aloe vera benefit सौंदर्यात आणि आरोग्यात भर टाकणाऱ्या कोरफडीचे आश्चर्य कारक फायदे

Published Categorized as Health

सौंदर्यात आणि आरोग्यात भर aloe vera gel टाकणाऱ्या कोरफडीचे आश्चर्य कारक फायदे त्यामुळे कोरफड आपल्या आरोग्यासाठी अत्यन्त उपयुक्त आहे. 

Aloe Vera Benefit

कोरफड मध्ये अँन्टीव्हारल, अँटीबाक्टेरियल प्रॉपर्टीस आहेत, त्यामुळे श्वसनसंस्थेच्या अनेक विकारांवर जसे सर्दी, खोकला, सायनस तसेच दमा अशा आजारांमध्ये फायदा होतो.

श्वसना सारख्या रोगांवर कोरफडीच्या गरात मध मिसळून दोन वेळा घेतल्यास नक्किच आराम मिळतो. 

कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, ऍसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो.

नियमित कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने चयआपचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

कोरफडीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे ते रक्तातून विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते आणि आपले रक्त शुद्ध होत.

अनेक प्रकारच्या त्वचा विकार आणि रक्तविकार कमी होण्यास मदत होते.

त्वचेच्या अनेक समस्यांवर कोरफड उपयुक्त ठरते. लहान बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यास कोरफड मदत करते. 

अशा अनेक गुणांनी भरपूर असलेली कोरफड बरेच आजार कमी करते. 

aloe vera benefit
aloe vera benefits

aloe vera benefits सोंदर्याच्या दृष्टीने कोरफडीचे फायदे 

कोरफडीत मुळातच थंडावा हा गुन असल्यामुळे ती शरीराला आतूनच नाहीतर बाहेरूनही फायदा देते.

कोरफडीत व्हिटॅमिन, फॉलिक ऍसिड असल्यामुळे याचा वापर सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी केला जातो.

त्वचेला भाजल्यास जळाल्यास, कीडा चावल्यास कोरफड थंड म्हणून त्यावर प्रथोमउपचार केला जातो. 

रात्री झोपण्या पूर्वी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरूकत्या, टॅन, पिंपल हे त्वचा विकार कमी होतात. 

त्वचा काळी पडली असल्यास कोरफडीच्या रसात काही लिंबाचे थेम्ब चेहेऱ्याला रात्रभर लावून झोपूण सकाळी चेहरा थंड पाण्याने धुतल्यास यामुळे फायदा होतो. 

त्वचे प्रमाणेच कोरफड केसांचे सोंदर्य सुधारण्यासही मदत करते, रोज जर आपण ताज्या कोरफडीचा रस केसांना लावल्यास केसां मध्ये चमक येते.

Black Pepper मसाल्यातिल हा पदार्थ रोगप्रतिकर शक्ति वाढवण्यास उपयुक्त

तसेच केस दाट, मजबूत होतात. कोरफडीच्या गरात खोबरेल तेल मिसळून मालिश केल्यास केसांचा पोत सुधारतो आणि केस गळणे थांबून ते निरोगी होतात. 

याच बरोबर आरोग्यासाठी नियमित ताज्या कोरफडीचा गर एक चमचा घेतल्यास हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याध असे आजार कमी होऊन आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपले आरोग्य सुधारेल. 

तर अशा बहू उपयोगी कोरफडीचा आहारात वापर करून आपले सॊन्दर्य आणि आरोग्य टिकून ठेवा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

3 comments

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.