Knowledge

हा खेळाडू ८० च्या दशकात बराच काळ भारतीय संघाचा कप्तान होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

सुनील गावसकर एक प्रखर व्यक्तिमत्व

क्रिकेट मधला मराठी माणूस, यांचे पूर्ण नाव सुनील मनोहर गावसकर क्रिकेट मधल्या इतिहासामध्ये आवर्जून घेतले जाणारे हे मराठी नाव. यांचा जन्म १० जुलै १९४९ रोजी झाला, १९७१ मध्ये कसोटी क्रिकेट खेळा मध्ये पदार्पण केले.

कसोटी मध्ये त्यांनी एकूण दहा हजार पेक्षा जास्त धावा काढलेले आहेत. आणि हा टप्पा ओलांडणारे ते पहिलेच क्रिकेटर, एका टेस्ट मध्ये त्यांनी 774 धावा काढून मालिका जिंकून देण्याचा मान पटकावला. त्यांची बॅट नेहमीच बॉलर चा थरकाप उडवत असे.

सुनील गावसकर यांनी ३५ कसोटी शतके केली आहेत. त्यांचा हा विक्रम २००५ पर्यंत होता. नंतर सचिन तेंडूलकरने तो मोडला. सलग तीन शतक काढण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.

गावसकर ७० ते ८० या दशकात बराच काळ भारतीय संघाचे कप्तान म्हणून होते. भारताला १९८३ सालचा विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा त्यांचा होता. फलंदाजीबरोबर गावसकर उत्तम क्षेत्ररक्षकही होते

अशा महान क्रिकेट खेळाडू चा आज वाढदिवस आहे, या खेळाडूला डोमकावळा टीम तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button