गुरूवार, जून 24

16 फुट जमिनीखाली आशिया खंडातील सर्वात मोठे पुस्तकालय

भारताचे स्थान हे जगामध्ये अग्रेसर आहे कारण भारत महासत्ता बनवण्याच्या रस्त्याने जात आहे, परंतु आशिया खंडामध्ये भारताचे स्थान हे खूप महत्वाचे मानले जाते. कारण ही तसेच आहे विविध व्यवसाय आणि त्या मधून मिळणारे उत्पन्न सुद्धा आहे. भारतातील ऐतिहासिक राज्य म्हणजे राजस्थान, राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर  मोठमोठे महाल किल्ले,  वाळवंट,  राजस्थानी पोशाख इत्यादींचे चित्र समोर येते. 

पण याच राजस्थानामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये थारच्या वाळवंटात एक भूमिगत लायब्ररी आहे.  त्या लायब्ररीमध्ये तब्बल नऊ लाख पुस्तके आहेत. ज्या ठिकाणी भारतामध्ये अनुचाचणी झाली ते ठिकाण म्हणजे पोखरण आणि त्या जवळ के लायब्ररी जैसलमेर जिल्हातल्या भदारिया  या छोट्याशा गावांमध्ये आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल चार हजार लोक एकत्र वाचू शकतील एवढी मोठी जागा आहे.  या लायब्ररीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही लायब्ररी जमिनीच्या 16 फूट खाली स्थित आहे. आणि याच कारणामुळे तिथल्या प्रचंड गर्मी चा फरक त्या लायब्ररीमध्ये बसल्या जाणवत नाही. 

 या लायब्ररीचे महत्त्व म्हणजे जगदंबा सेवा समितीच्या माध्यमातून संत हरबंश सिंग निर्मल यांनी बांधली आहे. संत हरबंशसिंगांनी विविध उपक्रम हाती घेतले,  त्यांनी तेथील तरुणांना नशा मुक्त केले,  त्यांच्याकडून श्रम करून घेऊन तिथे एक मंदिर आणि ही लायब्ररी उभी केली,  त्यामध्ये त्यांना गावकऱ्यांचा खूप मोठा हातभार लागला.  जेव्हा पर्यटक येथे येत असतात तेव्हा ते त्यांना पुस्तक भेट म्हणून देत असत. असे पुस्तक जमत जमत त्यामध्ये इतकी मोठी भर पडली की आज लायब्ररीमध्ये तब्बल नऊ लाखांपेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत.

या लायब्ररीत जवळपास ५५० संदर्भग्रंथांची कपाटे आहेत. यारा लायब्ररीमध्ये जगातील सर्वात जुने ग्रंथ, न्यायालयीन पुस्तके,  मोठ्या  दिग्गजांची आत्मचरित्रे,  भाकिते इत्यादींचा समावेश आहे. साधारण  1998 साली ही लायब्ररी बांधण्यासाठी सुरुवात केली. या लायब्ररी मध्ये प्रवेश केल्यावर आपोआप  तेथील लाईट लागतात.त्याला वरील सर्व पुस्तके हे लाकडी प्रेम असलेल्या खाण्यामध्ये जतन केलेले आहेत. या लायब्ररीची भव्यता खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी गणली गेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.