Silicon Mobile Cover मोबाईल कव्हर पिवळे का पडतात

Published Categorized as Knowledge

How to clean Phone Cover ? Silicon Mobile Cover मोबाईलच कव्हर पिवळे का पडते या मागचे कारण आणि तो आपण कशाच्या पद्धतीने साफ करू शकतो याची माहिती. 

आज काल लहानापासून मोठ्यानं पर्येंत सर्वांनाच मोबाईल गरजेचं साधन ठरलाय. 

सर्वांसाठीच अति आवश्यक वाटणारे उपकरण म्हणजे मोबाईल.

आजकाल बाजारात महागडे आणि ब्रँडेड मोबाईल उपलब्ध आहेत.

हे नवनवीन फीचर्स आणि ब्रँड असणारे मोबाईल आपल्याकडे असावे असे सर्वांनाच वाटते.

जेवढ्या प्रकारचे मोबाईल तेवढया प्रकारचे कव्हर उपलब्ध असतात.

आकर्षक वाटणारे हे कव्हर काही दिवसांनी रंग मात्र बदलून पिवळट दिसायला लागत.

अशी कोणती प्रक्रिया होते ज्यामुळे याचे कव्हर पिवळे पडते, आणि प्रत्येकजण आजकाल mobile transparent cover वापरतात.

काहींना तर नवीन मोबाईल सोबतच कव्हर मिळतात. तेंव्हा ते कव्हर दिसायला खूप सुंदर वाटतात परंतु कालांतरानं याचा रंग पिवळा पडतो, आपलयाला ते कव्हर वापरायला नको वाटते.

हे मोबाईल कव्हर सिलिकॉन पासून तयार केलेले असतात. मोबाईल कव्हर लवचिक असणे गरजेचे असते त्यामुळे ते सिलिकॉन पासून बनवतात.

याच बरोबेर सिलिकॉन स्वस्त असते आणि सिलिकॉन पासून बनवलेलं हे कव्हर जास्त दिवस टिकण्यास मदत होते. 

सिलिकॉन पासून बनवलेल हे कव्हर जास्त काळ टिकणारे जरी असले तरी आपण वापरताना ते विविध प्रकारे हाताळतो आणि ते खराब होते. 

मोबाईल हातळताना आपल्या हातून कव्हरला वेगवेगळे द्रवपदार्थ लागतात आपण ते लगेच साफ करतो परंतु त्याचे दाग तसेच राहतात. 

जास्त तपमानाच्या संपर्कात आल्यावर देखील या मोबाईल कव्हरचा रंग बदलतो.

म्हणजे याचा अर्थ असा आहे की, मोबाईलच्या कव्हरचा रंग बदलतो म्हणजे याचे सिलिकॉन खराब होते. 

मोबाईलच्या कव्हरचा रंग बदलून झालेल ही नुकंसान तुम्ही या खालील टीप्स वापरुन कमी करू शकता.

मोबाईल कव्हर खराब झाले म्हणून ते फेकून देण्याच्या आधी तुम्ही या टिप्स वापरुन ते स्वच्छ करून पुनः वापरू शकता.  

how to clean phone cover Silicon Mobile Cover
Silicon Mobile Cover

Silicon Mobile Cover मोबाईल कव्हर साफ करन्याचे काही घरगुती उपाय 

भांडी घासण्याचे Liquid च्या सहायाने 

मोबाईल कव्हर साफ करण्यासाठी आणि त्याचा पिवळट पना घालावण्यासाठी तुम्ही भांडे घासण्याचे सोल्यूशन आणि गरम पानी याचा वापर करू शकता.

थोडे गरम पानी आणि त्यात एक ते दोन चमचे भांडे घासण्याचे सोल्यूशन मिक्स करून तुम्ही ते तुमच्या मोबाईलच्या कव्हरला खराब टुथ ब्रशच्या सहाय्याने लाऊन घासून साफ करा.

ज्या ठिकाणी जास्त पिवळेपना आहे तेथे जास्त सोल्यूशन टाकून स्वच्छ करून घ्या.

शेवटी एका कपड्याने स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या हा उपाय आठवड्यातून एक वेळ केला तरी मोबाईलचे पिवळे डाग जाण्यास मदत होईल आणि तो पुन्हा सुरवातीसारख दिसू लागेल. 

बेकिंग सोडा वापरुन मोबाईल कव्हर साफ करणे  

मोबाईल कव्हर साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोडयाचा ही वापर करू शकतो. 

सर्व प्रथम एका स्वच्छ कपड्यावर मोबाईल कव्हर ठेवावे आणि त्यावर बेकिंग सोडा पसरवा.

आत्ता याला खराब टुथ ब्रश थंड पाण्यात बुडवून त्याच्या सहाय्याने साफ करून घ्यावे ज्या भागावर जास्त डार्क दाग आहेत.

flying car उडणाऱ्या कारचे स्वप्न सत्यात उतरले

त्या जागेर कामि जास्त सोडा घालून साफ करावे आणि नंतर त्या कव्हरला पाण्याने स्वच्छ धुऊण त्यानंतर मोबाईल कव्हर कपड्याने पुसून साफ करून घ्यावे.

यानंतर तुम्हाला मोबाईलच्या कव्हर वरील सर्व पिवळे दाग नाहीसे झालेले दिसतील. 

आशा पद्धतीने तुम्ही घरच्या साधनांचा वापर करून आपले मोबाईल कव्हर साफ करू शकता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम     

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.