Health

Stethoscope चा जुन्या काळी लागलेला शोध रंजक इतिहास

Stethoscope ह्रदयाची धकधक येकु येणाऱ्या आणि डॉक्टरांचा सर्वात ओळखीचा स्टेथोस्कोप  चा रंजक इतिहास 

डॉक्टरांकडे गेल्यास  सर्वप्रथम दिसतो तो स्टेथोस्कोप. सर्वांचा परिचयाचा आणि डॉक्टरांचा सर्वात जवळचे उपकरण असतो.

ह्रदयाची गती तपासण्यासाठी डॉक्टर या उपकरनाचा  वापर करतात हे  त्यांचा  साठी अत्यंत महत्वाचे उपकरण असते.

अशाच या महत्वाचा Stethoscope संशोधकाचा रंजक आणि त्याचा उगम चा इतिहास आपण पाहणार आहोत. 

आपल्याला माहीतच आहे डॉक्टर या स्टेथोस्कोप चा वापर रक्ताचा प्रवाह आणि ह्रदयाची गती तपासण्यासाठी करतात उपकरणाचे मुख्यतः तीन भाग असतात.

याचा पहिल्या भागाला रेसोनेटर म्हणतात. याचा मदतीने ह्रदय आणि आताड्या तील रक्ताचा प्रवाह तपासला जातो.

हा भाग छाती आणि पोटावर ठेवला जातो. तसेच दूसरा भाग एक लांब नळी सारखा असतो. आणि तिसरा भागास एयरपीस म्हणतात.

याचा सहाय्याने डॉक्टरना प्रवाहातील स्पदनांचा आवाज व्यवस्तीत ऐकू येतो.

हा एक साधरण स्टेथोस्कोपची रचना आहे याचे अजून वेगळे प्रकार आहेत.  

स्टेथोस्कोप हा एक ग्रीक शब्द असून तो स्टेथेस आणि स्कोपीयन या दोन वेगळ्या संमिश्र शब्दापासून तयार झाला आहे. 

याचा आर्थ स्तन आणि तपासणी असा होता.

Stethoscope च्या उगमाच्या अगोदर जेंव्हा असे कुठलेच उपकरण नव्हते त्यावेळेस लोकांचा उपचारासाठी आणि रोग निदानासाठी डॉक्टर त्यांचा छातीवर किंवा पोटावर डोके ठेवून ह्रदयातील ठोके आणि आतड्यानचा प्रवाह याचा आंदज घ्यायचे पण या मुळे ह्रदयाचा गतीचा अचूक अंदाज लागत नव्हता.   

पण या प्रकारात महिला या उपचाराला घाबरायच्या आणि नकार द्यायचा आणि यातूनच स्टेथोस्कोपचा उगम झाला. 

ईंटर रेने थीयोफिले ह्यासिंथे लेनेक या डॉक्टर कम शास्त्रज्ञाने पॅरिसचा ईन्फन्ट्स मॉडेस या हॉस्पिटलात आधुनिक Stethoscope शोध लावला. 

लाहान मूलानी खेळण्यातील एक तारेचे संदेश वाहक यंत्र बनवतानी जेंव्हा त्यांनी बघितले त्यावेळी त्यांना या टेथोस्कोप चा निर्मितीची कल्पना सुचली.

लेनेक यांचा हॉस्पिटल मध्ये एकदा एक महिला उपचार घेण्यासाठी आली होती आणि तिचा ह्रदयाचे गती जाणून घेणे खूप महत्वाचे होते. 

पण ही महिला त्या जुन्या पद्धतीने म्हणजे छातीवर डोके ठेऊन तपासण्यास नकार दिला. तेव्हा लेनेक यांनी कागदाचा त्या मुला प्रमाणे एक तारेचे संदेशवाहक यंत्र तयार केले.

त्याचा सहाय्याने त्या महिलेचा ह्रदयाची गती तपासली. पुढे असेच उपकरण लाकडा  पासून बनवण्यात आले आणि जगतील पहिल्या टेथोस्कोपचा जन्म झाला.

पण या टेथोस्कोपमध्ये डॉक्टर फक्त एकाच कानाने ऐकू शकत होते,हीच एक समस्या या बाबत होती.   

फिजिशियन आर्थर लेयार्ड  यांनी १८५१ मध्ये’ पहिला दोन यअरफोन असलेला टेथोस्कोप तयार केला.

परंतु लेयार्ड यांनी बनवलेला टेथोस्कोप हा प्लास्टिकचा होता. आणि त्यांनी हा टेथोस्कोप लंडन च्या एका एक्झिबीशन मध्ये प्रदर्शनास ठेवला होता. 

पण या उपकरणात अजून बदल आवश्यक होते. हे उपकरण पूर्णत्वास आणण्याचे काम आणि या टेथोस्कोपच्या  पहिल्या व्हर्जनचा निर्मितीचे काम जॉर्ज कॅमन या शास्त्रज्ञाने केले.

त्यांनी या उपकरण बनवण्यासाठी काही धातुच्या  नळीचा आणि हस्तिदंताचा वापर एयरफोन साठी केला होता.  त्या मुळे ही उपकरण अगदी फायदेशीर होते. 

२० व्या शतकातही हे संशोधन सुरूच होते. १९४० मध्ये आलेल्या सुधारित टेथोस्कोप मध्ये दोन बाजू होत्या एक बाजू श्वसन नलिका साठी तर दुसरी बाजू रक्ताभिसरण संस्थेसाठी होती. 

AMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात?

त्याच प्रमाणे १९६० मध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूल च्या डेव्हिड लिटमन यांनी आधुनिक पण कमी वजनाचा टेथोस्कोप तयार केला. 

याची श्रवण क्षमता खूप चांगली होती.

१९७० साली इलेक्ट्रॉनिक टेथोस्कोप तयार करण्यात आला. परंतु तो ईतका यशस्वी ठरला नाही.

पण तर्के लोबुनी यांनी डेव्हिड लिटमन यांचा उपकरणात सुधारणा केल्या असून हाच Stethoscope सर्वात जास्त वापरत आला आहे. सध्या  हाच Stethoscope सर्वात आधुनिक आणि मानला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button