1 Mystery of Budhanilkantha Temple, Nepal

by Geeta P
308 views
Budhanilkantha Temple

Budhanilkantha Temple Mystery एक असे रहस्यमय मंदिर जे तलावात असून यात आहे विष्णूची मूर्ती पण पाण्यात दिसून येते भगवान शंकरांची प्रत्येक्ष आकृती जे पाहून लोक थक्क होऊन जातात. 

भारतात अनेक रहस्यमय मंदिरे, ठिकाण आहेत. ज्यांना काहींना आपण भेट हि दिलेली आसेल आज आपण अशाच एका नेपाळ मधील काठमांडू पासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेलं एक बुधनीलकंठा मंदिर रहस्यमय विष्णूचे मंदिर आहे.

जे नेपाळच्या शिवपुरी येथे स्थित असून हे मंदिर खूप आकर्षक आणि खूप मोठे मंदिर आहे. जे सर्व भक्तांचे भक्ती स्थान आहे. 

या स्थापित मंदिराला बुधनीलकंठ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरा मध्ये श्री भगवान विष्णूंची झोपलेली मूर्ती आहे.

जी लोकांना आपल्या कडे आकर्षित करते. झोपलेल्या या विष्णूंच्या मूर्तीची लांबी सुमारे ५ मिटर इतकी असून या तलावाची लांबी १३ मीटर इतकी आहे. 

हा तलाव वैश्विक समुद्राचे प्रतिनिधित्व करते.

तलावा मधील श्री विष्णूंची मूर्ती शेष नागाच्या कुंडली मध्ये विराजमान असून हि मूर्ती अतिशय उत्तम प्रकारे बनवलेली आहे आणि चित्रित केले गेलेली आहे.

या मूर्ती मध्ये विष्णूंच्या पायांची आडी घातलेले आहे. आणि या बरोबरच त्यांचे चार हात दाखवले असून प्रत्येक हातामध्ये त्यांचे दैवगुण दर्शवणारे शस्त्र आहेत.

पहिल्या हातात त्यांच्या चक्र आहे जे मनाचे प्रतिनिधित्व दर्शवते त्याच प्रमाणे चार घटकांच्ये प्रतिनिधीत्व करनारे शंख शैल आणि चालणारे विश्व दर्शवणारे कमळाचे फुल त्याच बरोबर प्रबळ ज्ञानाचे प्रतिनिधत्व दर्शवणारे गदा असे चार हातात चार शस्त्र घेऊन हि मूर्ती लोभनीय वाटणारी आहे. 

याच बरोबर या बुधनीलकंठा मंदिर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तलावात श्री भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येक्ष पने विराजमान आहेत तर भगवान शंकरांची मूर्ती अप्रत्यक्ष पणे पाण्यात ठेवलेली आहे.

या तलावा बद्दल असे हि म्हंटले जाते कि या मंदिरातील पाण्याचा उगम हा गोसाई कुंड येथुंन झाला आहे. 

येथील लोकांचे असेही म्हणणे आहे कि ऑगस्ट मध्ये होण्याऱ्या शिव मोह्त्सवात भगवान शंकरांची मूर्ती प्रत्येक्ष रूपात भक्तांनादर्शन देते.

budhanilkantha temple mystery
budhanilkantha temple mystery

Budhanilkantha Temple Story बद्दलची पौराणिक कथा

बुधनीलकंठा मंदिर या पौराणिक कथे नुसार असे म्हंटले जाते कि,समुद्र मंथनाच्या वेळी यातुन जे विष निघाले होते सृष्टीच्या वाचवण्यासाठी ते विष शिव शंकरानी प्राशन केले होते.

तेव्हा या विषामुळे त्यांचा गळा निळा झाला होता तेंव्हा पासून त्यांना नीलकंठ असे नाव पडले.

पण हे विष प्राशन केल्या मुळे शंकरांचा घसा जळत होता त्यांना पाण्याची गरज होती तेव्हा त्यांनी काठमांडू च्या उत्तर सीमेवर तलाव निर्माण करण्यासाठी एका डोंगरावर त्रिशूल मारले आणि या तलावाची निर्मिती केली आणि आपली तहान भागवली.

तिरुपती तिरुमला मंदिराबद्दल सर्वकाही

या तलावाला गोसाई कुंड म्हणूनही ओळखतात. 

तर अशी या मंदिराची रहस्यमय पौराणिक कथा आहे जर तुम्ही कधी नेपाळला गेलातर नक्की या मंदिराला आणि या तलावाला भेट द्यायाला विसरू नका.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आमचा लेख आवडला असेल तर Like करून share करा

Related Posts

Leave a Comment