Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

by Geeta P
530 views
Why do Chameleons Change Color

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो? निसर्गानेच सरड्याला दिले रंग बदलण्याचे वरदान आणि म्हणूनच सरडे रंग बदलतात. 

माणसे परिस्थिती बघून किंवा वेळ बघून आपले निर्णय आणि स्वभाव बदलत असतात. पण यामागे फक्त त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. असे माणसे जास्त राजकारणामध्ये पहायला मिळतात. 

अशा माणसांना मराठी मध्ये एक म्हण आहे. “सारड्यासारखे रंग बदलणारी माणसे”

ही म्हण मराठी मध्ये रुजू होण्याचे कारण म्हणजे सरडा देखील आजुबाजूची परिस्थिती पाहूनच आपला रंग बदलत असतो. 

म्हणजे सरडा एखाद्या झाडावर बसलेला असेल तर तो त्या झाडा प्रमाणेच आपला रंग बदलतो. पानंवर झाडंवर बसलेला असेल तर त्यानुसारच तो आपला रंग धारण करतो. 

रंग बदलत असताना सरड्याला फार वेळ देखील लागत नाही. पापणी लवते न लवते तो पर्यंत सरड आपल्या रंग बदलत असतो. परंतु आता सरड्यांचा नवीन प्रकारे अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि त्या अभ्यासानुसारच सरडा परिस्थिती नुसार रंग बदलतो हा समज आता चुकीचा उरलेला आहे. 

Why do Chameleons Change Color सरडा रंग का बदलतो?

आत्ताच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की सरडा आपला रंग बदलतो कारण तो आपल्या शरीराचे तापमान समतोल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर इतर सरडयाना आपला मूड कसा आहे हे दाखवण्यासाठी आपले रंग बदलत असतात.

या पृथ्वीवर सरड्यांच्या 160 जाती अस्तित्वात आहेत. आणि त्या जाती रेन फॉरेस्ट तसेच वाळवंटातही तग धरू शकतात. 

उत्क्रांती वंश शास्त्रज्ञ आणि प्राण्यांचेअभ्यासक मिशेल मिलिकोंवींच Michel C. Milinkovitch

सारड्यांच्या रंग बदलाच्या अभ्यासामध्ये त्यांनी चार प्रौढ आणि चार मादी तर चार किशोर वयीन सरडे यांचा समावेश होता. 
यांच्या म्हणण्या नुसार लोकांचे म्हणणे असते की सरडे बुद्धी बळाचा पटलावर जर ठेवला तर तो त्याच रंग धारण करतो. त्यांचा म्हणण्या नुसार हा समज चुकीचा आहे . 

Milinkovitch यांचा म्हणण्या नुसार सारड्यांकडे लढण्याची ताकद कमी असते. त्यामूळे त्यांना निसर्गामध्ये ओळखणे थोडे कठिण असते. 

सरड्यांचे चावे विषारी नसतात, त्यांचा त्वचेवर विष नसते ते खूप वेगाने धाऊ शकतात.  पण त्यांच्यात प्रतीस्पर्धकाशी स्पर्धा करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते.  लपणे हे इतकेच शस्त्र त्यांचा कडे असते. 

Why do Chameleons Change Color

निसर्गानेच त्यांच्यात नैसर्गिक रंग भरलेत.  त्यांना एक नैसर्गिक वरदान मिळालय.  असे म्हणायला हरकत नाही. 

सरड्यांकडे पांनाचा, झाडांचा, खोंडाचा रंग नैसर्गिकच असतो.  पण यामध्ये बदल करून स्व:ताचे संरक्षण करण्याची क्षमता त्यांचात असते.

सरड्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी त्यांना ही व्यवस्था असते.  ते चय पचनातून ते स्वतःचे तापमान निर्माण करू शकत नाहीत.

आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे सरडे एटक्या पटापट रंग कसे बदलत असतील? पण त्यांच्या त्वचेची बाहेरील बाजू पारदर्शक असते. त्वचेच्या पडद्या खाली अनेक स्तर असतात. स्तरा मध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. 

या विशेष पेशीना क्रोमॅटोफोर्स असे म्हटल जाते.  प्रत्येक स्तरावरील क्रोमेटॉफोर्स वेगवेगळ्या प्रकारच्या रंगद्रव्यानच्या थेलयाणि भरलेले असतात. 

सर्वात मधल्या स्थरात मेलेनोफॉरेस असतात जे मॅलेनिनन भरलेले असतात.  हे रंग द्रव्य असे आहे ज्यामुळे मानवी त्वचेलाही छटा दिसतात. 

तसेच शेवटच्या स्तरावर आयरिडोफॉरेस पेशी आहेत.  ज्यात निळ्या रंगाचे रंग द्रव्य असते.  ज्या मध्ये पांढरा आणि निळा रंग प्रतिबिंबितं होतो. 

त्याच पेशीच्या वरच्या स्तरावर झेंथोंफॉरेस एरिथ्रोफॉरेस आहेत.  जे पिवळ्या आणि लाल रंगद्रव्यांनी भरलेल असतात.  

कांदा कापल्याने डोळ्यात पाणी का येते?

असे म्हणायला हरकत नाही की हे सगळी रंगद्रव्ये कुलूप बंद असतात.  Why do Chameleons Change Color पण त्यांचा तापमानात बदल झाला की त्यांच्या तील मज्जातंतू क्रॉमॅटोफोर्सना आज्ञा देतात की तापमान कमी करायचे की वाढवायचे. 

आज्ञा नुसार हे लॉक उघडले जाते.  रंग बाहेर पडतात सर्व स्तरांमध्ये क्रोमेटोफोर्स रंग बदलतात. सरडे शरिरभर रंगांची उधळण करत असतात.

सरडे उत्साही असतात तेंव्हा एरेथरोफॉरेस च्या मदतीने लालरंग धारण करतात. बाकी रंगाचा बाहेर येऊ देत नाहीत. 

जेंव्हा सरडे शांत असतात तेंव्हा त्यांचा रंग हिरवा असतो. त्याच प्रकारे सरडे निळा, पिवळा, हिरवा, लाल, ब्राऊन रंग धारण करत असतात. 

हे मूळ कारण आहे सरडा रंग का बदलतो? याचे . प्राण्याचे जग कीती वेगळे असते न ते वेगवेगळ्या गोष्टीं मधून आपल्याला आश्चर्यचकित करत असतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment