Parshuram Still alive Proof भगवान परशुराम आजही या पर्वतावर वास करतात

by Geeta P
469 views
भगवान परशुराम

Parshuram Still alive Proof भगवान परशुराम Parshuram हिंदू धर्मामध्ये पुरातन काळातल्या यांच्या अनेक कथा दंतकथा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांचं एकमेकांशी संबंध असतो.

देवाचे स्थान वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते अशा कथा सांगण्यात आलेल्या आहेत.

आज आपण अशाच भगवान परशुरामांच्या तपस्य बद्दल आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Parshuram Still alive Proof

पुराणात सांगितल्या प्रमाणे गणेशाची कहाणी असो अथवा हनुमानाजिच्या च्या चिरंजीवी राहण्याची कथा असो. 

किंवा रामाची आणि श्रीकृष्णाच्या जन्माची कहाणी असो. अशा संदर्भासाठी कितीतरी कहाण्या प्रचलित आहेत. 

Parshuram Still alive Proof
महेंद्रगिरी पर्वत

Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

अशीच एक कहाणी प्रचलीत आहे महेंद्रगिरी पर्वत आणि भगवान परशुराम यांच्याबद्दल काही मान्यता जोडलेले आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत.

त्याप्रकारे अश्वत्थामा आणि बजरंगबली हनुमान चिरंजीव आहेत.  त्याच प्रकारे परशुराम हेही चिरंजीवी आहेत.

आणि ते आज पण या धरतीवर जिवंत आहेत.  त्याचे प्रमाणही आहे.  तर त्याच जागे बद्दल ची कथा आहे. 

महेंद्रगिरी पर्वत हा ओरिसा मधल्या गजपती जिल्ह्यात परलाखेमुंडी येथे आहे. या पर्वतांमध्ये खूप सार्‍या विशेषता दडलेल्या आहेत.

हा पर्वत एक रहस्यमय आहे. हा पर्वत खूप सार्‍या ऐतिहासिक कहाण्याना जोडलेला आहे.  या पर्वता बद्दल काही धार्मिक मान्यता पण सांगितलेल्या आहेत.  

ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या पर्वताला खूप महत्त्व आहे. या महेंद्रगिरी पर्वत बद्दल असे म्हणतात की हा पर्वत रामायण आणि महाभारत यांच्या काही घटनांशी संबंधित आहे. 

शस्त्र आणि शास्त्र ज्ञान यांचा प्रयोग फक्त मानव कल्याणा साठीच व्हायला हवा अशी व्यवस्था भगवान परशुराम यांनी केली होती. 

अधर्माच्या विरोधात सदैव राग असणारे भगवान परशुराम यांनी अश्वमेध या महायागचे आयोजन करू सप्तद्वीप युक्त पृथ्वी महर्षि कश्यपयांना दान स्वरूप देऊन स्वतः या महेंद्रगिरी पर्वतावर तपस्येसाठी गेले.

ते आजही तिथे आहेत अशी मान्यता आहे. हे महेंद्रगिरी पर्वत शिखर परशुराम यांच्या मंदिरा साठी प्रसिद्ध आहे.

असेही म्हणतात की महेंद्रगिरी पर्वत वर भगवान परशुराम यांना भगवान शिव शंकरा कडून कुऱ्हाडी मिळाली होती.

महेंद्रगिरी पर्वत च्या शिखरावरती अनेक पुरातन मंदिरे आहेत महाभारत काळातील काही मंदिरे ही आहेत.

ज्यात कुंती, भीम, युधिष्टिर, यांचे मंदिर प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की कुंती चे मंदिर पांडवांनी बनवले होते. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment