Edible Gum Benefits in Winter हिवाळ्यात डिंकाचे लाभदायक फायदे

By | December 16, 2020
Edible Gum Benefits

Edible Gum Benefits हिवाळ्यात डिंकाचे सेवन करा आणि या आजारांपासून दूर राहा

थंडी पडली की आपल्याला हुडहुडी भरते. गरम राहवेसे वाटते. गरम गरम खाण्याची इच्छा होते. आपण गरम गरम चहा कॉफी यांचे जास्त सेवन करतो.

पण हे सगळे आरोग्यास हानिकारक असते. म्हणून हिवाळ्यामध्ये गरम गुणधर्म असणाऱ्या गोष्टी खाव्यात असे आपल्याला सांगण्यात येत.

असे म्हणतात की हिवाळ्यामध्ये चार महिने खाल्लेले अन्न आपल्याला आठ महिने ताकद देते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये योग्य आणि पोषण युक्त आहार घेणे खूप महत्वाचे असते. 

हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गरम असणारे म्हणजे लसुन, सुंठ, काळी मिरी तसेच लवंग या पदार्थांचे सेवन आहारात केले जाते. 

हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरातच जास्त थंडी पडली की, घरातील आया डिंकाचे लाडू करायला घेतात. त्यामध्ये डिंका सोबतच अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो.

त्यामध्ये प्रामुख्याने डिंक, सुकामेवा, उडदाची डाळ तसेच तूप या गोष्टी असतात. डिंक आरोग्यासाठी खूप उत्तम असतो.  आपल्या शरीराला डिंक ऊर्जा प्रदान करतो.

तसेच डिंक आपल्याला उष्णता देतो. डिंकाचे लाडू व्यतिरिक्त डिंक तुपामध्ये तळूनही खातात. यामुळे हाडांच्या वेदनांपासून थोडी सुटका मिळते. 

डिंक खाण्याच पदार्थात अवश्य वापरला जातो. त्यामध्ये बाभळीच्या झाडाचा डिंक आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

डिंकाचा वापर बेकरीचे पदार्थ, सौंदर्य प्रसाधने तसेच तो आईस्क्रीम, एनर्जी ड्रिंक यामध्येही वापरला जातो.

इतर वेळेला किंवा मोसमात डिंक खाण्याचा एवढा अट्टाहास नसतो. पण तो हिवाळ्यातच खावा असा आग्रह का ?

हे जाणून घेऊ यात. पण त्याआधी याविषयी थोडे माहिती घेऊयात. 

Edible Gum Benefits

डिंक कसा असावा ?

कुठल्या ही झाडाच्या खोडाला चीर पडून त्या झाडातून एक द्रव्य बाहेर पडते त्याला डिंक म्हणतात . पण कुठल्याही झाडाचा डिंक खाण्यायोग्य नसतो.

फक्त बाभळीचा झाडाचा डिंक खाण्या योग्य असतो. तो बाजारात सहज उपलब्ध असतो. 

सांधे दुखीच्या त्रासा पासून सुटका 

हिवाळ्यात डिंक खाल्याने शरीराला उष्णता मिळते आणि ती टिकून राहते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी डिंक खाल्याचे फायदे होतातच. हिवाळ्यात डिंकाचे सेवन केल्याने मेंदूची झालेली झीज आणि सांधेदुखी आणि इतर  सांध्याचा त्रास कमी होतो.

डिंक हा हाडांना मजबूती देतो. त्याशिवाय नैराश्यापासून डिंक आपला बचाव करतो. 

तसेच स्टॅमिना आणि प्रतिकार क्षमता डिंकाचे सेवन केल्यानंतर शरीराची रोग प्रतिकार शक्ति क्षमता सुधारते हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्याने व्यक्तीचा स्टॅमिना वाढतो.

स्तनवृद्धी 

स्तनपान देणाऱ्या स्त्रियाना डिंकाचे लाडू खायला देतात. डिंकाचे लाडू खाल्याने प्रसूती वेळी झालेली झीज भरून काढते आणि स्तनवृद्धी होते.

प्रसूती बाईला डिंक लाडू दिल्याने हाडे मजबूत होतात आणि ताकद वाढते.

त्वचेसाठी लाभकारी

डिंक त्वचेसाठीही फायदेशीर असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी, त्वचेला आतून ओलावा आणि ओलसर पणा ठिकून ठेवण्यासाठी डिंक फायदेशीर असतो. 

फ्फूफसांची समस्या 

ज्या व्यक्तीना फ्फूफसांशी निगडीत समस्या आहे आणि ज्यांना थकवा जास्त येतो.  तसेच अशक्तपणा असतो अशा व्यक्तीसाठी ही डिंक हा खूप उपयुक्त असतो.

हृदयासाठी फायदेशीर डिंक

रोज भाजलेल्या डिंकाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका येण्यापासून बचाव होतो. हृदयांच्या इतर तक्रारी पासूनही डिंक आपले संरक्षण करते.

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी ही डिंकाचे लाडू फायदेशीर ठरतात. तसेच डिंकामध्ये खोबरे, खारीक असे पंचखाद्य बनून खाल्याने शरीराला फायदा होतो .  

हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

डिंक शरीराला उष्णता आणि ऊर्जा प्रदान करतो त्यामूळे हिवाळ्यात डिंकाचे सेवन नक्की करावे .

डिंकाचे सेवन तो तुपात तळून किंवा भाजून खाल्ल्याने त्याचा शरीरराला जास्त फायदा होतो.

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.