2 Reason for Elbow Pain हाताच्या कोपराला लागल्यास झिणझिण्या का येतात?

421 views
Reason for Elbow Pain

Reason for Elbow Pain आपल्या हाताच्या कोपराला अचानक लागल्यास हाताला झिनझीण्या येतात किंवा करंट लागल्या सारखे का वाटते? 

दैनंदिन जिवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या इजा होत असतात.आपण कशावर तरी आदळतो आणि आपल्याला दुखापत होत असते किंवा जखम होते.

पण अचानक आपल्या हाताच्या कोपरा कशावर तरी आदळला आणि कशाशी टक्कर झाली तर आपल्याला वेगळ्याच वेदना होतात.

पूर्ण हाताला झिणझिण्या येतात किंवा करंट लागल्या सारखे होते. थोड्या वेळासाठीच पण या वेदना असह्य असतात.

पण कधी या बद्दल विचार केलाय का कि असे का होते?

Reason for Elbow Pain in Marathi

Reason for Elbow Pain
Ulnar Vein

या जागेवर लागल्यास अशा वेदना का होतात? तर आज आपण या लेखात याचे कारण जाणून घेणार आहोत. 

कोपऱ्याला ज्या हाडाला आपल्याला लागते तेथे करंट लागल्या सारखे होते किंवा झिजण्या आल्याचा अनुभव येतो.

तर वैद्यकीय भाषेत या नसेला अल्नर ची नस असे Ulnar Vein म्हणतात.

हे मज्जातंतू आपल्या मानेतून किंवा ज्याला आपण कॉलर बोन collar bone म्हणतो तेथून आपल्या खांदे आणि हातांमधून जाते.

आपल्या हातांच्या अंगठीच्या बोटावर आणि मनगटापासून विभागलेल्या छोट्या बोटावर म्हणजे करंगळीवर जाऊन संपते.

मज्जातंतू चे काम हे मेंदूतून संदेश उरलेल्या इतर शरीरातील भागाला पाठवणे हे असते. 

शरीरारातील इतर संपूर्ण मज्जासंस्थे प्रमाणे हे Ulnar Vein मज्जातंतू हि हाडे, मज्जातंतू आणि सांधे यांच्या मध्ये सुरक्षित असते.

परंतु कोपरा मधून जाणारा हा भाग फक्त त्वचा आणि चरबी यानेच झाकलेला असतो. म्हणून कोपर कुठेही आदळले कि थेट मज्जा संस्थेला धक्का बसतो.

अजून एका प्रकारे सांगायचे झाले तर जेंव्हा हाडाला दुखापत होते तेंव्हा अल्नर मज्जातंतू हाडे आणि त्यावर आदळनारी बाह्य गोष्ट याच्या मध्ये दाबली जात असते.

त्यामुळे मज्जातंतूवरील हा दाब तुम्हाला तीव्र वेदना आणि गुदगुल्या आहे संमिश्र अनुभव होतो.

सतत सेल्फी काढण्याचे त्वचे वरील हे आहेत गंभीर परिणाम

त्याच बरोबर आपल्या कोपऱ्याच्या मागे median nerve नावाचे मज्जातंतू असतात.

मज्जातंतू हे इलेक्ट्रिक करंट प्रवाहित ज्यामुळे आपल्याला संवेदनांची जाणीव होत असते.

आपण हाताने या मज्जातंतूला दाबून हा अनुभव घेऊ शकतो. आणि यामुळेच आपल्याला कधीही कोपऱ्यावर मार लागल्यास हाताला करंट लागल्या सारखे जाणवते किंवा झिणझिण्या आल्यासारखे वाटते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी - DOMKAWLA 06/08/2021 - 8:57 pm

[…] हाताच्या कोपराला लागल्यास झिणझिण्या … […]

Reply

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी - DOMKAWLA साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply