गुरूवार, जून 24

तोंड आलंय मग हे घरगुती सोपे उपाय करून बघा ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

पोट साफ न होणे, शरीरातील पोषणाची कमतरता, तोंडाची अस्वच्छता,झोप पुरेशी न होणे या कारणामुळे आपल्याला तोंड येणे किंवा तोंडामध्ये अल्सर या प्रकारचे आजार होतात तोंड येणे म्हणजे तोंडामध्ये लाल चट्टे पडणे तसेच हे चड्डी खूप दुखतात आणि त्याच्या वेदना असह्य असतात यावर ज्येष्ठमध अधिक प्रभावी असे औषध आहे ज्येष्ठमधा मध्ये anti inflammatory प्रॉपर्टीज असतात त्यामुळे सूज उतरते आणि चट्टे लवकर बरे होतात ज्येष्ठमधाचे चूर्ण गरम दुधातून दिवसात तीन वेळा घेतल्याने तोंडाचा अल्सर बरा होण्यास मदत होते तसेच ज्येष्ठमधाचे चूर्ण मध्ये मध मिसळून ते रात्रभर तोंडाला लावून ठेवल्यास चट्टयांची जळजळ कमी होऊन आपल्याला बरे वाटते. 

जर सारखं तोंड येत असेल तर मेथीचे दाणे यावर उपयुक्त ठरते मेथी घालून उकळलेल्या पाण्याने दिवसातून तीन-चार वेळा गुळण्या केल्याने आराम मिळतो हा काढा पिल्याने तोंडाचा अल्सर बरा होतो. विटामिन सी च्या कमतरतेमुळे तोंड येऊ शकते यासाठी लिंबू तितकेच प्रभावशाली असते लिंबात असणारे अॅंटी सेप्टीक, अॅंटी बॅक्टरियल, अॅंटी फंगल प्रॉपर्टीज असल्यामुळे सूज उतरते आणि आपल्याला आराम मिळतो रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध एकत्र करून घेतल्याने बरे वाटू लागते. जेवणाच्या अर्धा तास आधी लिंबू पानि घेतल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपल्याला आराम मिळतो.

तोंड आल्यास पेरूची पाने गरम पाण्यात उकळून त्यात थोडे मीठ घालून गूळण्या केल्यास त्यांचे दुखणे आणि जळ जळ कमी होते. आणि दिवसातून दोन वेळा दोन ते तीन पाने चावून-चावून खाल्ल्याने अल्सर बरा होतोच तसेच तोंडही स्वच्छ होते आणि तोंडाचा वास येणे बंद होते. 

वारंवार तोंड येऊ नये म्हणून आहारात योग्य ती पोषण तत्वे विटामिन सी, बी12, असलेले पदार्थ आहारात घेतले पाहिजे आणि आयर्न असलेले पदार्थही आपण खाल्ले पाहिजे कारण आयर्न ऑबजरशण विटामीन सी मुळे चांगले होते त्यामुळे विटामिन सी हे तेवढेच आवश्यक आहेत त्यासाठी आपण बीट, गाजर टोमॅटो, लिंबू एकत्रित खायला पाहिजे तसेच आपण खजूर, मनुका, बदाम, जिरे, धने, तुळस यांचाही आहारामध्ये समावेश केला पाहिजे.

वारंवार तोंड येते म्हणून आपले पोट साफ होणे आणि पचन व्यवस्थित होणे यासाठी जेवणानंतर ववा बडीशेप खाणे महत्वाचे ठरते. आपण फायबर युक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे यासाठी फळे, पालेभाज्या रोजच्या जेवणात यांचाही समावेश असला पाहिजे. तसेच या सर्वांबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिले पाहिजे यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि आपल्याला कुठले आजार होत नाहीत आणि पोषण हे चांगले मिळते. त्यामुळे पोषणयुक्त आहार घ्या भरपूर पाणी प्या आणि आपल्या तोंडाची स्वच्छता ही ठेवा यामुळे वारंवार तोंड येणे बंद होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.