5 Benefits of Blowing Shankh at Home while Pooja

by Geeta P
725 views
Benefits of Blowing Shankh

देवाच्या पूजेमध्ये शंख का वाजवला जातो?

Benefits of Blowing Shankh समुद्रमंथना मधून निघालेल्या चौदा रत्नांन पैकी शंख एक रत्न आहे. सनातन परंपरा धर्मात पूजेमध्ये शंखाचे खूप महत्त्व आहे.

आपण पाहिले असेल हिंदू धर्मातील प्रत्येक देवी-देवतांचे हातामध्ये शंख असतो.

वैदिक साहित्या पासून पौराणिक कथांमध्ये शंखाचे अनेक उदाहरण असलेली दिसून येतात. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये शंखाला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 

असेही म्हणतात की, ज्या प्रमाणे शंख समुद्रमंथनातून निघाले त्याचप्रमाणे माता लक्ष्मीहि समुद्रमंथनातूनच जन्मल्या आहेत.

त्यामुळे या दोघांचे बहिण भावाचे नाते मानले जाते.त्यामुळे कुठल्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये शंखाचे पूजन केले जाते. 

(Why are conch shells used in worship of god, know the benefits of sprinkling water with conch) 

Benefits of Blowing Shankh
Which type of shankh is Good for Home

Which type of shankh is Good for Home

भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या शंख 

भगवान विष्णूंना विशेषतः शंख खूप प्रिय आहे. त्यामुळे जिथे भगवान विष्णूची पूजा होते तेथे शंखाची पूजा असतेच.

महाभारतामध्ये भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला होता तेव्हा त्यांच्याकडे पाचजन्य नावाचा शंख होता.

त्याच बरोबर पांडू पुत्रांन कडे काही शंख होते. त्यापैकी युधिष्ठिराकडे अनंत विजय, अर्जुनाकडे देवदत्त, भीमा कडे पौडू शंख, त्याचबरोबर नकुल कडे सुघोष तर सहादेवाकडे मणीपुष्पक नावाचे शंख होते. 

मुळामध्ये शंखाचे दोन प्रकार पडतात. एक दक्षिणावर्त आणि वामावर्त. 

Dakshinavarti Shankh दक्षिणावर्ती शंख

या शंखाला विशेष महत्त्व आहे कारण या शंखाच्या पडदा दक्षिण दिशेला उघडतो त्यामुळे हा शंख सहजासहजी सापडत नाही.

त्याचबरोबर या शंखाचे मूल्य जास्त असण्याचे कारण हेच आहे. असे म्हणतात की ज्यांच्याकडे देवघरात हा दक्षिणावर्त शंख असतो त्यांच्या घरात सर्व मंगल असते.

त्या घरामध्ये मातालक्ष्मी जास्त काळ वास्तव्यास राहते. दक्षिणावर्ती शंख दररोज पूजन केल्यास दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होते.

Vamavarti Shankh वामावर्त शंख 

वामावर्ती शंख Vamavarti Shankh आवर्त म्हणजे या शंखाच्या घेर हा डाव्या बाजूला असतो.

असे म्हणतात की घरामध्ये रोज शंख वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

शंख वाजवण्यास त्याचा ध्वनी जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत असलेले सर्व सर्व अडथळे, दोष दूर होतात. आणि घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. 

Benefits of Blowing Shankh

घरातील पूजेमध्ये रोज शंख वाजवण्याचे फायदे

पूजेच्या ठिकाणी शंख हा नेहमी पाण्याने भरलेल्या ठेवावा. 

घरामध्ये सकाळ-संध्याकाळ शंख वाजवल्याने भूत,प्रेत किंवा बाहेरील बाधा दूर होते. 

शंखातील पाणी घरात शिंपडल्याने घर शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

हि पाच झाडे घरात चुकूनही लावू नका

शंख वाजवल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि फुफ्फुसे नेहमी मजबूत राहतात. 

शंख वाजवल्याने सूक्ष्मजीव आणि जीवजंतू नष्ट होतोत . 

या कारणा मुळे घरात शंख वाजवला जातो आणि पूजेमध्ये शंखाचे हि पूजन करून त्यातील पाणी घरात शिंपडले जाते. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment