आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
निंजा म्हणजे काय?
निंजा हा जपानमधल्या संस्कृतीचा एक भाग आहे. गुप्तचर यंत्रणा कशी काम करते तसेच हे निंजा पण काम करतात.
पाळत ठेवून गुप्तपणे हल्ला करणे या कामासाठी त्यांना तयार केलं जायचं.
हे काम इतक्या सहज आणि सोपं नसल्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचे कौशल्य पाहिजे,
कुठल्याही परिस्थिती मध्ये संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते
लहानपणी टीव्हीवर चालणारे कार्टून सर्वांनीच बघितलेले आहे ‘निंजा हातोडी’.
ते कार्टून पाहून आपल्यालाही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या माराव्या वाटतात.
यामध्ये आपल्या सुप्त गुणांना खूप वाव द्यावा लागतो. अंतर्गत मन जागृत करावे लागते.
आता तर निंजा ची पदवी सुद्धा मिळू लागलेल्या आहेत. आणि निंजा विद्या मध्ये एका महारथी ने डिग्री मिळवली आहे.
खेळाडूंनी मित्राला वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली जे पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होतील.
गिनीची मित्सुहाशी ( Genichi Mitsuhashi ) यांनी मिळवली डिग्री
गिनीची मित्सुहाशी या जपान मधील इसमाने निंजा विद्या चा २ वर्ष एका छोट्याशा गावां मध्ये पूर्ण अभ्यास केला.
या गावाला होम ऑफ द निंजा ( Home of the Ninja ) असे म्हणतात.
पूर्ण झालेल्या अभ्यासा नंतर जपान मधील मी विद्यापीठातून त्यांना डिग्री मिळाली. त्या दोन वर्षाच्या अपार मेहनतीचा फायदा त्यांना शेवटी झालाच.
या दोन वर्षांमध्ये त्यांना खूप खडतर वातावरणा मधून जावं लागलं.
त्यांनी मूलभूत मार्शल आर्ट्स, जपानमध्ये लढले जाणारे पारंपरिक लढाई कौशल्य, पर्वता वर, टेकड्या वर चढण्याची कला इत्यादींचा अभ्यासक्रमा मध्ये समावेश होता.
हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून त्यांना प्रॅक्टिकल कसरती कराव्या लागल्या.
दिवसभर शेतामध्ये राबून सायंकाळी निंजा ची प्रॅक्टिस करावी लागायची. हे फक्त आपण पुस्तकांमध्ये किंवा टीव्ही वर बघितलेल आहे.
पण या महाशयांनी हे संपूर्ण अनुभवलेल आहे. गिनीची मित्सुहाशी एवढ्यावर थांबणार नाहीत तर ते पीएचडीच्या अभ्यासासाठी लागले सुद्धा.
त्यांनी निंजा विद्यांमध्ये डिग्री हासिल करून एक मोठा पराक्रम केला आहे. आहे आणि आधुनिक निंजा ची सुरुवात केली आहे