Sanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात

by Geeta P
701 views
sanskrit shlok

Sanskrit shlok आज ही लोक मंदिरात देवच दर्शन घेऊन आल्यास मंदिराच्या पायरीवर का बसतात जाणून घेऊयात या मागच रहस्य

भारतीय हिंदू संस्कृतीत असे अनेक प्रथा किंवा काही नियम पाळले जातात.

त्यात आजही वडीलधारी मंडळी मंदिरात गेल्यास दर्शन घेऊन आल्यावर बाहेर पायरीवर किंवा ओट्यावर थोडा वेळ बसण्यास सांगतात.

पण या मागच काय कारण असेल कधी विचार केलाय काय? तर आज आपण या लेखात या बद्दल जाणून घेणार आहोत.

आज काल लोक मंदिरात जातात हे नियम पण फॉलो करतात.

पण मंदिराच्या पायरीवर बसून आध्यात्माच्या नाहीतर सांसारिक आणि राजकीय गप्पा मारतात.

ही प्राचीन परंपरा विशिष्ट हेतून बनवली गेली आहे. मंदिरात देवाच्या मूर्तीचे दर्शन करून आल्यास पायरीवर बसून आपण एक श्लोक म्हणावा.

पण आजकाल लोकाना या बद्दल विसर पडत चाललाय. आणि या बद्दल अनेक लोकाना माहितीही नाही.

Sanskrit Shlok

श्लोक असा आहे.

अनायासेन मरणम् , बिना देन्येन जीवनम् ।
देहान्त तव सानिध्यम् , देहि मे परमेश्वरम् ।।

अनायासेन मरणम्

sanskrit shlok या श्लोकाचा अर्थ असा की, परमेश्वरा हे जीवन जगत असताना या देहाला कुठला ही त्रास न होता चलता बोलता मरण दे, अंथरणात लोळून खूप त्रास होऊन मरण न देता सहज मृत्यू येऊ दे.

बिना देन्येन जीवनम्

sanskrit shlok अर्थात आम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ देऊ नको. आजाराने पीडून दुसऱ्याला आपला त्रास होईल अशी वेळ येऊ देऊ नको. जीवन सहज जगणे सोपे होऊ दे.

देहान्त तव सानिध्यम्

याचा अर्थ असा आहे की हे देवा जेंव्हा या देहाला मृत्यू प्राप्त होईल तेंव्हा तुमचे नाव माझ्या मुखात असले पाहिजे.

जेंव्हा मरण येईल तेंव्हा देवासमोर यायला पाहिजे. जसे पितामह भीष्म यांच्या मृत्यू वेळी साक्षात प्रभू त्यांच्या समोर उभे होते.

देहि मे परमेश्वरम्

अर्थात परमेश्वरा आम्हाला असे दान दे.
अशी प्रार्थना देवाला करावी. ही प्रार्थना आहे याचना नाही. याचना ही सांसारिक सुखासाठी म्हणजे घर, व्यवसाय, सनंतती, सुख, धन यासाठी किंवा ईतर सुखासाठी मागणी केली जाते ती याचना असते एक प्रकारची भीक असते.

आपण प्रार्थना करतो तर प्रार्थनाच काही विशेष अर्थ असतं अर्थात विशिष्ट, श्रेष्ठ. अर्थात निवेदन. देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थनेत या श्लोकचं उच्चरण करा.

जेंव्हा आपण मंदिरात जातो तेंव्हा या आपल्या डोळयांनी निर्विकार देवाला पाहत राहावे, काही जन डोळे बंद करून दर्शन करतात.

प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

पण आपण मंदिरात आल्यास डोळे भरून त्या देवाचे स्वरूप पाहायला पाहिजे.

त्याचा चरणांचे मुखाचे लोभणीय स्वरूपाचे दर्शन घ्यावे. आणि बाहेर आल्यास एक पायरीवर बसून डोळे बंद करून त्या स्वरूपाच ध्यान करावे. आणि वरील देलेल्या sanskrit shlok श्लोकांच पठन कराव.

यामुळे मनाला शांती लाभून एक आत्मिक समाधान मिळेल.

याच करना साठी मंदिरातून बाहेर आल्यास पायरीवर बसून किंवा ओट्यावर बसून त्या परमेश्वराचे चिंतन करावे आणि मोक्षाची याचना करावी.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

why jain don't eat onion and garlic जैन समुदायातील लोक कांदा लसूण का खात नाही? - Domkawla 23/07/2021 - 8:16 pm

[…] Sanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायर… […]

Reply

Leave a Comment