
पॅट्रिशिया च्या पतीच्या अत्याचाराला झुगारून यशस्वीरित्या जीवन जगणाऱ्या या स्त्रीची कहाणी ऐकून इतर स्त्रियांनी नक्कीच ती प्रेरणादायी ठरेल.
हि कहाणी आहे एका स्त्रीची जिने आपले जीवन खूप कष्ट सहन करू स्वावलंबी जीवन जगून इतर स्त्रियांसमोर प्रेरणास्थान ठेवणाऱ्या एका यशस्वी स्त्रीची.
एकेकाळी चहा विकून दिवसाला फक्त 50 पैसे मिळवणाऱ्या एक यशस्वी स्त्री ची कहानी जिचे नाव पॅट्रीशिया नारायण Patricia Narayan
Patricia Narayan पॅट्रिशियाची जीवन कहानी
पॅट्रिशिया थॉमस हिने वयाच्या १७ व्या वर्षी नारायण या व्यक्तीशी लग्न केले. तिने आंतरजातीय विवाह केला होता.
त्यामुळे तिचे माहेरच्या लोकांशी तितकेच चांगले संबंध नव्हते.
ज्या व्यक्तीशी तिने माहेरच्यांचा विरोध स्वीकारून आणि आपल्या माणसाचं नकार असतानाही लग्न केले.
तोच नारायण काही दिवसांनी दारूच्या व्यसनाधीन गेल्या मुळे तिला दारिद्रयाला सामोरे जावे लागले.
घारात खाणारे मानस चार आणि पैसा नाही पानी नाही. अशा परिस्थित तिला त्याच्याशी लग्न करून चूक केली असे वाटू लागले.
त्यात तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. पण अशा परिस्थितीत तिने हार मानली नाही. तर ति धैर्याने उभा राहिली.
पॅट्रिशिया Patricia खूप धाडसी होती. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी तिला काहीतरी करावं असे वाटू लागले.
कारण दोन मुला साठी तर खंबीरपणे उभा राहून जागायलाच हवे असे वाटत होते. आणि काहीतरी केल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
लग्न करून मी चूक केलेली आहे आणि यासाठी कोनाला तरी का दोषी ठरवू ?
Patricia Narayan
त्यात तिचा माहेर कडून पण ती काही अपेक्षा ठेऊ शकत नव्हती. पण करणार तर काय करणार हा तिचा पुढे प्रश्न होता.
कारण तिचे शिक्षण ही अपुरे होते. आणि तिला कोण नोकरी देणार. ती फक्त त्या काळी १९ वर्षाची होती.
कामाचा काहीच अनुभव नव्हता कधी काम केलेले नव्हते.
पॅट्रिशिया ने कुकिंग करण्याचा निर्णय घेतला
दुसऱ्या कुटल्याही कामाचा अनुभव नसल्याने तिने जे येतंय त्यातच पैसा कमवायचा असे ठरवले.
आणि तिने सुरुवातीला घरातून लोणचे, पापड, वेगवेगळे जाम बनवून विकत होती.
परंतु तिचा कडे ही सगळे पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून ठेवण्या साठी मोठे भांडे नव्हते. आणि मोठ किचन नव्हत.
अशा परिस्थितीत ती कोणाकडे मदत मागू शकत नव्हती. पण देव आपल्या पाठीशी असतो असे म्हणतात.
आणि यामुळेच तिचा वडिलांच्या मित्राने तिला यात मदत केली. यातूनच तिला मग छोटी सुरवात करता आली.
असे करत करतच तिने नंतर मरीना बीच वर गाडी लाऊन पदार्थ विकण्याचा निर्णय घेतला.
पॅट्रिशिया च्या प्रगतीची वाटचाल
पण या ठिकाणी गाडी लावण्यासाठी सरकारी परवानगी लागते ही तिला माहीत नव्हते.
तेव्हा ती परवानगी काढण्यासाठी आपल्या छोट्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन पीडब्ल्यूडी कार्यालयात गेली.
परंतु तिच्याकडे कुठलाही वशिला नव्हता. त्यामुळे तिला साहेबांना भेटू दिले गेले नाही.
परवानगी काढण्यासाठी ती रोजच त्या कार्यालयामध्ये येऊन बसू लागली.
तिला आशा होती की एक दिवस नक्कीच साहेब भेटतील आणि मला परवानगी भेटेल.
एक दिवस ते साहेब भेटले पण त्यांनी परवानगी देता देता एक वर्ष घालवले. आणि यानंतर तिने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.
मरिना बीचवर गाडी लावण्यास चालू केले. त्यात ती समोसे, पॅटीस, फ्रेंच फ्राईज, चहा असे पदार्थ विकत होती.
पण त्यादिवशी दिवसभरामध्ये तिचा फक्त ५० पैशांचा चहा विकला होता आणि त्यामुळे ती खूप हाताश झाली होती.
निराश होऊनच ती घरी परतली. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडी लावण्याचा तिचा धीरच होत नव्हता.
मग अशा परिस्थितीत तिच्या आईने तिला धीर दिला. समजावून सांगितले आणि पुन्हा एकदा धैर्याने उभा टाकली.
दुसऱ्या दिवशी परत तिने मरिना बीच वर गाडी लावण्यास सुरुवात केली. आणि त्या दिवशी मात्र तिचा चांगला धंदा झाला.
मग परत तिने मागे कधी वळून पहिले नाही. आणि तिने अजून पदार्थात वाढ केली आत्ता ती स्नक्स, चहा, कॉफी या बरोबरच ईतर ज्यूसेस विकत होती.
Patricia चे म्हणणे आहे की, मरीना बीच ही तिचा साठी बिझनेस शिकवणारे स्कूल आहे आहे. कारण बिझनेस विषयी चा सगळ्या गोष्टी तिला तेथे शिकायला मिळाल्या होत्या.
Patricia Narayan
तिचा साठी ते बिसनेस स्कूल होत.
तिला कोणी शिक्षण बद्दल विचारले असता ती सांगते की मरीन बिचवर एमबीए केलंय. आणि तीथेच गणित ही शिकलेय.
या कामात तिला मदत व्हावी म्हणून दोन दिव्यांग लोकांची मदत घेतली होती. त्याच वेळेस तिचे मुलंही लाहाणाचे मोठे होत होते.
म्हणून तिला त्यांची चांगलीच मदत होत होती. पण नवरा नारायण दारूच्या खूप आहारी गेला होता.
काही दिवसांसाठी तो गायब असायचा आणि नंतर आल्यावर मात्र तिला मारहाण करे. तिच्याकडून पैसे घेणे आणि तिला सिगारेटचे चटके द्यायचा.
हे करत असतानाच पुढे तिला मोठ्या ऑर्डर मिळू लागल्या. यानंतर तिने चेन्नई तील ऑफिस साठी कॅटरिंग चालू केले.
त्याचबरोबर सरकारी बँक, कार्यालये अशा ठिकाणावरून जेवणासाठी तिला मोठ्या ऑर्डर मिळू लागल्या.
पुढे तिला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट येथून २०० लोकांच्या रोजचे जेवण पोहोचवण्याची मोठी ऑर्डर मिळाली.
आणि ती 19९८ ला संगीता ग्रुपच्या नेल्सन मॅनकॉम रेस्टॉरंट डायरेक्टर झाली.

पण Patricia चे नाशिबच खोटे
Patricia नाशिबाचे भोग अजून संपलेले नव्हते. २००२ ला तिचा नवरा नारायण याचे निधन झाले.
आणि काही दीवसानी आपल्या मुलीला आणि जवायला एका आपघतात गमावले होते.
या सारखे येणाऱ्या संकटांनी पॅट्रिशिया मोडून गेली होती. पण तिचा मूळ स्वभाव धाडशी असल्यामुळे पुन्हा एकदा ती उठली.
तिने आपल्या कामाला सुरुवात केल. यानंतर Patricia थांबली नाही तर तिने आपल्या मुलाच्या साह्याने एक रेस्टॉरंट चालू केले.
त्या रेस्टॉरंटला मुलीची आठवण म्हणून मुलीचे संदीपा असे नाव दिले.
त्यानंतर सगळे लक्ष या रेस्टॉरंट मध्ये घातले. रेस्टॉरंट च्या प्रगतीसाठी खूप मेहनत केली. हे रेस्टॉरंट तिला खूप लोकप्रिय करायचे होते.
कारण हे रेस्टॉरंट तिने आपल्या मुलीच्या आठवणीत उभारलेले होते. तिचे नाव दिलेले होते. तिला यात मुलगी दिसत होती.
म्हणून ती या रेस्टॉरंट वर खूप प्रेम करत होती. काही दिवसांपूर्वी मरिना बीच वर खाद्यपदार्थाची गाडी लावणाऱ्या या Patricia चे आता स्वतःचा रेस्टॉरंट चेन होती.
तिला आयुष्यात खूप साऱ्या संकटाला सामोरे जावे लागले. पण तिने त्यावर मात करून पुढे मार्ग काढून खंबीरपणे उभा टाकली, तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
२०१० या वर्षाने तिच्या या संघर्षाची आणि व्यावसायीक दृष्टीची दखल घेण्यात आली.
सर्व स्त्रियांना प्रेरणा देणार FICCI Women entrepreneurs पुरस्कार याच वर्षी देण्यात आला.
सुरुवातीला तिने दोन माणसांच्या मदतीने व्यवसाय सुरू केला होता. पण आज तिच्या रेस्टॉरंटमध्ये २०० लोक काम करतात.
काळाप्रमाणे तिने आपले राहणीमान आणि दिनचर्या ही बदलली आहे. अगोदर परिस्थिती नुसार सायकल आणि रिक्षा ने प्रवास करायची.
तर आता तिच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत. तिच्या स्वतःच्या गाडीतून प्रवास करते.
काही काळा पूर्वी 50 पैसे कमावणारी पेट्रीशिया आजदिवसाला दोन लाख रुपये कामावते.
अशा धाडशी स्त्रीचा जीवन प्रवास नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारा आहे.