Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

By | December 4, 2020
skin care in winter

हिवाळ्यात त्वचेची काळजी

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेतील ओलावा Moisture कमी होते. त्वचेतील स्निग्धता कमी होते आणि हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते.

त्वचा निस्तेज होते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. 

हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो.  त्यामुळे शरीरातील टॉक्सिंस toxins बाहेर पडत नाहीत. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

म्हणून या दिवसात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाची ठरते.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती

त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्वचेत स्निग्धता राहण्यासाठी रोज भिजवलेले मुठभर बदाम, भिजवलेले अक्रोड तसेच शेंगदाणे खावेत.

यातील पोषकतत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेला मुलायम बनण्यास मदत होते.

तसेच त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी वाटत असेल तर दररोज आंघोळी च्या आधी त्वचेला बदामाचे तेल, तिळाचं तेल, किंवा दुधावरची मलई लावून मसाज केल्यावर त्वचेतील मोईश्चर टिकून राहते आणि त्वचा मुलायम राहते. 

त्याचबरोबर रोज रात्री झोपण्या पूर्वी विटामिन ई ऑइल किंवा एलोवेरा जेल एकत्र करून लावल्यास त्वचेची जळजळ कमी होते.

त्वचा तेजस्वी बनते. 

बेकिंग सोड्याचा इतिहास व फायदे

त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून चोळावे यामुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाईल.

जर थंडीमुळे पाय कोरडे झाले असतील किंवा पायांच्या तळव्यांना भेगा पडल्या असतील तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून त्यात पाय बुडवून पंधरा-वीस मिनिटे तसेच बसावे. 

नंतर पाय प्यूमिस स्टोनणे पाय स्वच्छ घासावेत यामुळे मृत त्वचा निघून जाईल. 

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची काळजी

नंतर पाय कोरडे करून त्यावर तिळाचं तेल किंवा कोकमाचे तेल लावावे. याने पाय मऊ होतील आणि भेगा जाण्यासाठी मदत होईल. 

जर हा उपाय आपण सातत्याने करत राहिलो आणि रात्री झोपताना सॉक्स घालून झोपलो तर लवकर याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. 

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावे यामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन त्वचा सतेज दिसेल. Skin Care in Winter त्वचेतील ओलावा Moisture टिकून राहण्यास मदत होईल. 

त्याचबरोबर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते .

त्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये तूप, अळशी, सूर्यफुलाच्या बिया, ताजी फळे भाज्या यांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे असते. 

तसेच हिवाळ्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप हळू होत असते आणि यामुळेच आपण पाणी खूप कमी प्रमाणात पितो यामुळे आपले केस आणि त्वचा खूप कोरडी होते.

यामुळे आपल्याला पाणी पिणे गरजेचे असते त्याच बरोबर विटामीन क घेणे ही खुप महत्वाचे असते.

हिवाळ्यात केसांची काळजी घेणे ही आवश्यक असते.

केसाना आठवड्यातून किमान दोन वेळा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल ने मसाज केली पाहिजे.  या मुळे केस कोरडे होणार नाहीत आणि मऊ राहतील. 

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर खाज येते. सोरायसिस सारखे आजार वाढतात. 

यासाठी आपल्या आहारात फिश ऑइल चा वापर केला पाहिजे.  यामध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी असिड त्वचेवरील खाज कमी होण्यास मदत करते. 

हिवाळ्यात त्वचेची काळजी Skin Care in Winter करत बसण्यापेक्षा हिवाळ्यात त्वचेची काळजी घेत आपले आरोग्याची काळजी घ्या. 

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.