Entertainment

Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

सर्वांनाआवडणाऱ्या बटाटा चिप्स चा रंजक इतिहास ऐकून नक्कीच रोमांचित होताल ! 

सर्वांचा आवडीचा स्नॅक्स चा प्रकार म्हणजे चिप्स. छोट्या मुलांची बर्थडे पार्टी असो. अथवा थियटर मध्ये फिल्म बघताना टाईमपास म्हणून सर्वांना आवडणारे बटाटा चिप्स नेहमीच यामध्ये सामील असतात.

छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिप्स खूप आवडतात. चिप्स चे खूप सारे प्रकार आहेत यामध्ये बनाना चिप्स, बटाटा फिंगर चिप्स, करल्याचे चिप्स, फणसाचे चिप्स

पण सर्वांना बटाटा चिप्स खूप आवडतात. चटपटीत असणारे कधी खारट, तर कधी वेगवेगळे फ्लेवर मध्ये मिळणारे हे चिप्स सर्व जण आवडीने खातात. 

सर्वांना आवडणारे चिप्स जगातील स्नॅक्सचा प्रकारां पैकी विक्री च्या ३५% विक्री या स्नॅक्स ची होत असते.

Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार चिप्स खल्याने तनाव दूर होन्यास मदत होते.

परंतु सर्वाना आवडणाऱ्या या बटाटा चिप्स चा शोध कधी आणि कुणी लावला हे तुम्हाला माहीत का ?

Potato Chips History
Potato Chips History

Potato Chips History

आज आपन या सर्वांना आवडणाऱ्या चिप्सच्या शोधा मागील कहाणी पाहूया.

तुम्हाला असे वाटत असेल की जसा इतर पदार्थांचा शोध कुक किंवा शेफने लावला असेल तसेच या पदार्थाचाही शोध लागला असेल.

परंतु मित्रांनो या पदार्थाचा शोध मुद्दाम लावलेला नाही तर तो Acidentlly लागला होता. याची कहाणी खूपच रंजक आहे चला तर मग जाणून घेऊयात.

या बटाटा चिप्स चा जन्म १८५३ ला न्यूयार्क मधील Saratoga Springs या ठिकाण झाला. Saratoga हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण होते.

तेथे वेगवेगळे प्रसिद्ध हॉटेल्स होते लोकप्रिय रीसॉर्ट होते .

त्यातीलच एका moon lake lodge या प्रशस्त आणि लोकप्रिय हॉटेलमध्ये George Kram नावाचा आफ्रिकन-अमेरिकन शेफ होता.

तो वेग वेगवेगळे डीशेश बनवायचा स्पेशली त्याच्या बटाट्या पासून बनवलेल्या डिशेश खूप लोकप्रिय होत्या.

चिप्स ची कहाणी ( Potato Chips History )

काही दिवसानंतर एका ग्राहकाने त्याच्या जेवणाविषयी तक्रार केली. जॉर्जने तयार केलेले फराईड पोटेटो चे पदार्थ त्याला नरम आणि खूप जाड वाटू लागले. 

एके दिवशी जेव्हा त्याच ग्राहकाने तीच तक्रार पुन्हा केली तेव्हा जॉर्जने चिडून त्याला धडा शिकवण्या साठी मुद्दामून फ्रेश बटाटे घेतले.

त्या बटाट्याचे एकदम पातळ पातळ स्लाईस बनवले. ते कुरकुरीत होईपर्यंत तळले आणि त्यावर थोडेसे मीठ भुर भुरले आणि आश्चर्य ती डिश ग्राहकाला खूप आवडली.

इथेच बटाट्याच्या चिप्स चा जन्म झाला, आणि हे चिप्स सगळीकडे प्रसिद्ध झाले. कुठल्याही गोष्टीचा शोध लावल्यानंतर शोध कर्ता त्याचे पेटंट घेतो.

जेणेकरून त्याचं नाव त्या कार्यासाठी अजरामर राहील परंतु या बटाट्या चीप्स च मात्र पेटंट घेतले गेले नाही.

Potato Chips चा शोध लावल्या नंतर जॉर्ज क्रम ला खूप प्रसिद्धी मिळाली. सात वर्षात त्याने स्वतःचे क्रमस हाऊस नावाचे रेस्टॉरंट चालू केले.

हॉटेलच्या  प्रत्येक टेबलावर त्याने चिप्सच्या भरण्या ठेवल्या.

या स्ंनक्स मुळे हॉटेल मध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आणि त्याबरोबरच वेफर्स आणि चिप्स ची ही लोकप्रियता वाढली . 

Lay’s Chips History

त्या काळात चिप्स मोट्या प्रमाणात तयार करून बॅग्स मध्ये विकले जायचे परंतु जॉर्ज क्रमने कधी याचे पेटंट घेतले नाही .

त्याला याचे श्रेय कधीच मिळाले नाही. वेफर्स चे वेगवेगळे ब्रॅंड जॉर्ज चिप्स च्या शोधा नंतर अमेरिकेत ही असे बरेच व्यापारी चिप्स ची निर्मिती करून ते विकू लागले.

१९२० साली हर्मन ले नावाचा विक्रेता देशाचा दक्षिण भागपर्यन्त वेफर्स विकायचा.

ले आपल्या कार मधून चिप्स घेऊन जायचा ले च्या वेफर्सला मागणी वाढत गेली.

आणि चिप्स खण्याला संपूर्ण देशात लोकप्रियता मिळाली म्हणून ले चे वेफर्स राष्ट्रीय ब्रॅंड झाले.

या नंतर १९६१ मध्ये ले यांनी आपली कंपनी फ्रिटो मध्ये विलीन केली.

डल्लास मधील ही कंपनी ले च्या विलगीकरणाने अजूनच सशक्त झाली आणि खूप प्रसिद्ध झाली

आज लेज चे वेफर्स सर्व जगात प्रसिद्ध आहेत . 

भारतात बट्याट्याला खूप महत्व आहे. आपल्या कडे ही बाटाटा चिप्स बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.
बालाजी. बुधणी, छेडा आशा अनेक कंपण्याचे चिप्स प्रसिद्ध आहेत

Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button