why tears come while cutting onion कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते?

by Geeta P
395 views
why tears come while cutting onion

why tears come while cutting onion कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते. कांद्या शिवाय एकही पदार्थ बनवू शकत नाही.

रोजच्या वापरातील कांदा आणि महिलांचा अगदी जवळचा पदार्थ आहे.पण सर्वाना नेहमी प्रश्न पडतो की कांदा कापताना डोळ्यात पाणी का येते?
त्याच बरोबर डोळ्यांची जळजळ का होते?  

कांदा तर चवीला तखट पण नसतो. उलट मिरची हा पदार्थ तिखट असतो. पण त्या मुळे डोळ्याना काही त्रास होत नाही.

मग कांद्यामुळेच का डोळे जळजळतात? याचे कारण आपण या लेखात जाणून घेऊयात. 

why tears come while cutting onion
कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते

कांदा कापल्यास डोळ्यांमध्ये पाणी का येते ? why tears come while cutting onion

डोळ्यांमध्ये पाणी येण्या मागचे कारण कांद्या मध्ये असणारे साइन – प्रोपेंथियल – एस -ऑक्साईड syn-propanethial-S-oxide नावाचे रसायन आहे.

ज्याचा हवेशी संपर्कआल्यास डोळ्याना त्याचा त्रास होतो.यामुळेच डोळ्यांची जळजळ होते. डोळ्यातून पाणी येते.

परंतु खूप पूर्वी वैज्ञानिक याचे कारण काही दुसरेच मानत होते.

पहिले वैज्ञानिकांचे म्हणणे असे होते की कांद्यामध्ये असणाऱ्या एलिनेसनावाच्या एंजाईमा मुळेच डोळ्यांमध्ये पाणी येते.

खूप दिवस याचे कारण हेच मानले जात होते. परंतु जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा खरे कारण समोर आले. 

कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते?

हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

शोध करताना असे आढळून आले की, कांद्या मध्ये लेक्राईमेट्रि-फॅक्टर – सिंथेस नावाचे एंजाइम असते. जेव्हा आपण कांदा कापत असतो त्यावेळेस त्या मधून हे लेक्राईमेट्रि-फॅक्टर – सिंथेस नावाचे एंजाइम बाहेर पडते.

कांद्यामध्ये असणारे अमिनो अॅसिड सलासेल्फेनिक ऍसिड मध्ये बदलते. सेल्फेनिक ऍसिडचे साईन-प्रोपेंथियल -एस -ओक्साईड syn-propanethial-S-oxide मध्ये बदलते. 

जेव्हा हे साईन – प्रोपेंथियल -एस -ओक्साईड हवेच्या माध्यमातून डोळ्यांपर्यंत पोहचते आणि त्या मुळे आपल्या डोळ्या मध्ये असण्याऱ्या लैक्राईमल ग्लॅंड मध्ये परेशानी होते. त्यामुळेच डोळ्या मध्ये जळ जळ आणि पाणी येते. 

तर मग तुम्हाला कळला असेल कांदा कापल्या नंतर डोळ्यांमध्ये पाणी येण्या मागचे कारण साईन -प्रोपेंथियल – एस -ऑक्साईड असते. जे हवेच्या द्वारे डोळ्या पर्यंत पोहोचते. आणि आपल्या डोळ्यालाया ऍसिडचा त्रास सहन होत नाही आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि डोळ्यांना त्रास होतो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आपल्याला माहितीआवडल्यास नक्की शेअर करा.

Related Posts

Leave a Comment