आजकाल आपण नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनेतून निर्माण झालेली उद्योग बघत असतो, आणि खूप मोठे झालेले उद्योग त्यामागे काही खूप मजेशीर गोष्ट असते. आज आपण अशाच एका उद्योगाबद्दल माहिती जाणून जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी आहेत अशाच एका पर्यावरण प्रेमाची ही गोष्ट आहे. त्याने सुरुवातीला समुद्रकिनारे स्वच्छ करण्यास सुरुवात केली, तो खूप मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करून आणि त्याची विल्हेवाट लावत असत. पण नंतर त्या क्या कचर्यातून आज आपण काही वस्तू बनवू शकतो.
मग त्याने तो कचरा एकत्र करण्यास सुरुवात केली त्याच्यावर प्रक्रिया करून आज तो कच्च्या मालापासून पक्का माल बनवत आहे.म्हणजेच टाकाऊ पासून टिकाऊ बनते. आणि यातून त्याला बक्कळ कमाई मिळते. यामध्ये त्याच्या दोन गोष्टी साध्य झाल्या, एक म्हणजे पर्यावरण प्रेम आणि दुसरा म्हणजे उद्योगाचा साधन. आहे ना मजेशीर उद्योग?
याची सुरुवात तब्बल 19 वर्षांनी पूर्वी झाली म्हणजे 1999 पासून Ocean Sole कंपनी समुद्रकिनाऱ्यावर पाण्यावर तरंगत असलेल्या रबरी चपला प्लास्टिक इत्यादी गोष्टी गोळा करून त्यापासून उत्कृष्ट दर्जाच्या प्राण्यांच्या आकाराचे किचन आणि विविध प्रकारच्या खेळणी बनवतात.
या कंपनीचे संस्थापक जुली चर्च सांगतात या खेळणी लोक खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात पण त्यांना तेव्हा आनंद होतो जेव्हा आम्ही ह्या खेळणी कशा बनवले आहेत सांगितल्या नंतर. यामध्ये मी निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इतर लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहोत.