HistoryKnowledge

Shivkar Bapuji Talpade पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून या मराठी माणसाने बनवले

Shivkar Bapuji Talpade जर तुम्हाला कळले की जगातले पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून ते एका मराठी व्यक्तीने बनवले आहे. तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना ? 

शिवकर बापूजी तळपदे

होय तुम्ही जे वाचत आहात ते एकदम बरोबर आहे. विमानाचा शोध मराठी माणसानेच लावला आहे.

त्या मराठी माणसाचं नाव होत शिवकर बापूजी तळपदे ( Shivkar Bapuji Talpade )

या मराठी माणसाने पहिल्या विमानाचा शोध मुंबई मध्ये लावला होता. जेव्हा त्यांनी या विमानाचा शोध लावला तेव्हा त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असं ठेवलं.

मरुत्सखा हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ वायु मित्र असा होतो.
मरुत्सखा च्या पहिल्या उड्डाणाची नोंदणी केली न गेल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले नाही.

परंतु असं म्हटलं जातं की या विमानाने पहिले उड्डाण १८९५ साली केले.
म्हणजे राइट बंधूंनी जे विमान बनवले होतो त्याच्या आठ वर्ष पहिले.

Shivkar Bapuji Talpade गुरुजींचे एक विद्यार्थी सातवलेकर सांगतात मरुत्सखा हे विमान हवेमध्ये काही मिनिटे एका पक्षाप्रमाणे घिरट्या घालत होतं.
या गोष्टींची पुरावे म्हणून खूप सारे इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहेत.
त्यापैकी त्यांच्या विद्यार्थी म्हणजे सातवलेकर यांनी दिलेले बयाण
दुसरा पुरावा म्हणून मरुत्सखा उड्डाणाच्या वेळी महादेव गोविंद रानडे यांची उपस्थिती
उड्डाना विषयी सयाजीराव गायकवाड यांची सहमति.

इतके पुरावे समोर ठेवल्यानंतर कोणालाही विश्वास बसेल की पहिले विमान राईट बंधू ने बनवले नसून ते मराठी माणसानेच म्हणजे शिवकर बापूजी तळपदे यांनी बनवले आहे. 
पहिल्या उड्डाणानंतर त्यांनी ते विमान स्टोअर हाऊस मध्ये ठेवलं होतं. आणि तेथे खूप दिवस पडून होतं.
गुरुजी संस्कृताचे पंडित होते त्यामुळे पुराणांमध्ये विमानांचा उल्लेख आणि त्याची माहिती शोधून काढून त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी मरुत्सखा ची निर्मिती केली.

विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मराठी माणसाने बनवलेल्या आहेत परंतु त्यांनी त्याचा उल्लेख कुठे नोंदवला नसल्यामुळे त्यांचे नाव Shivkar Bapuji Talpade जास्त प्रसिद्ध झाले नाही.

आणि इंग्रज लोकांनी ते आपल्या नावाने खपवत गेले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button