या वेळी होईल वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सूर्य ग्राहणाची सुरुवात

by Geeta P
237 views

ग्रहण म्हटलं की लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत कुतुहलचा एक विषय असतो. याला काहीजण अंधश्रद्धेचा थारा देतात तर काहीजण विज्ञान शोधतात. अंतराळातील घडणाऱ्या या घटनेचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे पडत असतो. पण निसर्ग चक्रात साक्षीदार व्हायला एक संधी मिळते आणि ती संधी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणात मिळत असते. आणि अशीच एक संधी 21 जूनला म्हणजे उद्या आलेली आहे. 

हे सूर्यग्रहण या वर्षातील पहिले आणि मोठ ग्रहण आहे, जर तुम्ही ही संधी चुकली तर मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल, कारण या वर्षातील दुसर सूर्यग्रहण डिसेंबरच्या पंधरा तारखेला आहे. अशा प्रकारच्या ग्रहण खूपच दुर्मिळ असत,

ग्रहण कसं लागत ?

आपण शाळेमध्ये शिकलेल आहे ग्रहण कस लागते ते चंद्र स्वतः भोवती फिरत असताना तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश अडवला जातो या अंतराळातील क्रियेस सूर्यग्रहण म्हणतात. पण ही क्रिया होत असताना चंद्राकडून किती प्रमाणात प्रकाश आडवला जातो त्यावर सुर्यग्रहणाचे प्रकार पडतात. एका वर्षामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सूर्यग्रहण बघायला मिळतात. कधीकधी सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी बघणे महागात पडू शकते, कुठलेही ग्रह बघताना काळजी घेऊनच ते बघणे योग्य ठरतं. 

सगळेच ग्रहण काय जगामध्ये सगळीकडे दिसत नाहीत, पण 21 जूनला दिसणारे ग्रहण हे भारतात मात्र दिसणार आहे. 21 जून ला भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ९:१५ मिनिटांनी या ग्रहणाची सुरुवात होईल आणि साधारणपणे दुपारी ३:०४ मिनिटांनी या ग्रहणाची सांगता होईल. त्या ग्रहाच्या मध्य काळामध्ये याचा आकार एक चमकणाऱ्या अग्नीच्या गोलाकार अंगठी सारखा होईल. दुपारी १२:१० वाजता आपण हे सूर्यग्रहण पूर्णपणे अनुभवू शकतो.

तर चला अंतराळात होणाऱ्या अद्भुत सोहळ्याचा उद्या साक्षीदार होऊयात

Related Posts

Leave a Comment