Knowledge

आता घरबसल्या राशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांचे नावे जोडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

जगावर कोरोना व्हायरस या संकटामुळे सर्वांची आर्थिक चणचण वाढली आहे, त्यामुळे गरिबांचे खूप अतोनात हाल होत आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विद्यमाने कमी किमतीत धान्य  वाटपाची योजना आणली आहे, परंतु हे धान्य राशन कार्ड दाखवल्या नंतर मिळतं, कुटुंबा मध्ये किती लोक राहतात ते राशन कार्ड लिहिलेले असते, त्याप्रमाणे हे कमी किमतीचे धान्य त्या कुटुंबाला मिळते। 

परंतु बऱ्याच कुटुंबाने आपल्या सदस्यांची नावे राशन कार्ड वर दाखल केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना पाहिजे तितके राशन मिळत नाही, पण कोरोना व्हायरस काळामध्ये कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करणे ही शक्य नाही त्यामुळे सरकारने एक उपक्रम राबवला आहे, त्यामध्ये तुम्ही घरबसल्या राशन कार्ड वर कुटुंबातील सदस्यांची नावे टाकू शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे राशन कार्ड वर टाकू शकता

नाव जोडण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करा

१ ) राशन कार्ड मध्ये नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला पुढील अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
http://mahafood.gov.in/website/english/home.aspx
२) नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी तयार करावा लागेल
३) नव्या सदस्याचे नाव समाविष्ट करण्याच्या पर्याय वरती क्लिक करावे लागेल
४) दिलेल्या फॉर्ममध्ये सदस्यांची नाव नोंदणी करा आणि संपूर्ण माहिती भरा
५) आवश्यक असलेल्या कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
६) सबमिट बटन वर क्लिक करा


नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती दिसेल. त्या रजिस्ट्रेशन नंबर द्वारे तुम्ही तुमचे राशन कार्ड ट्रॅक करू शकता, नंतर अधिकारी तुमची माहिती तपासल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारतील आणि पोस्टाद्वारे राशन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button