Rukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला

by Geeta P
507 views
Rukhmabai Raut

Rukhmabai Raut आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत “संवित्रीचा संगती “ ज्यानि सावित्री बाईन सारखेच महिलांचा साबलीकरणसाठी आणि त्यांचा हक्का साठी लढा दिला.

आशा महिलांचा जीवन गाथेवर प्रकाश टाकणार आहोत. पण यांचा विषयक बऱ्याच जनाना माहिती नाही.

यासाठीच आम्ही या महिलांनाचा कार्याची दखल म्हणून हा लेख लिहत आहोत.

सावित्रीच्या संगती यासाठी असे नाव द्यावे वाटले कारण जसे सावित्री बाई फुले यांनी महिलांचा शिक्षणासाठी दार उघडे करण्याचे कार्य केले.

तसेच इतर महिलांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केले. लढा दिला या महिला काही सावित्री बाईच्या सोबतच काही अगोदरच तर काही नंतर च्या आहेत.

पण त्या सर्व अर्थाने  संवित्रीच्या संगती आहेत.

रखमाबाई राऊत एक धाडशी महिला

आज आपन अशाच एका धाडशी आणि हुशार महिले बदल बोलणार आहोत ज्या 1884 -90 चा एका खटल्यासाठी आणि त्या सोबतच त्यांचा झालेल्या अनुमती शीवाय लग्ना बदल.

त्यांचे या विषयी ठाम मत होते की माझ्या अनुमाती शीवाय झालेल्या लग्नात मी नांदणार नाही.  मग मला तुरुंगवास भोगावा लागला तरी चालेल.

त्या काळात अनेक प्रथा रूढ होत्या महिलांना आपले मत माडंन्याचा अधिकार नव्हता. त्या काळी फक्त पुरुष आपल्या पत्नीला सोडत होते आणि ही बाब सामान्य वाटत असे. 

पण त्याच वेळी रखमा बाईनी आपल्या नवऱ्या कडे कायदेशीर घटस्फोट मागितली.

आणि रखमाबाईन मुळेच पुढे भारतात आणि विशेषता: महाराष्ट्रात संमती वायबद्दल चर्चा होऊ लागली आणि या वरूनच वाद निर्माण झाले

ब्रिटिश भारतात त्यांचा खटल्यामुळे संमती वयाचा कायदा 1891 लागू झाला.

आशा या रखमाबाईचा जन्म मुंबई मध्ये 1864 साली झाला. त्या काळातील अनिष्ट चालीरिती मुळे त्यांचा विधवा आईने त्यांचे लग्न वयाचा अकराव्या वर्षातच दादाजी भिकाजी यांच्याशी लाऊन दिले.

पण रखमाबाई आपल्या सासरी न जाता त्या आपल्या आईजवळ माहेरिच राहिल्या. 

पुढे त्यांच्या विधवा आईने पुन्हा लग्न केले. सावत्र वडील म्हणजे सखाराम अर्जुन यांचा रखमावर जीव होता ते तिचा मताशी सहमत होते. 

त्यामुळे रखमा वयाची विषी ओलांडली तरी आपल्या सासरी नांदायला गेल्याच नाही.

त्या काळचा परिस्थितित नांदायला न जाणे फार मोठी गोष्ट होती.

Rukhmabai Raut चे पती दादाजी भिकाजी हे शांत बसले नाहीत.  त्यांनी रखमाबाईनी नांदायला यावे म्हणून त्यांच्याबद्दल कोर्टात खटला नोंदवला.

तरीही रखमा बाई डगमगल्या नाहीत  त्यांनी आपली बाजू ठामपणे  मांडली त्या म्हणाल्या हे लग्न झाले तेव्हा मी खूप लहान होते. 

हे लग्न माझ्या संमतीने झाले नाही. 

कोर्टाचा निकाल अर्थातच रखमा बाईच्या विरोधात होता. हे लग्न टिकावं असाच होता. कोर्टाने त्यांच्यापूढे दोन मार्ग ठेवले होते.

एक त्यांनी सासरी नांदायला जावे किंवा सहा महिन्याचा तुरुंग वास भोगावा.

या सगळ्यांमध्ये रखमाबाईंना तुरुंग वास मंजूर होता पण त्यांच्या अनुमती शिवाय झालेल  लग्न त्यांना मान्य नव्हते.

एका बाजूला कोर्टाचा खटला चालू असतानाच समाजातून प्रखर विरोध आणि टीका या गोष्टीनां रखमाबाईनां सामोरे जावे लागले.

टीका करणाऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक  यांचाही समावेश होता. टिळकानी रखमाबाईना आणि येणाऱ्या संमती वयाच्या कायद्याला प्रखर विरोध केला. 

आणि त्यांनी आपल्या वर्तमान पत्रातून रखमाबाईन विषयी कडाडून टीका केली. त्यांनी तर एका ठिकाणी असे ही लिहले होते की रखमाबाई तसेच रमाबाई यासारख्या स्त्रियाना चोर, खूनी लोकांनसारख्या शिक्षा दिल्या पाहिजेत.

तसेच टिळकानी या गोष्टीला हिंदूंचा परंपरे वरील डाग असे ही म्हंटले होते. 

या कुठल्याही टिकेला किंवा विरोधाला त्या घाबरल्या नाहीत त्यांनी कोर्टाच्या निर्णया बद्दल राणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहिले. 

राणीनी कोर्टाचा निर्णय रद्द केला. आणि शेवटी रखमाबाई च्या पतींनी पैशाच्या बदल्यात केस मागे घेतली. 

याच बहुचर्चित खटल्यामुळे ege of concent act 1891 कायदा लागू झाला आणि यानंतरच मुलींचा लग्नाच वय दहा वरुण बार करण्यात आल. 

या वयाच्या आत लग्न केलेतर त्याला बलात्कारची शिक्षेची तरतूद होती.

पहिल्या महिला MD डॉक्टर 

Rukhmabai Raut या भारतातील पहिल्या कायदेशीर घटस्फोट घेणाऱ्या महिला होत्या इतकीच त्यांची ओळख नव्हती

तर त्या पहिल्या महिला प्रॅक्टसिंग डॉक्टर आणि पहिल्या MD डॉक्टर होत्या. 

रखमाबाईचे सावत्र वडील पेशाने सर्जन डॉक्टर होते. त्यांचा रखमाबाईना डॉक्टर होण्यासाठी पाठिंबा होता.

याच करना साठी त्यांना डॉक्टरकीचे शिक्षण घ्यावे असे वाटले असावे. 

या खटल्या नंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले पण यासाठीही रखमा बाईना सर्वांचा विरोध पत्करावा लागला आणि लढा द्यावा लागला.

ब्रिटिश भारतात त्या काळी लंडन स्कूल ऑफ मेडिसीन मध्ये महिलांना MD करण्याची परवानगी नव्हती.

या विरुद्ध Rukhmabai Raut नी आवाज उठवला.  शेवटी त्यांनी परवानगी मिळून आपले डॉक्टरकीचे शिक्षण ब्रेसेल् मधून पूर्ण केले पदवी घेलत्या नंतरही रखमा बाईनी लग्न केले नाही. 

तर त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी व्हावा म्हणून 35 वर्ष प्रॅक्टिस करून महिलांचा आरोग्या साठी समर्पित केले.

अशा रामाबाईनचा समाजातील महिलाना प्रोसाहण देण्यासाठी आणि महिलांना आपले हक्क मिळवून देण्या मागे खूप मोलाचा वाटा आहे. 

Related Posts

Leave a Comment