मंगळवार, जून 22

Benefits of Sesame Seeds हिवाळ्यात तिळ खाण्याचे अनमोल फायदे

Benefits of Sesame Seeds in marathi तीळ हे शरीरसाठी खूप फायदेमंद असतात.

आयुर्वेदाच्या  म्हणयानुसार तीळ शरीरसाठी बलवर्धक असतात. तिळाचा थंडीच्या दिवसात सेवन केल्याने शरीराला जास्त फायदा होतो.

तीळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन बी असते ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. 

आयुर्वेद चिकित्सेच्या म्हणण्या नुसार तीळ  हे स्निग्ध, मधुर असल्यामुळे वात शमन होण्यास मदत होते.

तीळ वात आणि पित्ताला नष्ट करतात. केसांसाठी तिळाचे तेल खूप महत्वाचे असते. 

तिळामध्ये Calcium असते हे सर्वांनाच माहीत आहे.  त्याचबरोबर  तीळामध्ये मॅग्नीज, फॉस्फरस, सेलेनियम तसेच विटामिन बी गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ ही असतात.

तिळा तील  कॅल्शियम हाडांसाठी चांगले तर आहेच पण त्यात असणारे झिंक हाडे ठीसूळ होण्यापासून वाचवते.

स्त्रियांना याचा खूप फायदा होतो.  ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा ज्यांचे हाडे ठिसूळ झालेली आहेत त्यांच्यासाठी तीळ खूप उपयुक्त ठरतात. 

तिळा तील लोह आणि कॉपर लोहाच्या अभिशोसनास मदत करतात. त्यामुळे ज्यांना संधीवाताचा त्रास आहे असे लोक तिळाच्या तेलाने मसाज करतात। 

तिळाचे प्रकार  Types of Sesame Seeds

तीळामध्ये पॉलिश केलेले आणि न केलेले आणि काळे तीळ असे प्रकार असतात. 

यामध्ये आपण रोजच्या वापरात साध्या पांढऱ्या तिळांचा वापर जास्त करतो.

पॉलिश न केलेल्या तिळामध्ये कॅल्शियम जास्त असते आणि ईतर ही पोषक घटक जास्त प्रमाणत असतात.

तसेच तिळा मध्ये एंटीऑक्सीडेंट चे जास्त प्रमाण असते. आपल्या चेहऱ्यावचे सुरकुत्या पासून संरक्षण करतात.

त्यामुळेच तीळ आणि तीळाचे तेल तारुण्य टिकवण्यासाठी आधीपासूनच वापरले जाते. 

Benefits of Sesame Seeds तिळाचे फायदे 

तिळाचे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. तिळा मध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तीळ खाल्यास आपल्याला लवकर भुख लागत नाही. तिळाचा वापर आपण वेट लॉस  डायट मध्ये देखील करू शकतो.

एक चमचा तिळा पासून आपल्याला ५०उष्मांक कॅलरीज मिळतात. तंतुमय पदार्था मुळे कोटा साफ होण्यास मदत होते.

या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.

याचा फायदा माधुमेहीनसाठी आणि कोलेस्टरॉल कमी होण्यासाठी होतो. यातील फायटोस्टीरोल्स नावाचे घटक रक्तातील कोलेस्टरॉल कमी करून आपले कॅन्सर सारख्या आजारा पासून बचाव करते. 

तिळाचे तेल आपण स्वयंपाक करण्यासाठी ही वापरू शकतो. यातील ऑलिक अॅसिड  कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवते . 

कॅल्शियम च्या गोळ्या किंवा ईतर काही औषध घेण्या पेक्षा निसर्गाने दिलेल्या या पदार्थाचा वापर करावा आणि या थंडीत स्वस्त खा आणि मस्त रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.