हे 6 चमचमीत स्ट्रीट फूड बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

चटपटीत आणि चमचमीत खाणे कोणाला आवडत नाही, महागड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण तर बहुतेकजण करतातच पण स्ट्रीट फुड खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. जर आपण सैर करण्याचे, फिरण्याचे आणि स्ट्रीट फूड खाण्याचे शौकीन असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील चमचमीत स्ट्रीट फुड्ससांगणार आहोत त्यामुळे तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. 

पाणीपुरी

आंबट गोड आणि चटपटीत असणारी पाणीपुरी सगळ्यांनाच माहिती ज्याचे नाव घेता सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते महाराष्ट्रात सगळीकडे रस्त्यांच्या कडेला उभारणारे पाणीपुरी वाल्यांची हातची पाणिपुरी खाणे कोणाला पसंद नाही असा क्वचितच सापडेल. पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर एक्स्ट्रा पाणी भेटले तर सगळेच म्हणतात वा क्या बात है

 वडापाव

आमच्या मुंबईच्या वडापावची तर सगळी दुनिया वेडी आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मिळणाऱ्या गरम गरम वडापावचा आस्वाद सगळेच घेतात. लसूण आलं पेस्ट आणि ती बटाट्याची भाजी बेसनामध्ये बुडून तळलेला वडा, पाव मध्ये घालून चटणी तसेच त्यासोबत मिरची हे पाहून आपण स्वतःला खाण्यापासून कधीच रोखू शकणार नाही. 

गरमा गरम भजी

पावसाच्या दिवसात रस्त्यांवर मिळणारी ती कांदा आणि बटाट्याची भजी तसेच त्याच्यासोबत एक चहाची चुस्की मिळेल तर माणूसाला अजून काय हवे. भिजल्यावर कोणीही याचा आस्वाद घेण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.

छोले भटूरे

छोले भटूरे सगळ्यांनाच आवडतात, गरम-गरम छोले त्यावर कांदा लिंबू आणि त्याच्या सोबत असलेली भटूरे खाऊन तृप्त झाल्यासारखे वाटते.

समोसा

समोसा हा महाराष्ट्रातील फेमस स्ट्रीट फूड मधला प्रकार आहे. समोसा सगळ्यांनाच खूप आवडतो त्यामध्ये असलेल्या बटाटा आपल्याला वेगळाच स्वाद देऊन जातो आणि मिरची असेल तर मग काही सांगायलाच नको. प्रत्येक जण या समोसचा आस्वाद घेतातच

इडली डोसा

इडली डोसाइडली डोसा हा देखील एक स्ट्रीट फूडचा प्रकार आहे. गरमा गरम दोसा आणि त्याच्यासोबत मिळणारी बटाट्याची भाजी आणि चटणी तसेच ते सांबर सगळ्यांनाच खूप आवडते

हे आहे स्ट्रीट फूडचे प्रकार हे 6 स्ट्रीट फूड चे प्रकार बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटल असेल जर आपण खरोखरच खाण्याचे शौकीन असाल तर नक्कीच या स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या.

जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा

Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

View all posts by Geeta P →

2 thoughts on “हे 6 चमचमीत स्ट्रीट फूड बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.