Tingling in Hands and Feet हाता पायाला येणाऱ्या मुंग्या मागचे काय कारण आहे?

678 views
Tingling in Hands and Feet

How to treat of Tingling in Hands and Feet and Causes of Tingling in Hands and Feet खूप वेळ एकाच स्थितीत बसल्यावर किंवा पाय दुमडून बसल्यावर हात किंवा पाय सुन्न होतात किंवा जड होतात यालाच आपण मुंग्या येणे असे म्हणतो.

मुंग्या येणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत पॅराथिसिया parathiciya असे म्हणतात.  हाच त्रास जर सतत होत असेल तर हे एक कुठल्यातरी आजाराचे कारण ठरू शकते.

परंतु हाता पायाला मुंग्या का येतात ? जाणून घेऊया या मागील कारण. तरी यासाठी खालील या चार गोष्टी जबाबदार असतात.

Causes of Tingling in Hands and Feet

मधुमेह Diabetes

रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण वाढल्यास हे शरीरातील माणसांसाठी विषारी ठरते आणि यामुळे हातापायाला मुंग्या येतात.

याच बरोबर दिवसातून जास्त प्रमाणात भूक लागणे किंवा तहान लागणे असे प्रकार होत असल्यास नक्की डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. 

Tingling in Hands and Feet
Tingling in Hands and Feet

व्हीटामिन ची कमतरता Vitamin deficiency

जर हाता पायाला मुंग्या येत असतील तर निश्चितच तुमच्यातील व्हीटामिन B12 प्रमाण कमी झालेले असेल. यामुळे खूप थकवा जाणवतो आणि तुम्हाला खूप आळस पणाही वाटतो. 

Carpal Tunnel Syndrome

आज-काल सर्वांचेच काम संगणकावर वर असते. त्यामुळे तासन्तास काम करत असताना खूप जास्त वेळ टायपिंग केल्याने हाताला मुंग्या येतात यालाच Carpal tunnel syndrome असे म्हणतात.

फिजियोथेरेपी ने किंवा व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास कमी करू शकतो.

Eye Twitching डोळा का फडफडतो ? जानून घ्या या मागच कारण

मानेची नस अखढणे Clogging of the cervical vertebrae

मानेची नस आखढल्यास मानेपासून पायापर्यंत मुंग्या येतात किंवा पार्टी पासून पायापर्यंत मुंग्या येतात.

तो भाग आखडतो म्हणजे खूप दुखतो. हालचाल करणे अशक्य होते. हे चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे किंवा बसल्यामुळे होते किंवा मार लागल्यास ही होते. 

treatment of Tingling in Hands and Feet हाता पायाला मुंग्या येणे यावरील उपाय

लसुन आणि सुंठ

जर तुम्हाला नेहमी नेहमी मुंग्या येण्याचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशीपोटी सुंठाचे काही तुकडे आणि लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या चावून खाव्यात.

यामुळे तुम्हाला आराम मिळेल कारण हा उपाय केल्यास रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.

पिंपळाचे पान

पिंपळाचे झाड आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. पिंपळाचे पान हे कुठल्याही आजारावर गुणकारी मानले जाते.

पिंपळाच्या पानामध्ये एंटीऑक्सीडेंट मिनरल्स असतात. जर तुम्हाला सारखी सारखी ही समस्या होत असेल तरपिंपळाची तीन-चार पाणी मोहरीच्या तेलामध्ये उकळून घ्यावे आणि जेव्हा हा त्रास होत असेल त्या भागावर हे तेल चोळावे. 

तूप 

तूप हि या समस्येवर एक रामबाण उपाय असू शकतो जेंव्हा जेंव्हा तुम्हाला हा त्रास होईल तेंव्हा तूप कोमट करावे आणि ते तळ पायाला चोळावे.

या मुळे तुम्हाला होणारी मुंग्या येण्याची समस्या दूर होईल. 

गरम शेक 

गरम पाण्याने किंवा गरम वस्तूने शेकल्यास सुद्धा रक्त पुरवठा सुधारतो. मुंग्या येणाऱ्या नर्व्हज सुद्धा शेकण्या मुले मोकळ्या होतात.

गरम पिशवी घेऊन त्या भागावर शेकल्यास मुंग्या येण्याचा नक्कीच कमी होतो. 

Tingling in Hands and Feet in Marathi मुग्या येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

एका जागी जास्त वेळ बसू नये. बसायचे असल्यास एक एक तासांनी थोडी हालचाल करावी. आहारात व्हिटॅमिन B12 चे प्रमाण वाढवा.

अंडी, नॉनव्हेज तसेच दूध मोड आलेले कडधान्य यामध्ये भरपूर प्रमाणात B12 असते यांचा समावेश आहारामध्ये वाढवा.

सिगरेट, दारू तसेच तंबाखू आशा व्यसनामुळे आपल्या नर्व्हज सिस्टीमवर परिणाम होत असतो. त्यामुळे अशा व्यसनांपासून लांब राहावे. 

त्याच बरोबर मधुमेह असेल तर तो नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

यासाठी डॉक्टराचे औषध, व्यायाम आहारावर नियंत्रण या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात कारण मधुमेह नियंत्रणाबाहेर गेल्यावर मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो. Tingling in Hands and Feet

हाता पायांच्या मुंग्या घालवण्या साठी वरील उपाय नक्की करून पहा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा लेख शेयर करायला विसरू नका. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

पोस्ट आवडल्यास लाईक करून शेअर करा 🙏🏻

Related Posts

Leave a Comment