Walt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला

by Geeta P
240 views
Walt Disney

कार्टून दुनयेचे बादशाह Walt Disney यांचा या एका वाईट सवयी मुळे त्यांचा पूर्ण इतिहासच बदलून टाकला . 

Walt Disney यांना लाहानांन पासून मोठ्यां पर्यन्त सर्वजण ओळखतात. Walt Disney लहान मुलांचे जादुई बादशाच आहेत जणू. 

यांचे नाव घेताच डोळ्या समोर कार्टून ची अक्खी दुनियाच उभी राहते.

मिकी माऊस, मिनी माऊस,  वेणी द पु असे अनेक कार्टून आपल्या डोळ्या समोर येतात.

ही कार्टून्स फक्त एक नाव नसून Walt Disney यांनी त्यांना अजरामर केलेले व्यक्तीमत्वच आहेत. 

जगात असे खूप कमी लोक आहेत ज्याना कार्टून्स बद्दल माहिती नसेल. जेंव्हा लोक काहीतरी करायचय आणि कुठली तरी कंपनी कढायचीय याचा विचार करतात तेंव्हा ते आधी त्यातील होणाऱ्या फायदा किंवा तोट्याचा आधी विचार करत असतात.

परंतु Disney यांनी ठरवले की त्यांना एक कंपनी कढायची तेंव्हा त्यांचा डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते.

त्यांना मूलांनसाठी असे काही तरी करायचे होते ज्या मुळे मूल एका स्वप्नात जगतील.

त्याची स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. यातूनच पुढे Disney स्टुडिओ ची निर्मिती झाली.

जगातील एक यशस्वी व्यक्ती म्हणून Walt Disney यांचा कडे पाहिले जाते.  यांचा जीवन प्रवास हा जगाला थक्क करणार आहे.

व्यवसाय क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व म्हणून लोक यांचा कडे बघतात. लहान मुलान साठी Walt Disney हे जादुई हिरोच होते. त्यांचा प्रत्येक गोष्टी चे मुलं अनुकरण करतात.

Disney World

कार्टून दुनियेची गंमत मुलांना जवळून अनुभवता यावी म्हणून Walt Disney आणि त्यांचे भाऊ रॉय यांनी “Disney World“ ची ही निर्मिती केली. Disney World ही जगातील सर्वात जास्त लोकांनी भेट देलेले जगातील ५ व्या नंबरचे ठिकाण आहे. 

या ठिकाणाला वर्षातून सरासरी ६ करोंड लोक भेट देतात असे म्हणतात . Disney World ही लहान मुलाणसाठी एक छोटस विश्वच आहे.

एखाद्या क्रिकेट वेड्याला जसे क्रिकेटचा स्टेडियमवर जाऊनच समाधान मिळते तसेच लहान मुलाना डिस्नी वर्ल्ड मध्ये गेल्यास जाणवते.

Walt Disney एक आदर्श व्यक्तीमत्व होते कारण त्यांचा कडे वाखनण्या जोगे गुण होते आणि असावेत एक आदर्श कारण आजही लोक त्यांचा आदर सम्मान करतात.

पण या सोबतच त्यांचात एक  वाईट गुणही होता. 

आता अस म्हणल तर सर्वांकडेच एखादा दुर्गुण असतोच पण यांची वाईट सवय खूप घातक होती.

या सवई मुळे त्यांचा मृत्यु नंतर ही त्यांची सवय लपवण्यासाठी त्यांचा सहकार्याना Walt Disney चा अखा इतिहासच बदलावा लागला .आणि ही गोष्ट लपवावी लागली. 

Walt Disney
Walt Disney

Walt Disney ची वाईट सवय bad things about disney

अशी कुठली गोष्ट होती? ज्यामुळे त्यांचा एका सवयी मुळे सगळा इतिहास बदलावा लागला?

ज्या सवयी ची आपन चर्चा करत होतो तर Walt Disney यांना धूम्रपान करण्याची सवय होती.

ऐकायला थोड रोचक वाटेल पण Disney यांचा या सवयि मुळे त्यांच्या शरीरावर त्याचा खूप परिणाम झाला होता. 

त्यांना दिवसाला २ ते ३ सिगारेटचं पॅकेट लगात होते. 

जास्त प्रमाणात ते सिगारेट ओढत होते या वरुण सर्वानाच असा प्रश्न पडला असेल की हा माणूस दिवसाला एवढे सिगारेट ओढत असेल तर त्यांचा एक तरी फोटो सिगारेट ओढताना असेल.

पण असा एक ही फोटो तुम्हाला इंटरनेटवर किंवा Disney यांचा फोटो संग्रहालयात सुधा तुम्हाला असा फोटो भेटणार नाही.

कारण Walt Disney यांनी त्यांचे सर्व फोटोशॉप केलेत.

पण ही गोष्ट ईथेच थांबत नाही तर Disney यांचा हातातील फोटोशॉप करून सिगारेट जरी लपवली असली तरी त्यांचा हाताचा बोटांचा पकडी चे काय ?

Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो

Point with two fingers

मग ही पकड कसली हा प्रश्न सर्वानाच पडला असेल? मग ही गोष्ट लोकाना समजावून सांगण्यासाठी त्यांचा कर्मचाऱ्यानी एक कल्पना शोधून काढली आणि त्या पकडीला त्यांनी “Point with two fingers “ असे नाव दिले.

ते एवड्यावरच थांबले नाही तर त्यांनी Disney मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचार्याला प्रशिक्षण देवून “Point with two fingers “ करायला लावले.

कारण सर्वानाच असे वाटेल की Disney यांची ही सवय आहे आणि कर्मचारी त्यांना श्रद्धांजलि वाहत आहेत. 

असे करण्याचे कारण अगदी स्पष्ट होते Disney यांचा चाहता वर्ग सर्व लहान मुलांचा होता.

आणि लहान मूल त्यांचे अनुकरण करू नयेत आणि आपल्या लाडक्या हीरोला सिगारेट ओढताना पाहून जर त्यांना पण अशी वाईट सवय लागू नये म्हणून ही सर्व खटाटोप करावी लागली.

सांगताना अत्यंत दुख : वाटते परंतु मित्रानो या वाईट सवयी मुळेच Walt Disney यांनी आपला जीव गमावला.

या एका सवयिमुळेच Disney World  च स्वप्न सुधा त्यांना सत्यात उतरताना पाहता आल नाही .

अति सिगरेटचा सेवनाणे त्यांना फुफ्फसांचा कॅन्सर झाला आणि या कारणानेच त्यांनी 1966 मध्ये आपला जीव गमावला. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment