दीर्घायुष्य देणारे दीर्घेश्वर मंदिर ( Dirgheshwar Nath Mandir ) दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी

Published Categorized as Religion

Dirgheshwar Nath Mandir या कलियुगामध्ये दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद भेटत नसेल, तर तुम्हाला अशा मंदिरात जायला पाहिजे.

जिथे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. पहिल्या काळात खान पिन खूप पौष्टिक होतं. प

हिल्या काळातल्या महिला मसाला बनवण्यापासून स्वयंपाक करणे,

त्याचबरोबर शेतातील काम करणे सगळी कामे स्वतः करत होत्या. त्यामुळे प्रदूषण हे नव्हते. 

दीर्घायुष्य देणारे दीर्घेश्वर मंदिर ( Dirgheshwar Nath Mandir )

सगळं खायला उत्कृष्ट दर्जाचे भेटत असे. त्या काळातील लोकांची तब्येत फिट होती. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची कामे अशी होती,

की त्यामुळे त्यांचे शरीर एकदम तंदुरुस्त राहायचे.

पण काही काळ गेल्यानंतर आज यामध्ये आधुनिक बदल दिसून येतो. यामुळे आज-काल शारीरिक तक्रारी दिसून येतात.

ताणतणाव रहित जीवनाचा शरीरावर आणि त्याच बरोबर त्यांच्या दिमाकावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

याचा परिणाम असा झाला की आपणच बिमाऱ्याना आमंत्रण दिले. कधीही न ऐकलेल्या आणि न पाहिलेल्या अशा काही बिमारी आहेत.

ज्या लोकांची जीव घेऊनच राहतात. 

जसा जमाना बदलला तसे लोक अजूनच वाईट कर्म करत आहेत. अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या आयुष्यामध्ये घट होत चाललेली आहे.

यामुळे ज्याना दीर्घायुष्य पाहिजे असेल त्यांनी नक्की दीर्घेश्वर मंदिर मध्ये जायला पाहिजे. 

दीर्घेश्वर नाथ मंदिर 

दीर्घ आयुष्य देणारे मंदिर म्हणून या मंदिराचे नाव दीर्घेश्वर नाथ मंदिर असे पडले.

उत्तर प्रदेश मधील देवरिया मधल्या झेलम पूर मौजिल राज येथे असलेल्या या मंदिराची खासियत आहे.

जो या मंदिरात जाऊन पवित्र मनापासून भगवान शिव शंकराचे दर्शन घेतो त्याचे आयुष्य नक्कीच वाढते.

असे म्हटले जाते की काही वर्षापूर्वी इथे भगवान शिव स्वयंभू शिवलिंग चा रूपामध्ये प्रकट झाले होते.

जंगला मध्ये एकदम मध्यभागी हे मंदिर असल्यामुळे, तिथे जाय लाही लोक पूर्वी घाबरत होते.

परंतु त्यांच्या या दीर्घायुष्य देण्याच्या आशीर्वादामुळे लोक तिथे जायला लागली. त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. 

हे आहेत भारतातील कधीही न उलगडलेले ४ अद्भुत रहस्य

दीर्घेश्वर मंदिराची कहानी

असे म्हणतात की महाभारताच्या काळात कौरव आणि पांडवांचे हे आराधना करण्याचे केंद्रस्थान होते.

त्याकाळात अश्वत्थामा खूप पराक्रमी आणि ऋषी कुमार म्हणून ओळखले जात होते.

Dirgheshwar Nath Mandir
Dirgheshwar Nath Mandir

अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्य आणि गुरुमाताकृपि यांचा पुत्र होता.

असेही म्हणणे आहे की अश्वत्थामा ही याच दीर्घेश्वर नाथ मंदिरात येऊन आपले आराध्य दैवत शिव यांची आराधना करत होता.

परंतु अश्वत्थामा ला दीर्घायुषी आशीर्वाद त्याच्या पित्याकडून मिळालेला होता.

परंतु या मंदिराच्या पुजाऱ्याचे असे म्हणणे आहे की अमर अश्वत्थामा या मंदिरात येऊन आराधना करत होता.

त्यामुळे येथील स्वयंभू भगवान शिवशंकराने त्याला जास्त शक्ती प्रदान केली.

त्या ठिकाणच्या लोकांचे म्हणणे आहे की अश्वत्थामा हा खूप मोठा शिवभक्त होता.
याच कारणामुळे तो आजही शिवरात्रीच्या दिवशी रात्री तीन प्रहरी मंदिरात येतो.

ज्या पद्धतीने तो आधी पूजा करायचा त्याच पद्धतीने श्वेत कमळ आणि अजून काही संसाधने वाहून तो पूजा करतो.

जेव्हा पुजारी सकाळी दार उघडतात तेव्हा कळतं की भगवान शिवची पूजा झालेली आहे.

अश्वत्थामा ला पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले आहेत.

कधीकधी या लोकांनी तर मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून घेतले.

तरीसुद्धा त्यादिवशी अश्वत्थामा ने शिव लिंगाची पूजा केली होती.

हे कसे घडते हे आजही एक न उलगडलेले रहस्य आहे. 

जर तुम्हालाही दीर्घायुष्य पाहिजे असेल तर तुम्ही देखील या प्राचीन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी नक्की जा. आजपर्यंत अश्वत्थामा नेही दरवर्षी पूजा करण्याचा नियम थांबवलेल्या नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

1 comment

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.