Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

By | July 20, 2020
मंदिरा समोर कासव

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मंदिर वसलेले आहे. आणि प्रत्येक मंदिरा समोर कासव असतोच.

आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगाच्या वेळी आपण मंदिरामध्ये नेहमी जात असतो. मंदिरात गेल्याने आपल्याला एक सकारात्मक उर्जा प्राप्त होते.

Tortoise in Temple

थोडक्यात काय तर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या आनंदाच्या वेळी मंदिरात जाऊन त्या देवाचे आभार व्यक्त करतो.

दुःखाच्या वेळी सहन करण्याची ताकद मिळवण्यासाठी आणि आपली बुद्धीने सकारात्मक विचार करावा यासाठी मंदिरात जाऊन नतमस्तक होतो. 

पण या सर्वांमध्ये मंदिरात गेल्यास आधी कासवाचे दर्शन घेऊन मगच देवाचे दर्शन घेतले जाते, असे का? याचा कधी विचार केलाय का?

जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण मंदिरा समोर कासव आधी कासवाचे दर्शन घेतो.  आणि नंतर आपण गाभाऱ्यातील देवाचे दर्शन घ्यायला जातो.

मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

असे म्हणतात की कासवाला त्याच्या सत्वगुणामुळ ज्ञानप्राप्ती झाली होती. पुराणात असे सांगितले जाते की कासवाला विष्णू कडून असे वरदान मिळाले होते.

कारण श्री विष्णूंना कुंडलिनी जागृत करण्यासाठी कासवाणे प्रार्थना केली होती.

त्यामुळे विष्णूनी कासवाला आपल्या मंदिरा समोर कासव मंदिरात प्रवेश द्वारा जवळ जागा दिली. आणि कासवाला हे वरदानही प्राप्त झाले आहे. 

कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. कासव श्री विष्णूंना शरण आले होते, म्हणून त्यांचे लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असते.

Tortoise in Temple
Tortoise in Temple

कासवाला सहा अंगे असतात. (४ पाय, १ तोंड १ शेपूट) त्याचप्रमाणे माणसांमध्ये ही काम ,क्रोध ,मद , लोभ, मोह, मत्सर अशी दुर्गुण असतात.

ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग आकुंचन घेऊन मंदिराच्या समोर असतो. त्याचप्रमाणे माणसाने हि आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा.

कासव ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते. त्याचप्रमाणे देवानेही आपल्या भक्तांवर अशीच कृपादृष्टी असावी अशी त्यामागची भावना आहे.

त्याचबरोबर कासव याप्रमाणे आपल्या इच्छे नुसार सर्व आकुंचुन घेतो. त्याचप्रमाणे भक्ताने मंदिरात जाताना आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवणे महत्वाचे आहे. 

हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

इंद्रिय मोकाट सोडून देवाची भक्ती होऊ शकत नाही. हे आपल्याला कासव शिकवते. ज्याप्रमाणे योगी लोक जगा पासून अलिप्त राहून भगवंत चरणी होतात.

भक्ती करतात त्याचप्रमाणे भक्तांनी हीच वृत्ती ठेवून देवाची भक्ती करावी.

त्याचबरोबर भक्ताने या मायावी आणि भौतिक चक्रातून स्वतःला बाजूला ठेवून निस्वार्थपणे भक्ती करावी तसे मंदिरातील कासव सांगते.

म्हणून कासवा सारखे या वृत्ती पासून बाजूला राहून भगवंताचे दर्शन घ्यावे. 

हेच कारण आहे मंदिरा समोर कासव असण्याचे, कासवाचे दर्शन करूनच मग देवाचे दर्शन घेतात. 

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.