Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Published Categorized as Tourism

Vishrambaug Wada विश्रामबाग वाडा पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात. पुणे म्हटले की सर्वांना आठवतं पुणेरी पाट्या. म्हणतात पुणे तिथे काय उणे.

पुण्यामध्ये प्रसिद्ध असा शनिवार वाडा आहे. आणि शनिवार वाडा म्हटला की पेशवाई आलीच.

विश्रामबाग वाडा पेशव्यांचे वैभव होते

महाराष्ट्रा तील इतर शहरांमधुन पुण्यामध्ये आलेला प्रत्येक जण तुळशी बागेमध्ये जात असतो. नंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची दर्शन घेतो. पण बाजूलाच विश्राम बाग वाडा आहे.

बागेचा इतिहास जास्त लोकांना माहीत नाही. पण आज आम्ही तुम्हाला या विश्रामबाग वाडा त्याचा इतिहास सांगणार आहोत. 

अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता

विश्रामबाग वाड्याचा इतिहास (History of Vishrambaug Wada)

तुळशी बागेच्या विरुद्ध दिशेला एक मोठा वाडा आहे. त्या वाड्याचे नाव आहे विश्रामबाग वाडा. जेव्हा पुण्यावर पेशव्यांची सत्ता होती तेव्हाची ही गोष्ट आहे.

हा वाडा १८०९ मध्ये दुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला.

ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी हरिपंत फडके यांची बाग होती. आणि ती बाग दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७९९ मध्ये विकत घेतली.

नंतर त्यांनी तेथे वास्तव्य करण्यासाठी वाडा बांधायला घेतला.

Vishrambaug Wada
Vishrambaug Wada

Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचे बांधकाम 

विश्रामबाग वाडा बांधकामाची सुरुवात १८०३ साली झाली. आणि १८०९ साली हे बांधकाम पूर्ण झाले. त्याकाळी या बांध कामासाठी सुमारे २००,५४० रुपये इतका खर्च झाला.

त्याशिवाय पाण्याचा हौद आणि मोरी बांधण्यासाठी १४ हजार रुपये इतका खर्च आला. 

हा वाडा २०,००० वर्ग फूट आहे. पण पेशवे या वाड्यामध्ये फक्त आठ वर्ष राहिले.

या वाड्याच्या बंदोबस्तासाठी म्हणजे पहाऱ्यासाठी सुमारे, चारशे रुपये महिन्यासाठी खर्च लागायचा. मग पुढे चालून १८१८ साले इंग्रजांची सत्ता पुण्यावर आली.

नंतर विश्रामबाग वाडा दोन वर्षे कुलपात बंद होता. मग इंग्रजांनी १८२१ झाली या वाड्यामध्ये संस्कृत महाविद्यालय चालू केले.

विश्रामबाग वाडा लागलेली आग

मग कालांतराने १८७९ साली काही समाजकंटकांनी या वाड्याला आग लावली. या आगीमध्ये वाड्याचे समोरचे दोन चौक जळून खाक झाले.

नंतर स्थानिक नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्या वाड्याची डागडुजी केली. नंतर तो वाडा नगर पालिकेच्या ताब्यामध्ये दिला.

आता सध्या या वाड्यामध्ये सरकारी कार्यालये आहेत. पेशवे काळातील वैभव म्हणून हा वाडा फक्त शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.

आज विश्रामबाग वाडा वाहतुकीच्या कोंडी मध्ये हरवला आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

2 comments

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.