शुक्रवार, जून 25

आवळ्याच्या सेवनामुळे या असाध्य रोगांवर रामबाण उपचार करता येतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

जीवनामध्ये आवळ्याचे महत्व

सर्वांना माहित असणारा आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असलेल्या आवळ्याचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. सी व्हिटॅमिन युक्त असलेला आवळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त आहे. आवळ्याचे फळ, फूल, पाने सर्व काही उपयुक्त आहे आवळ्याचे चूर्ण, चवनप्राश, तसेच त्रिफळा चूर्ण आशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण तो घेऊ शकतो.

आवळ्याला सोंदर्य टिकवणारे आणि आयुष्य वाढवणारे फळ म्हणून ओळखतात. आवळ्याचा नियमीत सेवनाने आपल्या शरीराला उत्साह व जोम प्रदान होतो व आपले शरीर सशक्त व सुदरुड होते. आवळ्यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते उन्हामुळे शरीराला होणारे त्रास चक्कर येणे, गरगरणे किंवा अशक्त वाटणे हे त्रास होत नाहीत.

आवळा खाल्ल्याने हृदयालाही त्रास होत नाही. दररोज आवळा खाल्ल्याने हृदय विकारही होत नाही . आवळाच्या बिया काढून मिक्सर मध्ये वाटून त्याची ज्यूस बनवून रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने हृदय सुदृढ बनते त्याचबरोबर मधुमेहाचा आजार असणाऱ्यांनी सकाळी उपाशीपोटी आवळ्याच्या रसात एक चमचा हळद मिसळून घ्यावे.  

हे एक प्रभावी औषध आहे आवळ्याचे चूर्ण मुळ्या सोबत घेतलयाने मुत्राशयाचे त्रास होत नाहीत. उष्णतेमुळे काही जणांच्या नाकातून रक्त येते यावर उपाय म्हणून नाकात आवळ्याच्या रसाचे दोन-तीन थेंब टाकल्यास आराम मिळतो. दररोज दोन ते तीन आवळ्याचे सेवन केल्याने पोटातील किडे नष्ट होतात. 

gooseberry benefits for health

गरोदर स्त्रियांनी आवळ्याचे सेवन केल्यास मळमळ होत नाही आणि उलटी थांबते ज्यांना चनशक्‍तीचा त्रास आहे अशांनी रोज आवळा खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि स्ट्राँग होते. आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती ही वाढण्यास मदत होते. डोळ्याचे विकार असणाऱ्यांनी नियमित आवळ्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि डोळे सतेज होतात.
आवळ्याचे चूर्ण चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो, तसेच चेहऱ्यावरील काळे डाग जातात आणि चेहऱ्यावर तेज येते. 

जुलाब होत असल्यास आवळ्याचे चूर्ण आणि सुंठ एकत्र करून घेतल्यास नक्कीच जुलाब थांबतात. एक चमचा आवळा रसात एक चमचा सुंठ रोज जेवणाआधी घेतल्याने आतड्याची शक्ती वाढते. आवळा ज्याप्रमाणे शरीराला औषधी आहे त्याचबरोबर सौंदर्य टिकवण्यासाठी मदत करते. केस पांढरे होणे किंवा गळने यावरही आवळ्याचे तेल किंवा आवळा पावडर केसांना लावल्याने केसांच्या समस्या दूर होतात.

त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या आहारात दररोज आवळ्याचे सेवन करा आणि आपले आरोग्य व त्याचबरोबर सौंदर्यही ही टिकून ठेवा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.