6 Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे

by Geeta P
589 views
Benefit of Curry leaves

Benefit of Curry leaves कढीपत्ता व त्याचे हे फायदे ऐकून तुम्ही निश्चितच तुमच्या आहारात त्याचा वापर वाढवाल 

आपल्याकडे प्रत्येक फोडणीत जाणारा एक पदार्थ म्हणजे कढीपत्ता. आमटी असो, कडी असो किंवा वरण असो यावरील तरंगता कढीपत्ता पाहूनच तोंडाला पाणी सुटते.

Benefits of Curry Leaf in Marathi

काहीजण खाताना हळूच ताटा मध्ये बाजूला काढून ठेवतात. 

पण आज आपण या कढीपत्त्याचे असे काही फायदे पाहणार आहोत जे वाचून तुम्ही निश्चितच कढीपत्ता खायला सुरुवात कराल. चला तर मग या बहुगुणी कडीपत्त्याचे फायदे पाहु

कढीपत्त्याचे बहुगुण Benefit of Curry leaves

एवढे गुण गाणाऱ्या आणि पदार्थांना अधिकच चव देणाऱ्या या कढीपतत्या मध्ये काही विशेष गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला आणि सौंदर्याला ही फायदेशीर असतात.

कढीपत्त्या मध्ये कर्बोदक, आयरण , कॅल्शियम, फॉस्फरस त्याचबरोबर विटामिन सी, विटामिन ई, विटामीन बी हे घटक प्रामुख्याने आढळून येतात. 

ते तुमच्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतं. विविध शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार कडीपत्ता हा जेवढा शरीरासाठी बहुगुणी आहे. 

तेवढाच तो त्वचेसाठी आणि तुमच्या केसांसाठीही तितकाच फायदेशीर आहे. 

कढीपत्ता केसांचे आरोग्य वाढते Benefits of Curry Leaves for Hair

कढीपत्ता केसांचा कुठलयाही समस्यांवर म्हणजे केस गळणे, केस पांढरे होणे, केसातील कोंडा, केस कोरडे होणे अशा समस्यांवर खूप बहूउपयोगी आहे.

चुकीच्या आहारामुळे आणि वयोमाना नुसार केसांमध्ये समस्या उद्भवतात. पण कडीपत्ता मध्ये असणारे कॅरेटीन आणि प्रोटीन तुमच्या केसांना चमकदार बनवतात.

केसांचे गळण्या पासून रक्षण करतात. कडीपत्याचा वापरामुळे केसाना मजबूती प्राप्त होते. कडीपत्याचे तेल बनवूनही आपण वापरात आणू शकतो.

तसेच कडीपत्त्याचे आणि दह्याचे लेप बनवूनही आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. 

Benefit of Curry leaves
benefits of curry leaves for hair

कडीपत्ता त्वचेचा समस्यांवर फायदेशीर Benefits of Curry Leaves for Hair and Skin

आज-काल सर्वानाच त्वचेचा समस्याना सामोरे जावे लागते.

त्यात चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरुळ येणे ,काळे डाग, त्वचेवर सुरकुत्या अशाप्रकारच्या अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. अशा या समस्यांवर कढीपत्ता उपयोगी ठरतो.

कढीपत्ता मध्ये असणारे विटॅमिन ए, बी.सी हे आपल्या चेहऱ्याला मुरमान पासून दूर ठेवते. आणि काळे डागाणा घालवते.

कढीपत्त्याचा काढा करून त्यात लिंबू आणि आले घालून पिल्यास शरीरात डिटॉक्स तयार करते.  रक्त शुद्ध होऊन चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात.

तसेच तुम्ही कडीपत्त्याचे फेस पॅक बनवूनही त्याचा वापर करू शकता.

तसेच कढीपत्ता त्वचेवर येणाऱ्या रॅशेषलाही कमी करतो. आपली त्वचा नाजूक असते.  त्यावर चटकन रॅशेष येतात आणि ते खूप खाजतात. 

ते अधिक लाल होतात आणि मग जखम पण होऊ शकते.  तर या वर ही तुम्ही कढीपत्त्याचा आंघोळीच्या पाण्यात घालून उपयोग करू शकता, आणि या समस्ये पासून स्वतःला दूर ठेऊ शकता.

Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

कढीपत्ता Anemia ठेवतो दूर

शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे Anemia होऊ शकतो. जर तुम्हाला शरीरातील आयर्न कमी झाले असेल तर त्यासाठी कढीपत्ता एक नैसर्गिक उपाय आहे. 

कढीपत्या मध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी एका खारके बरोबर दोन चार कडीपत्त्याचे पाण चाउण खाल्ल्यास लोहाचे प्रमाण वाढते. अशक्तपणा दूर होऊन Anemia बरा होतो. 

अपचनाच्या त्रासापासून वाचवतो

कढीपत्ता हा पचनशक्ती वाढवतो त्यामुळे तो फोडणी मध्ये वापरला जातो. कारण डाळी, कडधान्य पचण्या साठी जड असतात. त्यात कढीपत्ता घातल्या मुळे ते पचायला हलके जाते.

अपचनाचा त्रास झाल्यावर तुम्ही दोन चार कढीपत्त्याची पाने  चाऊन त्याचा रस घेतल्यास लगेच आराम मिळतो. 

Benefits of Curry leaves कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त 

तुम्हाला जर कोलेस्टरॉल असेल तर तुम्ही नक्की तुमच्या आहारात कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्ता कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. आरोग्य चांगले ठेवतो.

आरोग्याच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर ठेवण्यासाठी कढीपत्ता अत्यंत चांगले नैसर्गिक औषध आहे. कडीपत्ता मध्ये सर्व प्रकारचे गुण असल्या मुळे ते आपल्याला रोगाशी लढण्याची ताकद देतात.

आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि आपले आरोग्य सुधारते.

त्यामुळे आजपासून आपल्या आहारात कढीपत्त्याचा वापर चालू करा आणि आरोग्य आणि सौंदर्य टिकुन ठेवा. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment