Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

by Geeta P
575 views
Vegetarian Protein Sources

Vegetarian Protein Sources आज आपण शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत असलेले अन्ना विषयी जाणून घेणार आहोत

आपल्या कडे अनेक जन शाकाहारी असतात तर काही जाण मांसाहारी असतात. सद्या चातुर्मास चालू झाला आहे. त्यामुळे बरेच जाण शाकाहारी राहणे पसंत करतात.

पण मांसाहार करणाऱ्या लोकांचे असे म्हणणे असते की मांसाहार केल्याने जास्त ताकद भेटते कारण त्यात जास्त प्रथिने असतात.

मग शाकाहारी लोकांना प्रथिने कसे भेटणार?

तर आपण आज या विषयी च बोलणार आहोत. शाकाहारी लोकांनी खालील पदार्थांचे सेवन केल्यास त्यांना या पासून भरपूर प्रोटीनस भेटतील.

शाकाहारी प्रथिने स्त्रोत (Vegetarian Protein Sources)

Vegetarian Protein Sources
सोयाबिन न्यूट्रीला

सोयाबिन न्यूट्रीला

सोयाबिनला शाकाहारी प्रथिने चा स्त्रोत मानले जाते. या मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. त्याच बरोबर या मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,लोह असतात.

यामध्ये वजन कमी करणारे घटक आहेत. याच बरोबर सोयाबीन रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. कोलेस्टरॉल चे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत करते. सोयाबीन चंक्स ची भाजी करून खाऊ शकता. सोयाबीन ला भातामध्ये मध्ये मिक्स करून खाउ शकता . 

Lentil Dal
Lentil Dal

मसूर डाळ Lentil Dal

मसूर डाळीत खूप प्रमानात शाकाहारी प्रथिने असतात, एक किलो मध्ये जवळजवळ १८ ग्राम प्रथिने असतात. या मध्ये फायबर ही मोट्या प्रमाणात असतात.

शिवाय यामध्ये मॅग्नेनीज, फोलट लोह असते. या मुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे मसूर डाळीचे रोजच्या जेवनात सेवन करावे.

मसूर डाळ आपण कुठल्याही प्रकारे खाऊ शकतो. त्याची आमटी छान लागते. तसेच कुठलेही भाजीमध्ये मिक्स करूनही करू शकतो.

मसूर डाळीत लोह मॅग्नेनीज असतात. म्हणून ती कुठल्याही प्रकारे सेवन केल्यास त्याचा शरीराला फायदाच होतो.

Vegetarian Protein Sources
Tofu

टोफू Tofu (Soya Paneer) also Vegetarian Protein Sources

टोफू म्हणजे सोय पनीर. हा एक पनिरचाच प्रकार असतो. सोयाबीनचे दुध काढून त्यापासून हे पनीर बनवले जाते. याची भाजी किंवा पराठे आणि सूप असे प्रकार बनवता येतात.

टोफू मध्ये मोट्या प्रमाणात प्रथिने असतात. त्याच बरोबर या मध्ये कॅल्शियम असते. टोफू ची बिर्याणी ही असते. खायला ही छान लागते. त्यामुळे आपन ती पोष्टिक म्हणून खाऊ शकतो.

टोफू मध्ये सोयाबींनचे सर्व गुणधर्म असतात. त्या मुळे ते अतिशय पोष्टिक असते.

Vegetarian Protein Sources
Quinoa

किनोवा ( Quinoa) 

किनोवा या पदार्थाचा डायट फूड मध्ये समावेश होतो. आज काल सर्वानाच डायट चे फॅड लागलय. त्या मध्ये हेल्दी खाण्या कडे सर्वांचा कल आहे.

हे किनोवा एक सुपर फूड म्हणून ओळखले जाते. याच्या सेवनाने जेवणात प्रथिने तर भेटतातच हे खल्याने घातक आजारा पासून आपण आपले रक्षण करू शकतो. 

या मध्ये विटामीन ई, कॅल्शियम, तसेच फायबर, झिंक असते. कॅन्सर सारखे आजार होत नाहीत.  त्याच बरोबर मधुमेह नियंत्रणात राहतो.

याचा डाळी पासून पोहे ,उपमा च नाही तर पोळी सुधा बनऊ शकतो.

Green Peas
Green Peas

हिरवे वाटाणे ( Green Peas) 

हिरव्या  वाटण्यांमध्ये शाकाहारी प्रथिने असतातच पण या सोबतच विटामिन अ, सी, क, फायबर आणि कॅल्शियम, जस्त, तांबे यांचे ही प्रमाण असते.

वाटाण्या च्या सेवणाने वजन आटोक्यात राहते. कोलेस्टेरॉल वाढत नाही. तसेच हृदयासंबंधी कोणतेही आजार होऊ शकत नाही.

आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहते.  याचे भाजी करून खाऊ शकता किंवा पॅटीस

Amaranth
Amaranth

राजगिरा ( Amaranth) 

आपल्या कडे उपवासाला खाल्ल्या जाणारा राजगीरा सर्वाना आवडतो. पूर्वी पासूनच आपल्या कडे राजगिर्याचे सेवन केले जाते.

या मध्ये मोट्या प्रमाणा मध्ये शाकाहारी प्रथिने असतात. त्या सोबतच यात कॅल्शियम आणि लोह ही असते त्यामुळे हे आपल्या शरीराला खूप महत्वाचे असते.

याचे लाडू बनवून किंवा चक्की बनून खातात. तसेच हे केसांच्या आरोग्या साठी चांगले असते. 

Vegetarian Protein Sources
Vegetarian Protein Sources

शाकाहारी प्रथिने युक्त भाज्या Vegetarian Protein Sources

आपल्याला माहीतच आहे फळ आणि भाज्यां मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात

पण त्या मध्येही काही भाज्या मध्ये प्रथिने जास्त असतात. अशा भाज्यांचा आहारामध्ये वापर केला पाहिजे. 

यामध्ये प्रामुख्याने पालक, शतावरी, बटाटे, ब्रोकोली या भाज्या मध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात.

त्यामुळे दररोजच्या आहारात या भाज्यांचा उपयोग जास्त करावा त्याचप्रमाणे फळांमध्ये ही प्रथिने असतात. 

यामध्ये आवळा, संत्री, केळी, स्ट्रॉबेरी, पेरू यामध्ये प्रथीनान सोबतच विटामिन, फॉस्फरस आणि झिंक यांचे प्रमाणही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे याचा उपयोग शरीराला चांगल्या प्रकारे होतो याचे सेवन दररोज करावे. 

Vegetarian Protein Sources List

  • सोयाबिन न्यूट्रीला
  • हिरवे वाटाणे ( Green Peas) 
  • राजगिरा ( Amaranth) 
  • किनोवा ( Quinoa)
  • टोफू Tofu (Soya Paneer)
  • मसूर डाळ Lentil Dal

वरील सर्व पदार्थांचे सेवन करून आपली ताकद वाढू शकता. आणि यामुळे शाकाहार काही प्रथिने युक्त असतो हे सिद्ध करू शकता.  

Related Posts

1 comment

SANDIPAN KARDE 30/07/2020 - 1:04 pm

Good

Reply

Leave a Comment