4 Step-by-Step Guide to What Is the Meaning of Cloudburst

by Geeta P
407 views
What is the Meaning of Cloudburst

What is the Meaning of Cloudburst ढगफुटी म्हणजे काय ? तिची प्रक्रिया कशी घडते ? राज्यात सर्वत्रच पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिकडे बघावं तीकड पाणीच पाणी दिसत आहे cloudburst in india.

या मुळे सर्वांचेच प्रचंड नुकसान झालेले आहे. कोकणात तर पावसाने रौद्ररूप घेतलं आहे. पावसाच्या अति सदृश्य रुपामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

या सर्वांचा परिणाम वाशिष्टीआणि शिव नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण गावात ५फूट इतके पाणी शिरले आहे.

या पूर स्थितीमुळे २००५ ची पुनरावृत्ती होते कि काय असे लोकांच्या मनात धास्ती बसलेली आहे. मुसधार पडणाऱ्या या पावसाळामुळे आता ढगफुटींच्या चर्च्यां सुरु झाल्या आहेत. 

What is the Meaning of Cloudburst ढगफुटी म्हणजे काय ?

इतर वेळेला पाऊस पडत असला कि नद्या, ओढे, नाले याना लगेचच पाणी येत नाही किंवा पूर स्थिती निर्माण होत नाही.या मागचे कारण म्हणजे जमिनीत पाणी शोषून घेण्याचे कार्य चालू असते.

एकदा हि पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबली कि पाणी वाहू लागते. परंतु जेंव्हा ढगफुटी होते तेंव्हा प्रचंड पाऊस पडतो शिवाय त्या पावसाच्या थेंबांचा वेग इतका जोरात असतो कि जमिनीला पाणीशोषूण घ्यायला वेळच मिळत नाही.

त्यामुळेच सगळीकडे पाणी वाहून जाते आणि पूरस्थिती निर्मान होते. 

ढगफुटी ची प्रक्रिया कशी तयार होते?

विज्ञानाने याच्या बाबतीतीही शोध लावलेला आहे गडगडाटी आणि वादळी पावसाळा घेऊन येणारे हे ढगच असतात कुमुलोनिम्बस असे या ढगांना म्हणतात.

हा एक लॅटिन शब्द असून cumulus क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे आणि निम्बस म्हणजे ढग म्हणजे खूप जलद गतीने एकत्र होणारे ढग हेच याची सुरवात करतात.

The #1 Thing People Get Wrong About What Is the Meaning of Memes

पावसाळ्यात पाण्याने भरलेलं ढग हवेमुळे वाहून जात असतात. गरम हवा आणि आद्रता यामुळे ढगांमध्ये पाण्याचे प्रमानातं वाढ होते. आणि यामुळेच मोठा पाऊस पडत असतो.

परंतु कधी कधी या ढगांमध्ये वेगाने वरती चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो याला अपड्राफ्टस updraft cloud असे म्हणतात.

What Is the Meaning of Cloudburst

Updraft Cloud

पाण्याच्या थेंबांना वरवर घेऊन जतात. हा हि निसर्गाचा एक विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेम्ब चांगले गरगरीत होतात.

कधी कधी या थेंबांचे ३.५ मिमी हून मोठ्या आकारमानाचे होतात काही वेळा वर चढणाऱ्या या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान वारे निर्माण होतात.

ढगांमध्येच छोटी छोटी वादळे निर्माण होतात आणि याच वादळात मग पाण्याचे थेम्ब सापडतात.

वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतातआणि या सगळ्या मध्ये मिसळून अजूनच मोठे होतात, हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोट्या थेम्बाना घेउन वर जातो. 

Downdraft Cloud

हवेच्या स्तंभात जितकी ताकद असेल तितका तो वर वर चढत जातो आणि तितक्याच वेगाने तो खुप जोरात खाली येतो.

म्हणूनच या स्तंभामध्ये धरलेले पाण्याचे थेम्ब अतिशय वेगाने खाली झोकवतात.यावेळेला त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते.

सुसाट्याच्या वेगाने ते जमिनीवर येतात, हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतात. याला डॉऊनड्राफ्ट Downdraft Cloud असे म्हणतात.

थेंबाचा वेग पहिल्यांदा १२ किमी असतो पण तो वाढतवाढत ७० ते ८० किमी इतका होतो. 

वरून येणारे हे पावसाचे थेम्ब जमिनीवर प्रचंड मोठा मारा करतात तसेच हे थेम्ब एरव्ही पडणाऱ्या पावसापेक्षा खूप गतिमान आणि मोठे असतात.

हा ढग जमिनीच्या एका लहानश्या भूभागावर पडतो त्याचा मारा खूप मोट्या प्रमाणात असल्यामुळे जमिनीला पाणी शोषून घेण्यास वेळ मिळत नाही.

या माऱ्यात अनेक झाडे, प्राणी, पक्षी,घरे जमिन उध्वस्त होऊ शकतात. तर एकाच वेळेला प्रचंड मोठा पाण्याचा लोट आल्यामुळे पाणी मिळेल त्या वाट्याला जाते आणि पूर निर्मिती होते. 

ढगफुटी मध्ये अनेक पाणी आपला प्राण गमावतात असेच बरेच लोक बेघर होतात. प्रचंड नुकसान होते.

भारतात ६ ऑगस्ट २०१० रोजी लेह मध्ये ढग फुटीमुळे एका मिनटात ४८.४६ मिमी पाऊस पडला होता.

loudburst in india

त्याच बरोबर २६ जुलै २००५ ला आठ तासात ९५० मिमी पाऊस त्याच बरोबर उत्तरकाशी मध्ये २०१३ ला असाच ढगफुटी चा पाऊस होऊन अनेक लोक मृत्यू मुखी पडले होते.

ग्रामीण कृषी हवामान विभागाचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्या मते १०० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला ढग फुटी पाऊस म्हणतात.

जग भरातील या वातावरण बदलाचेहे परिणाम असू शकतात.  अशीच जर परिस्थिती पुढेही येत राहिली तर आपण एका विनाशाच्या उंबरठ्यावर आहोत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment