Monsoon Skin Care Tips पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे सोपे मार्ग

by Geeta P
197 views
Monsoon Skin Care Tips

पावसाळ्यात आरोग्याची घ्यावयाची काळजी

Monsoon Skin Care Tips पावसाळ्यात आपली पचन शक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. Monsoon skin care tips home remedies

त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असतात.

त्यासाठी आपली पचनशक्ती वाढविणारे आहार घेतला पाहिजेत.

गरम आणि उष्ण युक्त आहार घेणे महत्त्वाचे असते.

संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. 

पावसाळ्यात गरम आहार घ्यावा आणि शिळे पदार्थ खाणे टाळावे.

तसेच रोजच्या जेवणात आदरक, लसूण, काळी मिरी, लवंग आणि हळद या सारख्या गरम आणि अँटी बायोटीक पदार्थांचा वापर करावा.

यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.

गरम मसाले घालून केलेले सूप, आल्याचा चहा किंवा तुळशीचा चहा घेतल्यास पचन शक्‍ती सुधारून सर्दी खोकला यांसारखे आजारा पासून आपले रक्षण करू शकतो.

तसेच संधिवात यांसारख्या आजारही होणार नाहीत पावसाळ्यात शक्यतो जुने धान्य वापरावे परंतु ते एक वर्षापेक्षा जास्त जुने नसावी.

यामध्ये ज्वारीची भाकरी तेल लावलेली चपाती वरण-भात आणि ताक हलका आहार घ्यावा जो पचण्यास सोपा असतो तसेच पावसाळ्यात रात्रीचा आहार नेहमी हलका असाव.

त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी करण्यापेक्षा योग्य आणि हलका आहार घ्या आणि निरोगी रहा

Monsoon Skin Care Tips and Monsoon skin care tips home remedies
monsoon skin care

Monsoon Skin Care Tips पावसाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

हवेत दमटपणा आणि मॉइश्चर जास्त असल्यामुळे त्वचा ओलसर राहते आणि तेलकट होते त्यामुळे जंतुसंसर्ग आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे त्वचेवर खाज येते आणि आग होते यामुळे त्वचा कोरडी ठेवणे खूप महत्त्वाचे असते कडुलिंबाच्या पानांची पेस्ट किंवा भिजवलेल्या मीठ यांची पेस्ट जिथे आपल्याला खाज येते किंवा आग होते.

अशा ठिकाणी लावले तर आराम मिळतो. तसेच कडूलिंबाचे उकळलेले पाणी आंघोळीला घेतल्यास आपल्याला स्कीनचे इन्फेक्शन होणार नाही.

ज्यांची स्कीन ड्राय आहे त्यांची आणखी ड्राय होते आणि ज्यांची स्किन तेलकट आहे त्यांची आणखी तेलकट होते त्यामुळे पिंपल्सची समस्या जाणवते.

सौंदर्यात आणि आरोग्यात भर टाकणाऱ्या कोरफडीचे आश्चर्य कारक फायदे

तेलकट त्वचेची काळजी

जर त्वचा कोरडी झाली असेल तर आंघोळीच्या अगोदर कोमट तिळाचे तेल लावून मसाज करावा आणि नंतर अंघोळ केल्यास त्वचा मऊ होते.

चंदन, बदाम तेल, हळद हे सर्व एकत्र करून लावल्याने त्वचेचा कोरडे पणा आणि खरखरीत पणा जाऊन स्वच्छ मुलायम होते.

त्वचा तेलकट झाली असेल तर दिवसातून तीन ते चार वेळा पाण्याने तोंड धुणे खूपच महत्त्वाचे असते.

तुळशीचे पाने, कडुलिंबाची पाने आणि पुदिन्याची पाने एकत्र पेस्ट करून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याला इन्फेक्शन होणार नाही.

जंतुसंसर्ग ही होणार नाही आणि चेहरा उजळ होईल.

पावसाळ्यात ब्लीच करू नये त्वचा कोरडी होते त्याऐवजी टोमॅटो चा गर लावल्याने पिंपल्स निघून जातील आणि चेहऱ्याची त्वचा निखळ होईल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment