Plants not Good for Home as per Vastu हि पाच झाडे घरात चुकूनही लावू नका

302 views
Plants not Good for Home

Plants not Good for Home as per Vastu वास्तू शास्त्रा नुसार घरात ही पाच झाडे चुकूनही लावू नका जाणून घ्या या मागची कारण. 

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती .. 

झाडाला पाहून आपण आनंदी होतो. त्या प्रमाणे आपण जगायला शिकतो. 

या उक्ती प्रमाणे आपण जाडे लावतो. ,झाडापासून आपल्याला शुद्ध हवा आणि ऑक्सीजन मिळतो. 

घरात किंवा घरच्या अंगणात आजूबाजूला हिरवळ आपल्या सर्वानाच आवडते. त्या हिरव्या गार झाडं पाहून मन प्रसन्न होते.

असे ही म्हणतात की डोळ्याना हिरवे दिसले की डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

आपण घरात किंवा घराच्या परिसरात अनेक प्रकारची indoor आणि outdoor झाडे लावत असतो.

परंतु तुम्हाला माहीत आहे का ही झाडे पण आपल्याला सुख समृद्धी देत असतात.

त्या मुळे वस्तुशास्त्रा नुसार काही झाडे घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात लावल्याने आपल्या घरात नकारात्मक शक्ति वाढण्याची संभावना असते.

त्यामुळे ही पाच झाडे घरात लावण्यास वास्तु शास्त्रात मनाई आहे ती कोणती आणि का लावत नाही हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

Five Plants not Good for Home as per Vastu

काटेरी झाड Thorn Tree Plant

काटे असलेले झाड घराच्या परिसरात लावू नये. असे म्हणतात की काटेरी झाड घरात नाकारात्मकता आणतात आणि या सोबतच आपल्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. 

असे ही म्हनतात की, असे काटे असलेले झाड घरच्या आसपास लावल्यास आर्थिक आणि काही संकटाना तोंड द्यावे लागते.

या कारणामुळे वास्तुशास्त्रा नुसार असे झाड आपल्या घरात किंवा घरच्या बाहेर न लावलेलेच बरे. पण गुलाब आणि कोरफड ही याला अपवाद आहे. 

Plants not Good for Home as per Vastu
Plants not Good for Home as per Vastu

Plants not Good for Home as per Vastu पिंपळाचे झाड Pimple tree

पिंपळाच्या झाडाला धार्मिकदृश्य खूप महत्व आहे. आपण या झाडाची पूजा करतो. असे ही म्हणतात की या झाडाखाली विष्णूचा वास असतो.

पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र मानतात. पण हे झाड घरात किंवा आजूबाजूला लावत नाहीत.

अशी मान्यता आहे की हे झाड लावल्याने पैशाची चणचण भासते.

यामागचे वैज्ञानिक कारण असे ही आहे की हे झाड खूप मोठे होते आणि याच्या मुळा खूप पसरतात यामुळे भिंतीना नुकसान पोहचते.

या कारणाने ही झाड घरात लावत नाहीत. 

मंदारचे झाड Mandar tree

बरेच जन घरात मंदारचे झाड लावतात. परंतु वास्तु शास्त्रा नुसार ते चांगले मानले जात नाहीत. 

ज्या झाडान मधून दूध निघते असे झाड घरात लावू नये यामुळे घरात नाकारात्मकता येते. 

चिंचेचे झाड Tamarind Tree

चिंचेचे झाड ही घरात न लावण्याचा सल्ला देतात.

या झाडा बद्दल असे म्हणतात की हे झाड घरात लावल्यास आपल्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते.

घरात रोग घर करतात आणि आपापसातील संबध ही खराब होतात. आणि हे ही झाड खूप मोठे असते घरात लावणे शक्य नसते. 

How to grow basil at home घरामध्ये तुळस सुकून जात असेल तर हे उपाय करा

खारकेचे झाड Palm Tree

खजुराचे झाड दिसायला आकर्षित असले तरी खजुराचे झाड घरात घरात लावण्यास मनाई केली जाते.

ही रोप घरात लावल्यास घरातील लोकांची प्रगती खुंटते तसेच आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागते. 

ही पाच झाडे घरात न लवलेलीच चांगली असे वस्तु शास्त्रा नुसार म्हंटले जाते. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

5 Benefits of Blowing Shankh at Home while Pooja | DOMKAWLA 02/08/2021 - 11:18 am

[…] हि पाच झाडे घरात चुकूनही लावू नका […]

Reply

Leave a Comment