गुरूवार, जून 24

इंटरनेट वर धुमाकूळ घालत असलेल्या मीम शब्दाचा अर्थ आणि हा शब्द कसा प्रचलित झाला ?

आज जगामध्ये समाज माध्यमांचा सर्वत्र बोलबाला आहे, आणि या समाज माध्यमांवर कमी वेळात जास्त प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला जातो, त्यामध्ये व्हिडिओ, चित्र, टेक्स्ट च्या माध्यमातून समाधान पर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, नजीकच्या काळात मीम हा शब्द खूप प्रचलित झाला, मीम म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भावना इतरांपर्यंत पोहोचवणे, सध्या मीम हे खूप प्रभावशाली प्रसार माध्यम बनले आहे, मीम हा शब्द खूप जुना आहे असं नाही,

मीम म्हणजे काय ?

मीम म्हणजे एक चित्र हजार शब्दांप्रमाणे प्रभावशाली असते.मीम द्वारे आपल्या भावना, विनोद, लेख, सट्टा मस्करी, अलंकार इत्यादी आपण कमी वेळामध्ये पोहोचवू शकतो, मीम हा शब्द सध्या खूप प्रचलित झाला आहे, #meme हा hashtag वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. भारतामध्ये मीम हा शब्द विनोदासाठी खूप प्रचलित आहे. पण हा शब्द कसा पडला आणि हा शब्द पहिल्यांदा कोठे वापरला गेला ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रिचर्ड डॉकिन्स नावाचे एक ब्रिटिश वैज्ञानिक आहेत.त्यांनी त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड मध्ये केलं आणि शिक्षक म्हणून ते रुजू झाले. कालांतराने त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचे नाव द सेल्फीश जीन’ या पुस्तकात सर्वप्रथम मीम या शब्दाचा वापर केला गेला. मीम या शब्दाचा अर्थ या पुस्तकांमध्ये उत्क्रांतीच्या काळात कसा बदल होतो हा मानला गेलं, आणि त्यातूनच हा शब्द जगामध्ये प्रचलित झाला. तीस वर्षाखाली लिहिले गेलेल्या पुस्तकांमधला शब्द आज जगामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत आहे.

1 Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.