Barkcloth Uganda करोडो रुपये कमवून देणारे झाड

by Geeta P
257 views
Ugandan Barkcloth

Barkcloth Uganda या झाडा पासून कामाऊ शकतो प्रचंड पैसा असे झाड या देशात आहे जाणून घेऊयात ugandan barkcloth

आपण नेहमी म्हणत असतो पैसा काही झाडला लागतो का पण हे खरे नसले तरी आपण त्या झाडापासून जे मिळत त्याचा उपयोग करून प्रचंड पैसा मिळू शकतो आणि मालमाल होऊ शकतो. 

ही गोष्ट खरी आहे आणि गोष्ट आफ्रिकेतील लोकानी सिद्ध करून दाखवली आहे.  

आफ्रिकेतील युगांडामधील लोक त्यांच्या जवळ पास सापडणाऱ्या अंजिरच्या झाडापासून मिळणाऱ्या साली पासून कापड तयार करतात. 

ते कपडे साडेसुदे नसून ते चक्क फॅशनेबल कपडे बनवतात. 

एवढेच नाहीतर या अंजीर च्या झाडाच्या सालापासून बनवलेले डिझायनर कपडे ते अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत विकले जातात.

यामुळे या कापडाला आणि त्या सालीच्या फॅब्रीकला चांगलेच पैसे मोजले जातात.

Barkcloth Uganda

अंजिरच्या झाडाच्या सालीपासून बनवलेल्या कापडाला ते लोक बर्कक्लोथ असे म्हणतात. 

या सालीच्या कापडापासून लग्नाचे गाऊन देखील शिवले जातात.

अंजिरच्या झाडाची साल तोंडल्या नंतर यावर जटिल प्रक्रिया करतात.  

युगांडाची राजधानी येथे राहणारी एक नामवंत डिझायनर डोरिण नामतोवू Doreen Namatovu या सालीच्या कापडा पासून अत्यंत फॅशनेबल कपडे बनवते. 

साली पासून कपडे बनवणे ही एक युगांडाची प्राचीन कला आहे.  येथे पारंपरिक कले सोबतच फॅशनच्या उद्दोगालाही नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

कम्पाला ही युगांडाची राजधानी आहे. kampala येथे अंजिरला मुतुबा असे म्हंटले जाते.

अंजिराची साल काढल्या नंतर ही लोक त्या सालीला थोडा वेळेसाठी गरम पाण्यात भजत ठेवतात.

असे केल्याने साल साफ करण्यास मदत होते आणि ती मऊ बनते असे या लोकांचे म्हणणे आहे. 

यानंतर या सालीला हातोड्याने ठोकले जाते. कित्येक वेळ सालीला कूटल्या नंतर ती पसरते आणि नंतर ती कापड बनवण्यास तयार होते.

या सर्व गोष्टीमुळे येथील लोक झाडे लावण्यासाठी प्रेरित होत आहेत आणि याचा परिणाम येथील अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी देखील होत आहे.

Barkcloth Uganda ugandan barkcloth
Barkcloth Uganda

Barkcloth Uganda पिढ्यानपिढ्यांची कमाई 

झाडांची साल काढलेल्या झाडांची शेतकरी काळजी घेतात. त्या झाडाना शेतकरी केळीच्या पानानी झाकून टाकतात. 

जेणेकरून त्या झाडांवर नवीन साल पुनः येईल एक वर्षानंतर पुनः त्या झाडाला साल तयार होते असे एक झाड 60 वर्षासाठी साल देतात.

याच झाडांचे अनेक फायदे या लोकांचे रोजिरोटीचे साधन बनले आहे. या झाडांचा फायदा करून येथील शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या आरामात कमाई करू शकतात. 

याच कलेला वाचवण्यात युगांडाचे शेतकरी प्रयत्न करत आहेत आणि याच कलेला यूनेस्कोच्या संस्कृतीक कलेचा वारसेचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

Mount Bromo Indonesia या मुस्लिम देशात रोज गणपतीची पूजा करतात

Barkcloth Uganda झाडाचे सालीचे आणखी उपयोग 

कम्पाला मध्ये नागोले समाजातील लोक साली पासून कपडे तयार करतात. टोगो समाजातील लोक ही बर्कक्लोथ घालतात. 

बऱ्याच शतकांपूर्वी राजघराण्यातील लोक ईतर समाजातील लोक सालींपासून बनवलेले कपडे घालत. तसेच बर्कक्लोथ कपडे लग्न समारंभात किंवा काही संस्करतीक कार्यक्रमात वापरले जातात. 

या साली पासून कपडेच नाहीतर ईतर ही स्टोरेजच्या वस्तु बेडिंग तसेच पडदे आणि डासांपासून बचाव करणारे पडदे देखील बनवले जातात. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Mikaila Ulmer Unbelievable Things You Never Knew About 13 Year Old | Domkawla 24/07/2021 - 9:53 am

[…] तिने ती संधी गमावली नाही, तिला सात हजार डॉलरची फंडिंग मिळाली, मग काय मग तिने आपला व्यवसाय चालू केला. Barkcloth Uganda करोडो रुपये कमवून देणारे झाड […]

Reply

Leave a Comment