HistoryKnowledge

हे आहेत भारतातील कधीही न उलगडलेले ४ अद्भुत रहस्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आज आपण भारतातील अशा काही रहस्यमय ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे जाण्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो आणि हे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडले नाही. भारतात आज पण असे काही न उलघडणारे रहस्य आहेत याचा खुलासा आज पर्यंत कोणालाही झाला नाही याचे उत्तर विज्ञाना जवळही नाहीत या प्राचीन रहस्या बद्दल ज्याचे त्याचे वेगवेगळे मते असले तरी याचे उत्तर कोणाकडेही नाही आपल्या देशात असे खूप सारे अद्भुत रहस्य आहेत त्यापैकी हे चार रहस्य आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत

भानगड चा किल्ला

राजस्थान मधील भानगड चा किल्ला याबद्दल क्वचित कोणी जाणत असेल भानगड चा किल्ला हा जगातील सगळ्यात भितीदायक एक किल्ला आहे असे म्हणतात की येथे रात्री राहणारा सकाळपर्यंत जिवंत राहत नाही, भारतातील पुरातत्व सर्वेक्षण विभागानेही येथे रात्री जाण्यास निर्बंध केलेले आहेत.

शापित गाव कुलधाडा

एकेकाळी राजस्थानच्या कुलधाडा गावात खूप लोकं राहत होती पण अचानक एका रात्रीतून सगळे लोकं गायब झाली जशास तसे सगळ सोडून कुठे गायब झाले आणि कसे गायब झाले याचा उलगडा आज पर्यंत कोणालाही झालं नाही १७० वर्षा पासून सुन्या पडलेल्या ठिकाणी आज पण लोकांचे आवाज ऐकू येतात तेथे लोक सोन्याच्या शोधात जातात असे म्हणतात की इथे सोने लपवून ठेवलेले आहेत गाव सोडताना गावातील लोकांनी शाप दिला होता यानंतर या गावात कोणीही स्थापित होऊ शकणार नाही.

Image Source

रंग महाल

उत्तर प्रदेशातील वृंदावन याठिकाणी आजपण एक रहस्य दडलेले आहे असे म्हणतात की आजही रासलीला केल्यावर या रंग महालामध्ये भगवान श्रीकृष्ण व राधा येथे विश्राम करण्यासाठी येतात मंदिरात प्रत्येक दिवशी अंधार होण्याच्या आधी माखन खिचडी आणि प्रसाद ठेवतात आणि झोपण्याचा एक पलंगही लावला जातो आणि रात्र झाली की महालाचे दरवाजे आपोआप बंद होतात आणि सकाळी पलंग बघून असे वाटते की येथे रात्री कोणीतरी झोपलेले होते आणि सोबतच ठेवलेलं प्रसादही कोणी खाल्लेला आहे असे म्हणतात की तिथे येणाऱ्याचा मृत्यू होतो हे मंदिर आजही लोकांसाठी एक रहस्यच आहे. 

यम द्वार

यम द्वार हे तिब्बत या ठिकाणचे एक रहस्यमय ठिकाण म्हणून ओळखले जाते असे म्हणतात की हे यमराजाच्या घराचे द्वार आहे. येथे राहणाऱ्यांचा मृत्यू हा निश्चित होतो अशा कितीतरी घटना तिथे होऊन गेल्या आहेत पण त्याचा उलगडा झालेला नाही. तिब्बती लोक याला चार टेन कॉग नन्ही या नावाने ओळखतात याला दोन प्रवेशद्वार असून एक द्वार संसार तर दुसरा मोक्षधाम म्हणून ओळखला जातो, हे मंदिर महाद्वार कोणी आणि कधी बांधले याची काहीही माहिती नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button