Million Meaning in Marathi Billion आणि Trillion चा मराठी मध्ये अर्थ

by Geeta P
1,368 views
Million Meaning in Marathi

Million Meaning in Marathi जाणून घेऊयात मिलियन, बिलियन, ट्रीलियन या शब्दांचे अर्थ काय आहेत .

या पोस्ट मध्ये आपण मिलियन बिलियन ट्रीलियन या शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सोशल मीडिया चा  वापर करत असाल तर तूमच्या लक्षात येईल युटुब् वर संख्या मोजन्यासाठी या मिलियन बिलियन ट्रीलियन चा वापर करतात.

उदरणार्थ YouTube  वर टी- सिरिज चैनल चे 100 मिलियन पेक्षा ही जास्त सबस्क्राईबर आहेत. त्याच बरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Jeff Bezos यांच्याबद्दल बोलायचे झाले तर यांची संपत्ती 100 बिलियन एवढी आहे.

त्याचबरोबर ट्रीलियन हे मोजण्यासाठीचे सर्वात मोठी संख्या मोजण्याचे साधन आहे. काही देशांमध्ये ट्रिलियन चा वापर त्या देशातील जीडीपी दर्शवण्यासाठी करण्यात येतो.

आपल्या देशात संख्या दर्शवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी हजार, लाख, करोड ,अरब या शब्दांचा वापर करतात. याच कारणामुळे आपण मिलियन, बिलियन, ट्रिलियन असे शब्द ऐकून गोंधळात पडतो. 

परंतु आपले गोंधळून जाणे सहाजिक आहे कारण देश-विदेशातील मोजमाप करण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. जे आपल्यासाठी अनोळखी असतात. 

Million Billion and Trillion in Rupees  या शब्दांना शॉर्ट मध्ये क्रमशः MTB या शब्दांनी ओळखले जातात.

हे अंतरराष्ट्रीय संख्या मापाचे साधन आहे जे मुख्यतः इंग्रजी भाषेमध्ये वापरण्यात येते.

जर तुम्हीही या शब्दांमुळे गोंधळात आहात तर हा लेख नक्की वाचा.

Million Meaning in Marathi

सोशल मीडिया वापरत असताना तुम्ही पाहिले असेल की कुठलीही संख्या मोजताना 1 मिलियन असे लिहिलेले असते. तरी याचा अर्थ 10 लाख असा होतो. हेच जर10 मिलियन असे लिहिले असेल तर हे याचा 1 करोड असा होतो.

उदाहरण देऊन समजायचे असेल तर सोशल मीडिया युट्युब वरील प्रसिद्ध युट्युबर Carryminati 20 मिलियन पेक्षा ही जास्त सबस्क्राईबर आहेत जे 2 करोड च्या समान आहेत.

खालील उदाहरणावरून जाणून घेऊया 1 मिलियन कीति च्या बरोबर असतात 

1 मिलियन =10 लाख 

5 मिलियन =50 लाख 

10 मिलियन= 1 करोड

50 मिलियन = 5 करोड 

100 मिलियन = 10 करोड

Billion Meaning in Marathi

मिलियन च्या नंतर दुसरे मोठे संख्या मोजण्याचे साधन म्हणजे बिलियन.

बिलियन या शब्दाचा अर्थ करोड असा होतो. सोशल मीडिया वरती युट्युब वर असे बरेच व्हिडिओ आहेत ज्यांचे Views 1 बिलियन पेक्षाही जास्त आहेत.

या व्हिडिओच्या खाली तुम्ही 1B असे लिहिलेले पाहिले असेल.

यासोबतच या शब्दाचा वापर एखाद्याची संपत्ती मोजण्यासाठी ही केला जातो. उदाहरणार्थ आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती 78 बिलियन डॉलर इतकी आहे. याचा अर्थ ती 78 अरब पेक्षा जास्त आहे असा होतो. 

1 बिलियन किती होते हे समजण्यासाठी खालील परिमाण समजून घेऊयात. 

1 बिलियन = 1 अरब (100 करोड )

5 बिलियन =5 अरब ( 500 करोंड )

10 बिलियन =10 अरब ( 1000 करोड )

50 बिलियन =50अरब ( 5000 करोड )

100 बिलियन =100 अरब ( 10000 करोड)

या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात

Trillion Meaning in Marathi

ट्रीलियन या शब्दाचा अर्थ 10 खरब असा होतो. ट्रीलियन या संख्या मोजण्याचे माप जास्त वापरात येत नाही किंवा तुम्ही याचा कुठेही जास्त उल्लेख पाहिलेला नसेल कारण कुणाची ही स्वतःची अशी एवढी संपत्ती कधी नसते. 

किंवा कोणत्याही व्हिडिओ चे व्युज इथपर्यंत कधी पोचत नाही. याव्यतिरिक्त ट्रीलियन या शब्दाचा उपयोग एखाद्या देशाची संपूर्ण संपत्ती किंवा देशाची अर्थव्यवस्था (GDP) मोजण्याकरिता किंवा दर्शवण्यासाठी हा शब्द वापरतात.

जसे की भारताची जीडीपी 2.8 ट्रीलियन डॉलर एतकी आहे. याचा अर्थ टी 20.8 खरब डॉलर च्या बरोबरिने आहे असा होतो.

इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत

1 ट्रिलियन कशा बरोबर असतो हे समजण्यासाठी खालील उदाहरन पाहूया 

1 ट्रीलियन=10 खरब  

5 ट्रिलियन=50 खरब 

10 ट्रीलियन=100 खरब 

50 ट्रीलियन =500 खरब 

100 ट्रीलियन =1000 खरब 

तरी हे आहेत मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन या शब्दांचे अर्थ.

आता आपल्याला कुठेही आंतरराष्ट्रीय मोजमाप असणारे या संख्या निर्देशन आल्यास आपण त्या भारतीय मोजमापा मध्ये कन्वर्ट करता येतील.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment