Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घरगुती उपाय

by Geeta P
340 views
Teeth Care

दातांची काळजी Teeth Care ही घेतल्यामुळे मिळालेले स्मित हास्य किंवा नितळ हास्य ही एक देवाने दिलेली देणगीचा फायदा करून घेत येतो.

जेंव्हा आपन खळ खळूण हसतो तेंव्हा ते हसताना आपले दात स्वच्छ असले तर हे गोड हसू आपल्याला प्रसन्न करते. निखळ हसू त्या व्यक्तीची खासियत असते.

हे हसू इतर कोणत्या ही प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. परंतु जर दात  किडलेले असतील तर ते हसू पाहून प्रसन्न कसे वाटेल ?

मनुष्याचे स्मित हसू आणि दातांचे आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. आपले आरोग्यही दाता वर अवलंबून असते कारण दात चांगले असतिल तर आपण आहार ही चांगला घेऊ शकतो.

जर दात किडलेले असतील तर अन्न नीट चावता येणार नाही. त्याचा दाता ला त्रास होईल आणि आपण आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार नाही.

मग यासाठी आपल्याला डॉक्टरां ची मदत घ्यावी लागते.  त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.  वेळही वाया जातो. 

डेंटल ट्रीटमेंट खिशाला परवडणारी नसते.  Prevention is better than cure! या म्हणीप्रमाणे आपल्याला आधीपासूनच दातांची काळजी Teeth Care घ्यायला हवी.

कारण एवढे त्रास सहन करून घेण्याच्या आधी आपण दातांची काळजी व्यवस्थित आणि घरगुती उपाय वापरून घेतली तर दातांचा त्रास कमी होईल. 

घरगुती उपाय याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही यामुळे आज आपण 

या लेखात अशाच काही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून दातांची काळजी कशी घेता येते ते पाहणार आहोत. 

Teeth Care
Teeth Care

Teeth Care Tips

रोजच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी करणे

रोजच्या अन्नपदार्थां मध्ये साखरेचे प्रमाण असते. हे आपल्या शरीराला अपाय कारक असतेच पण त्याचा परिणाम दातांवर होतो.

जसे आपण जर रोज चॉकलेट, मिठाई, अति गोड पेय घेतले तर दात किडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा गोड पदार्थाचे सेवन टाळावे. 

ज्या पदार्थांमध्ये जास्त गोडाचे प्रमाण असते असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे पण जर खाल्ले तर यानंतर लगेचच चूळ भरावी. 

दात दुखी साठी लवंगा चा वापर

आपल्या सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असणारी लवंग दातांसाठी अतिशय गुणकारी असते.

रोज जेवणानंतर एक लवंग खाल्ली तर किंवा चघळली तर दातांच्या किडण्याची समस्या अजिबात उद्भवणार नाही.  

लवंगाचे तेलही दातांसाठी फायदेशीर असते. जर दात दुखत असतील तर स्वच्छ कापसाच्या बोळ्यावर लवंगाचे तेल घेऊन तो बोळा दाता खाली ठेवा यांनी दात दुखी थांबते.

हा उपाय केल्याने काहीही साईड इफेक्ट होत नाही आणि दात किडन्या पासूनही आपले रक्षण होते. 

कोरफडीचे जेल लावून दातांची काळजी घ्या

कोरफडीचे जेल दातांसाठी उपयुक्त असते.  हे ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल!  सर्वांच्याच घरात कोरफडीचे रोप लावलेले असतात.

( नाही मिळाल्यास एलोवेरा टुथ जेल कुटेही मिळते ) कोरफडीचे जेल  दातांच्या समस्यांना दूर करते. दातांच्या सर्व समस्यांवर खरोखरच हे खूप गुणकारी आहे.

आणि हे दाता पोटात गेले तर याचा काहीही अपाय होत नाही.  हा घरचा उपाय तुम्ही बिनधास्त वापरू शकता. 

तेलाने चूळ भसरणे 

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

दाता मध्ये असणारे जिवाणू, किंवा त्यांना लागलेली कीड, दातांच्या कुठल्याही समस्या तेलाने चूळ भरण्याने दूर होऊ शकतात.

हा एक घरगुती आणि चांगला उपाय आहे काही तज्ञांच्या म्हणण्या नुसार

तेलाने चूळ भरल्याने दातांची कीड लागण्या पासून मुक्तता होते.  शिवाय दात पांढरे होण्यासाठी मदत होते.

अमेरिकन डेंटल असोसिएशन चे असे म्हणणे आहे की

तेलाने गुळण्या करणे ही एक जुनीच दंत चिकित्सा आहे याने दाता तील पोकळी कमी होऊन दात पांढरे शुभ्र होतात. तोंडाचे आरोग्य सुधारते.

अमेरिकन डेंटल असोसिएशन

अशी भरावी चूळ 

चूळ भरण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, तिळाचे तेल, किंवा सूर्यफूल तेल वापरू शकता.

या यामध्ये स्वच्छ ब्रश करून झाल्यावर तेल तोंडात धरून एक मिनिट भर चूळ भरावी आणि नंतर थुंकून द्यावे.

विटामिन डी ठरू शकते दातांची काळजी साठी उपयुक्त

२०१३ मधील संशोधनात असे सिद्ध झाले की विटामिन डी दातांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

विटामिन डी मध्ये असणाऱ्या खनिजांमुळे दातांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. 

दात दुखी. दातांना कीड लागणे दूर होतात च पण यामुळे हिरड्या ही मजबूत होतात. 

या पदार्थांमध्ये असतात डी व्हिटॅमिन

दूध. दही, आंडे, माशरूम, चीज, पनीर, मासे, ओट्स, मोड आलेले धान्य, आणि संत्रे या सर्व पदार्था मध्ये विटामीन डी मुबलक प्रमाणात असते. 

या मुळे हे पदार्थ आपल्या आहारात वापरावीत आणि दातांचा समस्या पासून दूर राहावे. 

व्हॅनीला ईसेन्स.

व्हॅनीला ईसेन्स. मध्ये दातांच्या समस्या दूर ठेवणारे घटक असतात. ऐकायला थोडे आश्चर्य वाटेल पण खरच  व्हॅनीला ईसेन्स दातांना उपयुक्त घरगुती औषध आहे, 

हेही तुम्ही लवंगाचे तेला सारखेच कापसाच्या बोळ्यावर घेऊन दाता खाली ठेवू शकता यामुळे दात दुखी थांबते. 

दाताला लागलेली कीड ही थांबते. 

तर मग दात दुखण्या पासून आणि ते किडण्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही हे वरील उपाय नक्की करा

डेंटिस्ट च्या महागड्या ट्रीटमेंट पासून नक्की वाचा.

Related Posts

Leave a Comment