उत्तर प्रदेश मधील एका शाळा शिक्षिकेने तेरा महिन्यात एक कोटी पगार कमावला ?

चांगल्या कामांमध्ये भारतीय महिला जगामध्ये कुठेही अग्रेसर असतात.  पण आज आम्ही अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत किती कोट्याधीश आहे पण तिने हा पैसा एका विचित्र मार्गातून कमावला आहे. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील एका महिला शिक्षिकेची तिने 13 महिन्यात तब्बल एक कोटी रुपये कमवले.  आता तुम्ही म्हणाल एक शिक्षक महिला इतके पैसे कसे कमवाल शकते शिक्षकाला इतका पगार असतो का?  पण याचे उत्तर तुम्ही ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

अनामिका शुकला असं या महिला शिक्षकाचे नाव आहे. तिने इतका पैसा महिन्यात करून नव्हे तर घोटाळा करून कमावला आहे. उत्तर प्रदेश सरकारने एक उपक्रम राबवला त्या उपक्रमा चे नाव आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. या महिला शिक्षकाने या उपक्रमांतर्गत एकाच वेळी पंचवीस जिल्ह्यांमध्ये 25 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांत शिकवत असल्याचे भासवून  तिने  तेरा महिन्यांमध्ये तब्बल एक कोटी पगार कमवला, तिला सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेस वर  शिक्षिका म्हणून  नेमणूक करण्यात आली. महिना तीस हजार रुपये पगार ठरवण्यात आला. या उपक्रमांतर्गत डिजिटल हजेरी घेतली जाते असे असून सुद्धा या महिलेने एवढा मोठा घोटाळा कसा केला हे एक मोठे तपास अंतर पुढे कोडे आहे. 

सध्या या महिलेची कसून चौकशी चालू आहे. शिक्षण विभागाने या वरती असे म्हटले  आहे की जर ही महिला दोषी आढळल्यास तिच्यावर ती कठोर कारवाई केली जाईल,  परंतु या घोटाळ्याने देशाला मात्र आश्चर्याचा धक्का दिला आहे.

HTML is also allowed

Leave a Reply

Your email address will not be published.