या मुस्लिम देशात रोज नियमाने गणपतीची पूजा करतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
इंडोनेशिया हा प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र आहे. तसेच हा देश जागृत ज्वालामुखी चा देश म्हणून ओळखला जातो. या देशांमध्ये तब्बल १४१ ज्वालामुखी आहेत. त्यापैकी १३१ ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहेत.
त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. या सर्व ज्वालामुखी पैकी माऊंट ब्रोमो हा जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहे.

पर्यटकांना या ज्वालामुखीच्या आसपास जाण्यासाठी परवानगी नाही. असं असलं तरी तेथील स्थानिक लोक ज्वालामुखीच्या जवळ असलेल्या एका गणेश मंदिरामध्ये नित्य नियमाने जातात.
इंडोनेशिया प्रथमतः मुस्लिम देश आहे तरीपण तेथे या गणपतीच्या मंदिरांमध्ये नित्यनियमाने स्थानिक लोक जातात त्याचे कारणही तसे आहे म्हणा,
स्थानिक लोकांची श्रद्धा आहे की येथे रोज होत असलेल्या गणपतीच्या पूजेमुळे या महाकाय ज्वालामुखींचे उद्रेक होत नाहीत.
ज्वालामुखीचे नाव माऊंट ब्रोमो आहे आणि या शब्दाचा अर्थ ब्रह्मा असा होतो. स्थानिक लोक म्हणतात की हे गणपतीची मूर्ती सुमारे ७०० वर्षापासून तेथे आहे. आणि या मूर्तीची स्थापना सुद्धा त्यांच्या पूर्वजांनी केलेली आहे.
ह्या गणपतीच्या स्थापनेनंतर आत्तापर्यंत येथील जागृत ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही.

पुरा लूहुर पोतेन
पूर्वेकडे एक आदिवासी जमात राहते या आदिवासी जमातीचे नाव टिंगरासी आहे. या गणेश मंदिराला पुरा लूहुर पोतेन म्हणून ओळखलं जातं.
मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या गणेशाची मूर्ती या ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाव्हारसापासून बनलेली आहे.
त्या आदिवासी जमातीची लोकसंख्या जवळपास एक लाख आहे, आणि या ज्वालामुखीपासून जवळपास तीस गावांमध्ये ते वसलेले आहेत.
त्यांचा हिंदू रुढी-परंपरा वर खूप मोठा विश्वास आहे आहे, ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्यासोबत ते गौतम बुद्ध यानाही मानतात.
येथील आदिवासी जमातीचे स्वतःचे एक कॅलेंडर आहे आणि त्या कॅलेंडर प्रमाणे वर्षातून 14 दिवस सलग गणपतीची पूजा केली जाते. त्या सोहळ्याला एक्झॉटिक ब्रोमो फेस्टिवल असे म्हणतात.
येथे केले जाणाऱ्या सर्व पूजा हिंदू धर्माचा रितीरिवाजाप्रमाणे होत असतात. मंदिरामध्ये जसा पुजारी असतो तसा तिथे एक पुजारी असतो. या पुजार्याला स्थानिक भाषेत रेसी पूजंगा असे म्हणतात.
या उत्सवाच्या वेळी त्या ज्वालामुखीवर खूप मोठी जत्रा भरते, अनेक लोक यांच्या कलागुणांचे दर्शन देत असतात, दरवर्षी अनेक पर्यटक या उत्सवाच्या वेळी येत असतात. परंतु ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना तेथे जाण्यास सक्त मनाई आहे.