नवरा होणार असा प्रन केला होता

आपल्या दुसऱ्या जन्मात सतीने पार्वती च्या रूपात जन्म घेतला आणि ती राजा हिमाचलराणी मैनाचा घरात पार्वती म्हणून जन्माला आली.

पार्वतीने आपल्या तरुण वयात कठीण उपवास करून महादेवांना प्रसन्न करून घेतले.  तो महिना श्रावण महिना होता.

त्यानंतर त्यांचे लग्नही झाले. त्या त्यामुळे श्रावण महिन्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.