मंगळवार, जून 22

Raksha Bandhan हे आहे रक्षाबंधना चे आध्यात्मिक महत्व आणि इतिहास

रक्षाबंधन चे महत्व : श्रावण मास चालू झालं की सणांना सुरुवात होते. श्रावण मासा तील प्रत्येक दिवसाला काही महत्व असते.

तसेच या महिन्यातील श्रावण पौर्णिमेला ही राखी पौर्णिमा रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) म्हणून ओळखले जाते.

हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणून साजरा केला जातो याला रक्षाबंधन असेही म्हणतात. 

या दिवशी राखीला अधिक महत्त्व दिले जाते .राखी कच्चा सूता पासून ते रेशमी रंग बेरंगी धाग्यांची पण असते.

तर ते सोने चांदी सारक्या महाग वस्तूंची पण असते.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि त्यांना त्याला पुन्हा एकदा घट्ट बांधण्याचा प्रसिद्ध सण आहे.रक्षा म्हणजे सुरक्षा करणे.

बंधन म्हणजे बांधून ठेवणे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या चांगल्या भविष्यासाठी आणि यशा साठी देवाकडे प्रार्थना करत असते.

तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन घेते. या दिवशी बहीण नवीन वस्त्र परिधान करून ताटामध्ये दिवा, कुंकूवाचा गंध,अक्षदा,नारळ तसेच काहीतरी गोड पदार्थ घेऊन ताट तयार करते.

आपल्या भावाला आसना वरती बसून त्याला ओवाळून त्याचा कपाळी गंध लाऊन गोड खाऊ घालते. उजव्या हातात राखी बांधते.

नंतर भाऊ तिला काही तरी भेट म्हणून देतो. आणि तिचे राक्षण करायला नेहमी तयार असतो.

या सनामुळे भाऊ बहिनीले प्रेम अजूनच वाढते. रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) च्या दिवशी लांब असलेले नातेवाईक, भाऊ बंधू एकत्र येतात. हा सण साजरा करतात.

रक्षाबंधन च्या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.

Raksha Bandhan
Raksha Bandhan

रक्षाबंधन चा आध्यात्मिक इतिहास Raksha Bandhan History

भविष्यपुराणा नुसार इंद्रायणी द्वारा निर्मित रक्षासूत्र ला देवगुरू बृहस्पति ने ईन्द्र च्या हाताने राखी बांधली तेंव्हा खालील रक्षा बांधनाचा मंत्र श्लोक म्हणला होता.

येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।

या श्लोकाचा भावार्थ असा आहे की ज्या रक्षा सूत्राने दाणवेन्द्र राजा बलिला जसे बांधले होते तसेच सूत्र मी तुला बांधत आहे ही रक्षा (राखी) तू तुझ्या संकल्पाला कधी विचलित नको होऊ. 

भविष्य पुराणात असे सांगते की जेव्हा दानव आणि देव यांच्यामध्ये युद्धाची स्थिती उद्भवली होती, तेव्हा देव पराभूत झाले होते.

दानवांनी देवांवर आधिपत्य गाजवले होते. तेव्हा देवाधि देव इंद्र घाबरून जाऊन ते ब्रहस्पती कडे गेले.

Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

तेव्हा देव इंद्र यांची पत्नी इंद्राणी तिथेच बसून सर्व काही ऐकत होती.  तेव्हा तिने मंत्राच्या शक्तीने पवित्र करून एक धागा काढून आपल्या पतीच्या मनगटावर बांधला योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

तेव्हा लोकांचे म्हणणे असे आले की याच मंत्राच्या शक्तीने बांधलेल्या धाग्याने देवेंद्र यांना विजय झाले. 

तेव्हापासून या दिवशी हा धागा बांधण्याची प्रथा रूढ झाली.  पुढे तिला रक्षा बंधन असे नाव पडले. 

हा धागा धन, हर्ष, विजय, शक्ती देण्याची सामर्थ्य या धाग्यांमध्ये असते.  त्यामुळे तो बांधला जातो.

ही प्रथा पुराना पासून चालत आलेली आहे. त्यामुळे तो आजही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. 

रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या कपाळाला गंध लावला जातो. त्याचे ही कारण असते. 

प्रत्येक कार्यक्रम असो  किंवा सणअसो कधीही ओवाळताना आपण आधी कपाळाला गंध लावतो. ही आपली पूर्वापार चालत आलेली रीत आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कपाळाला गंध लावला जातो ?

टिळा हा विजय, पराक्रम, श्रेष्ठत्व, याचे प्रतीक आहे तिला नेहमी कपाळाच्या मध्यभागी लावला जातो.

हे स्थान सहाव्या इंद्रियाची आहे असे म्हणतात. टिळा लावल्यानेआपले व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. 

त्यामुळे मानसिक संतुलनही चांगले राहते. आत्मविश्वासात वाढ होते. 

धार्मिकते प्रमाणे चंदनाचा टिळा लावल्याने आपल्या पापांचा नाश होतो. तसेच आपण संकटापासून मुक्त होतो. 

आपले ग्रह शांत होतात. टिळा लावण्याचे शारीरिक दृष्ट्या ही महत्व आहे. 

कारण टिळा लावल्यास आपल्या मेंदूत सिरोटोनीन आणि एडोंर्फीनचे स्त्राव संतुलित होतात.

तेंव्हा उदासीनता कमी होण्यास मदत होते.  डोके दुखत नाही. 

रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला चांगल्या भावनेने टिळा लावते. 

कारण शुभ भावनेने या जागी गंधा ने किंवा अक्षदा ने दाब देऊन लावल्या सस्मरणशक्ती वाढते. बुद्धिकता, निर्णय घेण्याची ताकद वाढते. 

साहस ही वाढते.  त्यामुळे कपाळी गंध लावतात.

तसेच पौर्णिमेला नारळी पोर्णिमा म्हणूनही ओळखले जाते या दिवशी किनारपट्टीवरील लोकांचा आणि कोकणातील लोकांचा मुख्य सण असतो.

त्या दिवशीच समुद्रा ची पूजा करतात.  समुद्राला नारळ वाहतात आणि वरून देवाला ही पार्थना करतात. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.